हिंदु धर्म धर्म

विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व का आहे?

1 उत्तर
1 answers

विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व का आहे?

1


का आहे विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व 





कोणतेही शुभकार्य असो, सर्वात प्रथम विड्याचे पान हवेच असते. पूजा, लग्न, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही शुभकार्य असेल तर अनेकदा ब्राह्मणाकडून विड्याची पानं आणा असे सांगितले जाते. आपल्या प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देताना विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून दिली जाते. विड्याच्या पानाची वेल असते आणि ती सदाहरीत असते. याला नागवेल असंही म्हणतात. असे म्हणतात की, स्वतः शंभोमहादेवांनी आणि पार्वती मातेने नागवेल पेरली होती. पूर्वेकडील काही लोकगीतं असं सांगतात की, नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचं निवासस्थान आहे.
नागवेलीची एक आख्यायिका सांगितली जाते. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात शिल्‍लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. आपल्याकडे देवीला तांबुलाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात घराघरात तांबुल तयार केला जातो.
नागवेलीबद्दल आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी पृथ्वीवर विड्याचे पान नव्हते. पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांना विड्याचे पान हवे होते. म्हणून पांडवांनी ते आणण्यासाठी आपल्या दूताला वसुकी नागाच्या राणीकडे पाठवले. तिने आपल्या करंगळीचा भाग कापून दिला. त्याने तो भाग पृथ्वीवर आणून जमिनीत पुरताच त्यातून नागवेल उगवली, तेव्हापासून विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे नाव पडले. विड्याचं पान हे ताजेपणाचे, टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. म्हणजे नागवेल सरसर वाढत जाते. ती वेल सदाहरित असते. म्हणून असाच तुमचा उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून रहावा ही त्यातील भावना असते. विडा खाण्याची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे. स्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्‍भव मानले आहे.
विड्याच्या पानाला तंबूल (संस्कृत), पक्कु (तेलगू ), वेट्टीलाई (तमिळ) नागवेल (मराठी) आणि नागुरवे(गुजराती) असे म्हणतात. नावे जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाचा मोठा मान असतो. आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र आणि आवश्यक मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही. विड्याच्या पानात देवीदेवतांचा निवास असतो. टोकास लक्ष्मी, उजव्या बाजूस ब्रम्हदेव, मधोमध सरस्वती, डाव्या बाजूस पार्वतीमाता, लहान देठामध्ये महाविष्णू, मागील बाजूस चंद्रदेवता असते. तुम्ही पाहिले असेल, विड्याच्या पानाचे सेवन करताना खालचा भाग थोडासा काढून टाकतात. कारण विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. तर विडयाच्या पानाच्या देठात अहंकार आणि दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो.
विडा ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत. कोणतीही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजे पानाचा विडा उचलणे. बाळंतपणात बाळंतणीला दिला जाणारा बाळंत विडा, पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा, प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रेयसीचा विडा, जेवणानंतर खाल्ला जाणारा आयुर्वेदात सांगितलेला त्रयोदशगुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा. या प्रत्येक विड्याचे गुण वेगवेगळे आहेत. विड्याच्या पानाला इतर धर्मातही फार महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते. तेलुगु, बिहारी, पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. असे हे विड्याचे पान आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असे म्हणायला हवे.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 48465

Related Questions

मंत्र जपाने तुम्हाला आलेले अनुभव कोणते आहे?
दत्तात्रयांचे 24 गुरू कोणते होते?
झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी का मान्यता आहे?
2 मुखी रुद्राक्ष माहिती मिळेल का?
रावणाचे वंशज कोण होते?
नवरात्र म्हणजे काय? तिला शारदीय नवरात्र का म्हणतात?
पितृपक्षात श्राद्ध नेमक्या कोणत्या तिथीला घालावे, मृत्यू झाला त्या दिवशी कि जिवंत असलेल्या तिथीला?