Topic icon

इलेक्ट्रिसिटी

4
सध्यातरी अशी दुचाकी बाजारात नाही. २०२१ मध्ये होंडा कंपनीची होंडा पीसीएक्स १२५ ही गाडी बाजारात येणार आहे.
ही गाडी पेट्रोल व बॅटरी दोन्हींवर चालणारी असेल. तिची किंमत सुमारे ८५ हजार ते १ लाख दहा हजारापर्यंत असेल.
सध्या बाजारात किट उपलब्ध आहेत ज्या पेट्रोलवरच्या दुचाकीला इलेक्ट्रिक बनवतात. Ezee किट म्हणून एक चांगली कंपनी आहे, ती वापरून तुम्ही स्कूटर इलेक्ट्रिक करू शकता.
उत्तर लिहिले · 4/10/2020
कर्म · 282765
4
06/09/2020...

महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'वीजचोरी कळवा बक्षीस मिळवा' या योजनेतंर्गत वीज चोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे सजग नागरिकांनी वीजचोरीची माहिती तत्काळ महावितरणला कळवावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.



उत्तर लिहिले · 6/9/2020
कर्म · 14865
7
आधुनिक युगामध्ये जर विजेचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल अमेरिकेचे बेंजामिन फ्रेंक्लिन. बेंजमिन फ्रांकलीन यांनी विजेचा शोध यासंबंधी काय सिद्धांत व काही छोटे उपकरणे तयार करून ठेवले होते नंतर या सिद्धांतांचा उपयोग करून थॉमस एडिसनने बल्ब चा शोध लावला. आणि संपूर्ण जगामध्ये त्यानंतर विजेच्या स्वरुपात प्रकाश पसरला. पण तुम्ही जर संपूर्ण मानवी इतिहास पाहिला तर आजही बऱ्याच ठिकाणी असे अवशेष आढळतात की तिथे विजेचे अस्तित्व होते. जसे की तुम्ही जर इजिप्तच्या पिरॅमिड मध्ये गेलात तर तिथे त्या काळात वीज होती याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा विजेचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर देणे जवळपास अशक्य आहे.
उत्तर लिहिले · 26/7/2019
कर्म · 282765
7
या सर्व फेज म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या क्षमतेची परिमाणे असून त्या त्या क्षमतेनुसार योग्य ठिकाणी वापरायची असतात.1फेज घरी वापरतात.यावर पंखा,ट्यूबलाट,बल्ब, मिक्सर, वाँशिंग मशिन वगैरे वस्तू वापरता येतात.2 फेज दुकानासाठी वापरतात (कमर्शियल वापरासाठी) व3 फेज कारखाने किंवा ज्या गोष्टिंसाठी जास्त क्षमतेची विविध ज लागते अशा ठिकाणी वापरतात.
ज्या वस्तुंसाठी कमी क्षमतेची वीज चालू शकते त्या वस्तूंसाठी 1 फेज न वापरता 3.फेज वापरली तर त्या वस्तू जळून जातील.कारण जास्त क्षमतेची वीज सहन करण्याची या वस्तुंची क्षमता नसते.
तसेच मोठ मोठ्या कारखान्यासाठी 1 फेज वापरून जमत नाही.कारण या कारखान्यांना मोठ्या क्षमतेचीच वीज लागते.
उत्तर लिहिले · 10/3/2019
कर्म · 91070
29
घरातील वीज जाते आणि येते… मध्ये काय घडते?वीज गेल्यावर व आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी?

_पावसाळ्याच्या सुरुवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. वीजपुरवठा खंडित झाला की, आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. वीज का गेली, का जाते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत नसते. तसेच वीज जाते आणि येते, या मधल्या काळात काय घडते, हे जाणून घेण्याची गरज आहे._

*यंत्रणा जोखमीची*
रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाचा धोका असतो. रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येते, तेव्हा कोणीतरी त्या पावसात-अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून खांबावर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.

*सारा पसारा उघड्यावर*
पारंपरिक अथवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कोन्या-कोपऱ्यातून निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीजवाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ‘ग्रीड’ म्हणतात. हा सारा पसारा उघड्यावर आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात, तर कधी हा बिघाड गाव किंवा काही भागापुरता मर्यादित असतो.

*हानी टाळण्यासाठी यंत्रणा*
दुसरी बाब म्हणजे वीज खांबात विद्युतप्रवाह उतरू नये यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा ते उन्हामुळे किंवा विद्युतप्रवाहामुळे गरम होतात व त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून जमिनीत उतरतो आणि लगेचच आपात्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीजवाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्तहानी होण्याचा धोका असतो.

*बिघाड शोधणे जिकिरीचे*
जेव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीजपुरवठा आहे की नाही, याची खात्री करत असतात. वीजपुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रीप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. तथापि, बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वाऱ्याची, पावसाची अथवा अंधाराची तमा न करता ही शोध मोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात, तर कधी हा बिघाड काही खांबांदरम्यान सापडतो.

*वीज गेल्यास काय करावे आणि काय करू नये?*

👉 आपल्या घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीजपुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.

👉अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

👉वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

👉वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी व वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

👉विद्युत खांबाला व ताणाला जनावरे बांधू नयेत.

👉 वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

👉बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.

👉विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाला अथवा १९१२, १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी.






उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 569205