1 उत्तर
1
answers
गुरू करणे का गरजेचे असते?
3
Answer link
गुरू त्यांच्याजवळील ज्ञान आणि अनुभवातून शिष्याला मार्गदर्शन करत असतात. जीवन जगत असताना या ज्ञान आणि अनुभवाची प्रत्येकाला गरज असते. स्वानुभवातून शिकण्यापेक्षा एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्यामुळे जीवनातीस समस्या लवकर सोडवता येतात आणि जीवन सुखी समाधानी होते.
थोडक्यात जीवनात गुरूशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे सदगुरू असोत खरा गुरू मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरू अथवा सदगुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरूप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे. यासाठीच गुरूपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे.