Topic icon

हिंदु धर्म

3
मंत्र जपाने मनसशांती मिळते आरोग्य चांगले राहते कारण मंत्रजप केल्याने मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजू समक्रमित होतात आणि आरामदायी (अल्फा) मेंदूच्या लहरींना चालना मिळते . हे सिंक्रोनाइझेशन कालांतराने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करू शकते .


 मंत्रजपानं आपलं अंतर्मन बदलत असतं. वारंवार मंत्रजप करीत राहिल्यानं मानसिक किंवा आत खोल मनात होणारा बदल व्यक्त करणं शब्दापलिकडचं असतं, हा बदल केवळ अनुभवयाचा असतो. त्याचा दिव्य अनुभव घ्यायचा असतो...
...................................
 मंत्रजपात प्रचंड शक्ती आहे, परंतु ती सुप्त आहे. मंत्रोच्चाराच्या ध्वनीमुळे निर्माण होणारी कंपनं, लहरी आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत भिनल्या जातात, मनात विरल्या जातात. मंत्रजपामुळे अंगात एक उमीर्, चैतन्य संचारू लागते. सदसद्विवेक बुद्धीला चालना मिळते, तिला लय सापडते. तुमच्या शरीरात आध्यात्मिक तरंग निर्माण होतात.
मंत्रजप करीत राहिल्यानं मनात येणारे तेच तेच विचार लुप्त होतात, निघून जातात. वारंवार एकाच विचारात राहिल्यानं तुमच्या मनाला चिंतेची घोर लागली जाते. परंतु, मंत्रजपामुळे मनात निर्माण होणाऱ्या चिंतांपासून आपण दूर राहतो.
बऱ्याच वेळा जप करीत असलेल्या मंत्राचा अर्थही आपणास अनेकदा कळत नसतो. मग, आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, कशासाठी मंत्रजप करत बसायचं? ज्या शब्दांचा आपल्याला बोध होत नाही, ते पुटपुटत बसणं योग्य आहे काय, जे आपल्याला समजत नाही, ते करीत राहणं चांगलं आहे काय? त्यानं आपल्याला काही फायदा होतो काय? असे अनेक प्रश्ान्, शंका मनात घर करू लागतात!

प्रत्येक मंत्रामागे अगाध, अमर्याद अर्थ आहे. मंत्राचा बोध सर्वांना सारखाच होईल, असं नाही. त्यामुळे मनात निर्माण होणारे तरंग समजण्यापलिकडचे असतात. स्वातंत्र्यदेवतेच्या मंत्रामुळे देशात अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली होती, या ऊजेर्च्या कंपनांमुळे बलाढ्य ब्रिटिश सत्ता हादरली होती, याची जाणीव सर्वांना आहे.
मंत्रमुग्ध होणे हा वेगळाच अनुभव असतो. मंत्रामुळे तुमच्या मनात सद्विचार निर्माण होतात, वाईट विचार बाहेर पडतात. परंतु, मंत्रांचं सामर्थ, त्यापासून निर्माण होणारे तरंग ज्यावेळी तुमच्या मनाला उमजत नाहीत, त्यावेळी ते तुमच्यात विलीन होतात आणि चिंतनशील जागेचा आश्रय घेतात. म्हणजेच तुम्ही ध्यानस्थ बनत जाता.

मंत्र म्हणजे एक बीज आहे. शेतकरी जसा शेतात बियाणं पेरत असतो, तसं मंत्र तुमच्या मनात पेरला जातो. प्रत्येक बीजाचं, वृक्षात रूपांतर होतं, म्हणजेच प्रत्येक बीजात वृक्ष बनण्याची सुप्त शक्ती असते. त्याच प्रमाणे मंत्रजपातही सृजनशीलतेची क्षमता असते. काही मंत्र बीजरूपात असतात. त्यांना 'बीजमंत्र' असं संबोधलं जातं. तर काही मंत्र व्यक्त रूपात असतात. म्हणजे मंत्रजपातच त्याचे फळ, त्याचा हेतू सांगितलेला असतो; 'गायत्री मंत्र', या प्रकारातला आहे.

मंत्र सुप्त असतात, गुप्त रुपात असतात. त्यामुळे अंतर्मन जागृत होतं. मंत्रजप म्हणजे बाह्यमनानं केलेली कृती. ज्यावेळी आपणास बीज अंकुरावं, असं वाटतं, तेव्हा आपण ते जमिनीत पेरतो, म्हणजेच बियाणं मातीत घालतो, दडवतो. एक प्रकारे गुप्त ठेवतो. ते जर उघड्यावर ठेवलं किंवा जमिनीवर इतस्तत: फेकलं तर पक्षी खाऊन टाकतील, त्याचा नाश होईल, म्हणून ते जमिनीत पेरायचं असतं. तसाच मंत्र अंतर्मनात पेरायचा असतो.
आपण मंत्र आणि या मंत्रांचा अर्थ पुस्तकांतून, इंटरनेटवरून वाचू शकतो, त्यामुळे आपली केवळ बौद्धिक भूक भागविली जाईल. परंतु, दिव्य अनुभवाची प्रचीती येणार नाही.
ज्यावेळी आपण मंत्रजप करतो किंवा श्रवण करतो, त्यावेळी तुमचं मन आणि शब्द शुद्ध होतात. ध्यानधारणेसाठी आपण, आपला आत्मा तयार होतो. मंत्रांच्या ध्वनिलहरीने मनाची विविध कंपने बदलत जातात आणि ते शांत होत जातं, चित्त स्थिर होतं. मनाची स्पंदनं कमी होतात आणि आपण अंतर्मुख बनत जातो.
आपण जेव्हा हसतो, त्यावेळी आपलं मनच नव्हे तर शरीरही आनंदित झालेलं असतं. आनंदानं ते गदगदा हलत असतं, आनंदानं बेहोश झालेलं असतं, त्याच्या उलट आपण जेव्हा दु:खावेगानं रडतो, त्यावेळी हमसून हमसून दु:खाचे कढ, उमाळे सोडत असतो. जसं हसण्यानं आणि रडण्यानं आपल्यात बदल घडतो, त्याचप्रमाणं मंत्रजपानं आपलं अंतर्मन बदलतं. वारंवार मंत्रजप करीत राहिल्यानं मानसिक किंवा आत खोल मनात होणारा बदल व्यक्त करणं शब्दापलिकडचं असतं. हा बदल केवळ अनुभवायचा असतो. त्याचा दिव्य अनुभव घ्यायचा असतो.
जेव्हा मन शांत, एकाग्र असतं, तेव्हाच ते अंतर्मुख बनतं आणि ज्या वेळी मन अंतर्मुख बनतं, त्यावेळी मंत्रामुळे मिळणाऱ्या या दिव्य अनुभवाची, परमानंदाची प्रचीती येते. परंतु, चित्त एका ठिकाणी नसतं, ते सैरभर झालेलं असतं, त्यावेळी आपण या दिव्य आनंदास मुकतो. शरीरानं आपण बाह्य जग अनुभवतो, परंतु, ध्यानधारणेमुळे आपणास अंतर्मनात डोकावता येते. 'अंतर्मुखी, सदा सुखी', असं म्हटलं जातं, ते याचसाठी!
मंत्र धर्मातीत आहेत. त्यांना कोणत्या धर्माचं बंधन घालणं योग्य नाही. मंत्र ही अशी आयुधं आहेत आहे की, त्यामुळे तुमचं 'अहं'नं भरलेलं मन विरघळून तुम्ही स्वत्वानं पुन्हा उभे राहता.
आपण स्वत्वानं पुन्हा उभं राहण्याची काय गरज आहे? त्याचा दैनंदिन जीवनात काय फायदा आहे? त्याचं उत्तर आहे, जेव्हा नदी शांत वाहत असते, त्यावेळी तिचं पाणी स्फटिकासारखं स्वच्छ असतं, नदीचा तळही आपणास दिसतो. त्याचप्रमाणं आपलं, मन शांत असतं, त्यावेळी ते व्यक्त करताना त्यात स्पष्टता असते, आपलं निरीक्षण, संवेदना आणि अभिव्यक्ती यांच्यात सुधारणा होते. परिणामी आपण एकमेकांशी स्वच्छ सुसंवाद साधू शकतो. आपल्या बऱ्याच समस्या आणि गैरसमजुती, परस्परांत सुसंवाद नसल्यानं निर्माण होतात. परंतु, जेव्हा आपलं मन संघर्षापासून मुक्त असतं, मोकळं असतं, त्यावेळी आपण परस्परांशी सुखद आणि कार्यक्षम संवाद साधू शकतो. आपल्या प्रयत्नांत 'कम्युनिकेशन गॅप' येत नाही. आपल्या दृष्टिकोनात सकारात्मता येते. या आनंदासाठीच आपण मंत्रजप करणे आवश्यक आहे!
 
उत्तर लिहिले · 25/3/2023
कर्म · 48555
1


का आहे विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व 





कोणतेही शुभकार्य असो, सर्वात प्रथम विड्याचे पान हवेच असते. पूजा, लग्न, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही शुभकार्य असेल तर अनेकदा ब्राह्मणाकडून विड्याची पानं आणा असे सांगितले जाते. आपल्या प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देताना विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून दिली जाते. विड्याच्या पानाची वेल असते आणि ती सदाहरीत असते. याला नागवेल असंही म्हणतात. असे म्हणतात की, स्वतः शंभोमहादेवांनी आणि पार्वती मातेने नागवेल पेरली होती. पूर्वेकडील काही लोकगीतं असं सांगतात की, नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचं निवासस्थान आहे.
नागवेलीची एक आख्यायिका सांगितली जाते. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात शिल्‍लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. आपल्याकडे देवीला तांबुलाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात घराघरात तांबुल तयार केला जातो.
नागवेलीबद्दल आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी पृथ्वीवर विड्याचे पान नव्हते. पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांना विड्याचे पान हवे होते. म्हणून पांडवांनी ते आणण्यासाठी आपल्या दूताला वसुकी नागाच्या राणीकडे पाठवले. तिने आपल्या करंगळीचा भाग कापून दिला. त्याने तो भाग पृथ्वीवर आणून जमिनीत पुरताच त्यातून नागवेल उगवली, तेव्हापासून विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे नाव पडले. विड्याचं पान हे ताजेपणाचे, टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. म्हणजे नागवेल सरसर वाढत जाते. ती वेल सदाहरित असते. म्हणून असाच तुमचा उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून रहावा ही त्यातील भावना असते. विडा खाण्याची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे. स्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्‍भव मानले आहे.
विड्याच्या पानाला तंबूल (संस्कृत), पक्कु (तेलगू ), वेट्टीलाई (तमिळ) नागवेल (मराठी) आणि नागुरवे(गुजराती) असे म्हणतात. नावे जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाचा मोठा मान असतो. आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र आणि आवश्यक मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही. विड्याच्या पानात देवीदेवतांचा निवास असतो. टोकास लक्ष्मी, उजव्या बाजूस ब्रम्हदेव, मधोमध सरस्वती, डाव्या बाजूस पार्वतीमाता, लहान देठामध्ये महाविष्णू, मागील बाजूस चंद्रदेवता असते. तुम्ही पाहिले असेल, विड्याच्या पानाचे सेवन करताना खालचा भाग थोडासा काढून टाकतात. कारण विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. तर विडयाच्या पानाच्या देठात अहंकार आणि दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो.
विडा ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत. कोणतीही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजे पानाचा विडा उचलणे. बाळंतपणात बाळंतणीला दिला जाणारा बाळंत विडा, पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा, प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रेयसीचा विडा, जेवणानंतर खाल्ला जाणारा आयुर्वेदात सांगितलेला त्रयोदशगुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा. या प्रत्येक विड्याचे गुण वेगवेगळे आहेत. विड्याच्या पानाला इतर धर्मातही फार महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते. तेलुगु, बिहारी, पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. असे हे विड्याचे पान आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असे म्हणायला हवे.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 48555
1





दत्ताचे 24 गुरु



१)  सूर्य- ज्याप्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसीच आत्माही एकच आहे, परंतू तिचे अनेक रूप बघायला मिळतात. तसेच सूर्य जलाचा संचय करून परोपकारार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त संचय करून सर्वांना त्यांचा लाभ द्यावा.
 
 २) पृथ्वी- पृथ्वीने आम्ही सहनशीलता व परोपकाराची भावना शिकू शकतो.
३) पिंगला वेश्या- दत्ताने पिंगला नावाच्या वैश्याहून ही शिक्षा घेतली आहे की केवळ पेश्यासाठी जगू नाही. धनाच्या कामनेत जेव्हा ती एक रात्री कंटाळली तेव्हा अचानक तिच्या मनात वैराग्य आला. तेव्हा तिला जाणीव झाली की खरं सुख पेश्यात नाही परमात्म्याच्या ध्यानात आहे. तेव्हा कुठे जाऊन ती सुखाची झोप घेऊ शकली.
 
४) कबूतर- देवाने जेव्हा बघितले की कबूतराचे जोडपे आपल्या मुलांना जाळेत अडकलेलं बघून स्वत:ही जाळेत जाऊन फसलं, तेव्हा ही शिक्षा मिळाली की अती स्नेह दुःखाचे कारण असतं.
 
५) वायू- जसे जागा चांगली असो या वाईट, वायूचे मूल रूप स्वच्छताच आहे, तसेच आमच्यासोबत चांगले लोकं असो वा वाईट आम्हाला आपला चांगुलपणा सोडायला नको.
 
६) मृग- मृग आपल्या मस्तीत क्षुब्ध होऊन इतका धुंद होऊन जातो की त्याला मस्तीत तो आपले प्राण परस्वाधीन करतो. याने ही शिक्षा मिळते की कधीच मोहात अडकून बेपर्वा होऊन नाही.
 
७) समुद्र- समुद्रच्या लाटा निरंतर गतिशील असतात, तसेच जीवनातील चढ- उतारात आम्हाला खूश आणि गतिशील राहायला हवे.
 
८) पतंगा- जसे पतंगा आगीकडे आकर्षित होऊन जळून जातो, तसेच रंग-रूपाच्या आकर्षण आणि खोट्या मोहात अडकले न पाहिजे.

९) हत्ती- जसं काष्ठाच्या हत्तिणी सन्निध येण्यासाठी हत्ती विषयसुखलालसेने लुब्ध होऊन खड्ड्यात पडतो आणि सहजपणे मनुष्याच्या हातात सापडतो त्यापासून हे शिकण्यासारखे आहे की तपस्वी पुरुषाने आणि संन्यासी स्त्रीने दूर राहिले पाहिजे.
 
१०) आकाश- प्रत्येक परिस्थिती आणि काळात मोहापासून दूर राहण्याची शिक्षा आकाशाकडून मिळते.
 
१२) पाणी- मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहावे.
 
१३) मधमाशी- मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतू एक दिवस मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. याने शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे योग्य नाही.
 
१४) मत्स्य- लोखंडाच्या गळाला मांस पाहून जशी मासोळी भुलल्यामुळे मांस खायले जाते आणि आपल्या प्राणास मुकते त्याचप्रमाणे आम्हाला जिव्हेच्या स्वादाला अधिक महत्त्व द्यायला नको. आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घ्यावा.

 
 १५) टिटवी- ज्याप्रकारे एक टिटवी चोचीत मासा धरून असते आणि ते पाहून इतर पक्षी ते मास हिसकवण्याचा प्रयत्न करतात, आणि शेवटी मासाचा तुकडा सोडल्यावरच तिला शांती मिळते. तसेच आम्हाला स्वत:कडे अधिक वस्तू संजय करून ठेवण्याचा अट्टहास करायला नको.
 
