पोषण
सजीवांना पोषणाची गरज असते?
1 उत्तर
1
answers
सजीवांना पोषणाची गरज असते?
0
Answer link
संजीवांना पोषणाची गरज असते
१. सजीवांना करण्यासाठी उर्जा आवश्यक असते.
२. सजीवांच्या शरीराची वाढ व विकास होण्यासाठी तसेच
३. पेशींची झीज भरून काढण्यासाठी व उती दुरुस्त करणे.
४. शरीराला
रोगांपासून
वाचवणे इत्यादी कार्यासाठी सजीवांना पोषणाची गरज असते.
सजीवाच्या पुढील दोन पोषणविषयक गरजा असतात : (१) ज्यांच्यापासून ऊर्जा उत्पत्र होते असे पदार्थ अन्न म्हणून खाणे व (२) ज्या पदार्थांचे सजीवांच्या क्रियात्मक वा संरचनात्मक गरजा भागविणे हे प्राथमिक कार्य आहे असे पदार्थ. काही पदार्थ दोन्ही प्रकारच्या गरजा भागवू शकतात. एका जातीतील जीवांना लागणाऱ्या पोषणविषयक पदार्थांचे प्रमाण दुसऱ्या जातीतील जीवांच्या बाबतीत जास्त असेल, कमी असेल वा निराळे असेल. काही जीव काही वेळा हे पदार्थ इतर पदार्थांपासून तयार करू शकतात. त्यामुळे एका जातीबद्दलच्या पोषणविषयक ज्ञानावरून दुसऱ्या जातीच्या जीवासंबंधीचे पोषणविषयक अंदाज बांधणे कठीण जाते.