2 उत्तरे
2 answers

1 Phase, 2 Phase आणि 3 Phase विषयी माहिती मिळावी?

7
या सर्व फेज म्हणजे इलेक्ट्रिसिटीच्या क्षमतेची परिमाणे असून त्या त्या क्षमतेनुसार योग्य ठिकाणी वापरायची असतात.1फेज घरी वापरतात.यावर पंखा,ट्यूबलाट,बल्ब, मिक्सर, वाँशिंग मशिन वगैरे वस्तू वापरता येतात.2 फेज दुकानासाठी वापरतात (कमर्शियल वापरासाठी) व3 फेज कारखाने किंवा ज्या गोष्टिंसाठी जास्त क्षमतेची विविध ज लागते अशा ठिकाणी वापरतात.
ज्या वस्तुंसाठी कमी क्षमतेची वीज चालू शकते त्या वस्तूंसाठी 1 फेज न वापरता 3.फेज वापरली तर त्या वस्तू जळून जातील.कारण जास्त क्षमतेची वीज सहन करण्याची या वस्तुंची क्षमता नसते.
तसेच मोठ मोठ्या कारखान्यासाठी 1 फेज वापरून जमत नाही.कारण या कारखान्यांना मोठ्या क्षमतेचीच वीज लागते.
उत्तर लिहिले · 10/3/2019
कर्म · 91070
4
सिंगल फेज, टू फेज, थ्री फेज हे इलेक्ट्रिसिटी सप्लाय सिस्टीम मध्ये वापरले जाणाऱ्या लाईव्ह पावर लाईन दर्शवते. त्यामध्ये मुख्यता सिंगल फेज आणि थ्री फेज चा वापर आपण करतो. सिंगल फेज चा वापर हा मुख्यत घरगुती उपकरणे व कमी ऊर्जेच्या उपकरणांसाठी केला जातो तर थ्री फेज चा वापर आपण इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स आणि जास्त ऊर्जेच्या उपयोगासाठी करतो .सिंगल फेज सप्लाय सिस्टीम मध्ये भारतीय स्टॅंडर्ड नुसार 230 वोल्ट तर थ्री फेज सिस्टीम मध्ये 440 वोल्ट एवढे विभावांतर असते.
सिंगल फेज सप्लाई सिस्टम म्हणजे एक लाईव्ह कंडक्टर आणि न्यूट्रल तर थ्री फेज  सिस्टम म्हणजे तीन लाईव्ह कंडक्टर जे की स्टार पॉईंट नी कनेक्ट असतात.
उत्तर लिहिले · 17/5/2019
कर्म · 240

Related Questions

एकच स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारी बाजारात उपलब्ध आहे का?
वीज चोरीबाबत माहिती मिळेल का?
वीजेचा शोध कोणी लावला ?
घरातील वीज जाते आणि येते मध्ये काय घडते, वीज गेल्यावर व आल्यानंतर काय खबरदारी घ्यावी ?