हिंदु धर्म धर्म

मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?

1 उत्तर
1 answers

मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?

3
मंत्र जपाने मनसशांती मिळते आरोग्य चांगले राहते कारण मंत्रजप केल्याने मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजू समक्रमित होतात आणि आरामदायी (अल्फा) मेंदूच्या लहरींना चालना मिळते . हे सिंक्रोनाइझेशन कालांतराने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते .


 मंत्रजपानं आपलं अंतर्मन बदलत असतं. वारंवार मंत्रजप करीत राहिल्यानं मानसिक किंवा आत खोल मनात होणारा बदल व्यक्त करणं शब्दापलिकडचं असतं, हा बदल केवळ अनुभवयाचा असतो. त्याचा दिव्य अनुभव घ्यायचा असतो...
...................................
 मंत्रजपात प्रचंड शक्ती आहे, परंतु ती सुप्त आहे. मंत्रोच्चाराच्या ध्वनीमुळे निर्माण होणारी कंपनं, लहरी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत भिनल्या जातात, मनात विरल्या जातात. मंत्रजपामुळे अंगात एक उमीर्, चैतन्य संचारू लागते. सदसद्विवेक बुद्धीला चालना मिळते, तिला लय सापडते. तुमच्या शरीरात आध्यात्मिक तरंग निर्माण होतात.
मंत्रजप करीत राहिल्यानं मनात येणारे तेच तेच विचार लुप्त होतात, निघून जातात. वारंवार एकाच विचारात राहिल्यानं तुमच्या मनाला चिंतेची घोर लागली जाते. परंतु, मंत्रजपामुळे मनात निर्माण होणाऱ्या चिंतांपासून आपण दूर राहतो.
बऱ्याच वेळा जप करीत असलेल्या मंत्राचा अर्थही आपणास अनेकदा कळत नसतो. मग, आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, कशासाठी मंत्रजप करत बसायचं? ज्या शब्दांचा आपल्याला बोध होत नाही, ते पुटपुटत बसणं योग्य आहे काय, जे आपल्याला समजत नाही, ते करीत राहणं चांगलं आहे काय? त्यानं आपल्याला काही फायदा होतो काय? असे अनेक प्रश्ान्, शंका मनात घर करू लागतात!

प्रत्येक मंत्रामागे अगाध, अमर्याद अर्थ आहे. मंत्राचा बोध सर्वांना सारखाच होईल, असं नाही. त्यामुळे मनात निर्माण होणारे तरंग समजण्यापलिकडचे असतात. स्वातंत्र्यदेवतेच्या मंत्रामुळे देशात अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली होती, या ऊजेर्च्या कंपनांमुळे बलाढ्य ब्रिटिश सत्ता हादरली होती, याची जाणीव सर्वांना आहे.
मंत्रमुग्ध होणे हा वेगळाच अनुभव असतो. मंत्रामुळे तुमच्या मनात सद्विचार निर्माण होतात, वाईट विचार बाहेर पडतात. परंतु, मंत्रांचं सामर्थ, त्यापासून निर्माण होणारे तरंग ज्यावेळी तुमच्या मनाला उमजत नाहीत, त्यावेळी ते तुमच्यात विलीन होतात आणि चिंतनशील जागेचा आश्रय घेतात. म्हणजेच तुम्ही ध्यानस्थ बनत जाता.

मंत्र म्हणजे एक बीज आहे. शेतकरी जसा शेतात बियाणं पेरत असतो, तसं मंत्र तुमच्या मनात पेरला जातो. प्रत्येक बीजाचं, वृक्षात रूपांतर होतं, म्हणजेच प्रत्येक बीजात वृक्ष बनण्याची सुप्त शक्ती असते. त्याच प्रमाणे मंत्रजपातही सृजनशीलतेची क्षमता असते. काही मंत्र बीजरूपात असतात. त्यांना 'बीजमंत्र' असं संबोधलं जातं. तर काही मंत्र व्यक्त रूपात असतात. म्हणजे मंत्रजपातच त्याचे फळ, त्याचा हेतू सांगितलेला असतो; 'गायत्री मंत्र', या प्रकारातला आहे.