१६) बालक- जसे लहान मुलं चिंतामुक्त आणि प्रसन्न दिसतात तसेच आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
 
१७) अग्नी- परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीत स्वत:ला समायोजित करणे योग्य ठरतं.

१८) चंद्र- जसे चंद्राला अमावास्या आणि पौर्णिमा आल्यावरही अर्थात कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार त्याला बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
 
१९) कुमारिका- देवाने बघितले की एकदा एक कुमारिका धान्य कुटत होती. तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते. बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक-एक बांगडी राहू दिली. नंतर कुमारिकेने आवाज केल्याविना धान्य कुटून घेतले अर्थात आम्हालाही एका बांगडीप्रमाणे एकटे आणि निरंतर वाढत राहण्याची प्रवृत्तीसह जगायला हवं.
 
तीर तयार करणारा कारागीर- दत्त देवाने एक असा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग्न होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्ष वेधीत झाले नाही. अत: आम्हाला अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करावे.
 
२०) साप- देवाने सापाकडून ही शिकले की संन्यासीसारखे जगावे. जसे दोन साप कधीही एकत्र फिरत नाही तसेच दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये. कोणत्याही एका जागेवर न थांबता इकडे- तिकडे विचरण करत ज्ञानाचा प्रसार करावा. 
 
२१) कोळी- कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करतो आणि त्या घरास गिळून मोकळा होता, तसेच ईश्वर मायेने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा नाश करतो. अर्थातच जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये.
 
२२) भ्रमरकीट- भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारा त्याला पावतो.
 
भ्रमर- सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.
 
२३) भुंगा- याकडून देवाने शिकले की जिथे सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काल ग्रहण कराव्या, ज्याप्रकारे भुंगा वेगवेगळ्या फुलांतून पराग घेतो.
 
२४) अजगर- अजगराकडून हे शिकायला मिळाले की जीवनात संतोषी बनून राहावे. जे मिळेल ते सुखसमाधाने स्वीकार करणेच आपले धर्म समजावे.
 
उत्तर लिहिले · 12/1/2023
कर्म · 48555
1

झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये? अशी आहे मान्यता


तुम्ही सर्वांनी हिंदू धर्मातील अनेक प्रकारच्या श्रद्धांबद्दल ऐकले असेल. होय, अशी अनेक कामे आहेत जी शुभ आणि अशुभ चिन्हांशी जोडून पाहिली जातात. होय आणि याशिवाय अनेक नियम देखील सांगितले आहेत, हे नियम आपल्याला लहानपणापासून शिकवले जातात. जर एखादी व्यक्ती झोपत असेल किंवा पडून असेल तर त्याचे उल्लंघन करू नये असा नियम यात समाविष्ट आहे. खरे तर असे म्हटले जाते की झोपलेल्या व्यक्तीला पार करणे शुभ नाही. जाणून घ्या या मागचे कारण.
 
होय, यामागे महाभारताचा संदर्भ असल्याचे मानले जाते. या प्रसंगानुसार, एकदा भीम युद्धासाठी जात असताना, हनुमानजी भीमाचा मार्ग अडवण्यासाठी म्हाताऱ्या माकडाच्या रूपात रस्त्यावर पडून होते. त्याच्या शेपटीने संपूर्ण मार्गात अडथळा आणला. ज्यामध्ये भीम त्या मार्गावरून गेला तेव्हा त्याने शेपूट ओलांडली नाही तर हनुमानजींना शेपूट काढण्यास सांगितले. परंतु भगवान हनुमानाने दुर्बलतेने शेपूट काढण्यास नकार दिला आणि शेपूट ओलांडून निघून जाण्यास सांगितले. पण भीमाने तसे केले नाही. भीम म्हणाले की, ईश्वराचा अंश या जगातील सर्व प्राण्यांमध्ये आहे, त्यामुळे कोणत्याही प्राण्याला अशा प्रकारे पार करणे म्हणजे देवाचा अनादर करण्यासारखे आहे. यामुळे भीमाने हनुमानजीची शेपटी ओलांडली नाही तर स्वतः शेपूट काढायला सुरुवात केली.
 
