2 उत्तरे
2 answers

इलेक्ट्रीक बील माफ होणार आहे काय ?

5
मला तरी इलेक्ट्रिक बिल माफ होईल असे वाटत नाही कारण सरकार वरती आर्थिक ताण खूप आहे आणि तो कशाला कशा मधून ते भरणारच आहेत आणि लाईट बिल जमा झाले तरी ते पूर्णपणे माफ न होता काही थोड्या प्रमाणात म्हणजेच अर्ध्या प्रमाणात तरी होईल आणि अर्धे आपल्याला भरावे लागेल
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 8640
3
लॉकडाऊनमुळे गरीबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे. सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीज बिलाची रक्कम माफ करावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील निम्मी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनीने माफ करावे, तसेच पुढील 4 महिने थकबाकीमुळे कोणाचाही वीज कापू नये, अशी सूचना रामदास आठवले यांनी वीज कंपन्यांना केली आहे.

मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आपण त्यांना आवाहन केले, असल्याची माहिती रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करत असून मुंबई महापालिकेने स्थायी समितीमध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असं आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे...
पण पुर्णतः माफ होइल की नाही, अद्याप यावर काही निर्णय घेतला गेलेला नाहीये...
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 765

Related Questions

इलेक्ट्रिक केटलच्या भागांची नावे कोणती आहेत?
इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज म्हणजे काय?
मला घरी बसून इलेक्ट्रिकल के काम मिळू शकते?
मोबाईल मधील बॅटरी किती चार्ज करावी?
पिस्टन रिंग्ज कोणकोणत्या प्रकारच्या असतात?
एकच स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी बाजारात उपलब्ध आहे का?
ऑप्टिकल फायबर म्हणजे काय?