मंत्र सुप्त असतात, गुप्त रुपात असतात. त्यामुळे अंतर्मन जागृत होतं. मंत्रजप म्हणजे बाह्यमनानं केलेली कृती. ज्यावेळी आपणास बीज अंकुरावं, असं वाटतं, तेव्हा आपण ते जमिनीत पेरतो, म्हणजेच बियाणं मातीत घालतो, दडवतो. एक प्रकारे गुप्त ठेवतो. ते जर उघड्यावर ठेवलं किंवा जमिनीवर इतस्तत: फेकलं तर पक्षी खाऊन टाकतील, त्याचा नाश होईल, म्हणून ते जमिनीत पेरायचं असतं. तसाच मंत्र अंतर्मनात पेरायचा असतो.
आपण मंत्र आणि या मंत्रांचा अर्थ पुस्तकांतून, इंटरनेटवरून वाचू शकतो, त्यामुळे आपली केवळ बौद्धिक भूक भागविली जाईल. परंतु, दिव्य अनुभवाची प्रचीती येणार नाही.
ज्यावेळी आपण मंत्रजप करतो किंवा श्रवण करतो, त्यावेळी तुमचं मन आणि शब्द शुद्ध होतात. ध्यानधारणेसाठी आपण, आपला आत्मा तयार होतो. मंत्रांच्या ध्वनिलहरीने मनाची विविध कंपने बदलत जातात आणि ते शांत होत जातं, चित्त स्थिर होतं. मनाची स्पंदनं कमी होतात आणि आपण अंतर्मुख बनत जातो.
आपण जेव्हा हसतो, त्यावेळी आपलं मनच नव्हे तर शरीरही आनंदित झालेलं असतं. आनंदानं ते गदगदा हलत असतं, आनंदानं बेहोश झालेलं असतं, त्याच्या उलट आपण जेव्हा दु:खावेगानं रडतो, त्यावेळी हमसून हमसून दु:खाचे कढ, उमाळे सोडत असतो. जसं हसण्यानं आणि रडण्यानं आपल्यात बदल घडतो, त्याचप्रमाणं मंत्रजपानं आपलं अंतर्मन बदलतं. वारंवार मंत्रजप करीत राहिल्यानं मानसिक किंवा आत खोल मनात होणारा बदल व्यक्त करणं शब्दापलिकडचं असतं. हा बदल केवळ अनुभवायचा असतो. त्याचा दिव्य अनुभव घ्यायचा असतो.
जेव्हा मन शांत, एकाग्र असतं, तेव्हाच ते अंतर्मुख बनतं आणि ज्या वेळी मन अंतर्मुख बनतं, त्यावेळी मंत्रामुळे मिळणाऱ्या या दिव्य अनुभवाची, परमानंदाची प्रचीती येते. परंतु, चित्त एका ठिकाणी नसतं, ते सैरभर झालेलं असतं, त्यावेळी आपण या दिव्य आनंदास मुकतो. शरीरानं आपण बाह्य जग अनुभवतो, परंतु, ध्यानधारणेमुळे आपणास अंतर्मनात डोकावता येते. 'अंतर्मुखी, सदा सुखी', असं म्हटलं जातं, ते याचसाठी!
मंत्र धर्मातीत आहेत. त्यांना कोणत्या धर्माचं बंधन घालणं योग्य नाही. मंत्र ही अशी आयुधं आहेत आहे की, त्यामुळे तुमचं 'अहं'नं भरलेलं मन विरघळून तुम्ही स्वत्वानं पुन्हा उभे राहता.
आपण स्वत्वानं पुन्हा उभं राहण्याची काय गरज आहे? त्याचा दैनंदिन जीवनात काय फायदा आहे? त्याचं उत्तर आहे, जेव्हा नदी शांत वाहत असते, त्यावेळी तिचं पाणी स्फटिकासारखं स्वच्छ असतं, नदीचा तळही आपणास दिसतो. त्याचप्रमाणं आपलं, मन शांत असतं, त्यावेळी ते व्यक्त करताना त्यात स्पष्टता असते, आपलं निरीक्षण, संवेदना आणि अभिव्यक्ती यांच्यात सुधारणा होते. परिणामी आपण एकमेकांशी स्वच्छ सुसंवाद साधू शकतो. आपल्या बऱ्याच समस्या आणि गैरसमजुती, परस्परांत सुसंवाद नसल्यानं निर्माण होतात. परंतु, जेव्हा आपलं मन संघर्षापासून मुक्त असतं, मोकळं असतं, त्यावेळी आपण परस्परांशी सुखद आणि कार्यक्षम संवाद साधू शकतो. आपल्या प्रयत्नांत 'कम्युनिकेशन गॅप' येत नाही. आपल्या दृष्टिकोनात सकारात्मता येते. या आनंदासाठीच आपण मंत्रजप करणे आवश्यक आहे!
 
उत्तर लिहिले · 25/3/2023
कर्म · 48555

Related Questions

विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व का आहे?
दत्तात्रयांचे 24 गुरू कोणते होते?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
2 मुखी रुद्राक्ष माहिती मिळेल का?
रावणाचे वंशज कोण होते?
नवरात्र म्हणजे काय? तिला शारदीय नवरात्र का म्हणतात?
पितृपक्षात श्राद्ध नेमक्या कोणत्या तिथीला घालावे, मृत्यू झाला त्या दिवशी कि जिवंत असलेल्या तिथीला?