जेव्हा भीमाला सर्व शक्ती वापरूनही हनुमानजीची शेपटी हलवता आली नाही, तेव्हा त्याला समजले की तो सामान्य वानर नाही. यानंतर हनुमानजींनी भीमाची ओळख करून दिली आणि मोठे रूपही दाखवले. यासोबतच हनुमानजींनी भीमाला युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला. असे म्हटले जाते की या कारणासाठी झोपलेल्या किंवा पडलेल्या व्यक्तीला ओलांडू नये.

उत्तर लिहिले · 13/12/2022
कर्म · 48555
2
२ मुखी हा अर्धनारी नटेश्वर चे प्रतीक आहे. हा धारण केला तर व्यक्तीमत्वात अमुलाग्र बदल होतो.धारणकर्त्याची कुण्डलिनी जागृत करण्याचा मार्ग सुलभ होतो. तो समोरच्या व्यक्तीला क्षणार्धात वश करू शकतो. पती पत्नी मधील ऐक्य, वैवाहिक सौख्य,दुःख नाश, मनः शांती, उद्योगधंदा व प्रगती साठी हा धारण करतात.





 
२ मुखी रुद्राक्ष
₹१७५०.००

दोन मुखी रुद्राक्ष भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहेत. या रुद्राक्षात चंद्राचे अशुभ प्रभाव दूर करण्याची क्षमता आहे.दोन मुखी रुद्राक्षांवर चंद्र देवाची कृपा आहे. दोन मुखी रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्यावर मन शांत राहते, मनाला चंद्राप्रमाणे शीतलता मिळते. चंद्र देव...


दोन मुखी रुद्राक्ष भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहेत. या रुद्राक्षात चंद्राचे अशुभ प्रभाव दूर करण्याची क्षमता आहे.दोन मुखी रुद्राक्षांवर चंद्र देवाची कृपा आहे. दोन मुखी रुद्राक्षाची जपमाळ धारण केल्यावर मन शांत राहते, मनाला चंद्राप्रमाणे शीतलता मिळते. कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी दोन मुखी रुद्राक्षाची जपमाळ धारण करणे ही भाग्याची गोष्ट आहे. ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो त्यांनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावेत. दोन मुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ आणि मानव कल्याणासाठी सर्वोत्तम मानले जातात. या रुद्राक्षाला देवेश्वर असेही म्हणतात. हा रुद्राक्ष अर्धनारीश्वराचे प्रतिनिधित्व करतो. जर तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्राची स्थिती खराब असेल, चंद्र कमजोर असेल तर ही जपमाळ तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकते.

वर्णन

आकार आणि मूळ: हिमालयीन रुद्राक्ष ड्रॉप आकाराचा
वजन (ग्रॅम): ~2.5-4.2
मापन: ~२३*३०
प्रमाणन: astrobell.com
रंग: गडद तपकिरी
दोन मुखी रुद्राक्षाची उत्पत्ती
दोन मुखी रुद्राक्षांचा उगम इंडोनेशिया, नेपाळ आणि भारतातील अनेक भागांतून होतो, परंतु नेपाळमधील दोन मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात . शिवमहापुराणानुसार हा रुद्राक्ष धारण केल्याने ब्रह्महत्या, गोहत्या यासारख्या पापांपासून मुक्ती मिळते.

2 मुखी रुद्राक्ष कोण घालू शकतो?
जर कुंडलीत चंद्र कमजोर असेल किंवा अस्त झाला असेल तर दोन मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन मुखी रुद्राक्षांचा स्वामी चंद्र आहे. या कारणास्तव, दोन मुखी रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीमध्ये शांतता, संयम, खेळकरपणा, शीतलता आणि नेतृत्व क्षमता विकसित होते. ते परिधान केल्याने व्यक्ती मानसिक तणावापासून मुक्त होते आणि आत्मविश्वास आणि मानसिक शांती मिळते. कर्क राशीच्या लोकांसाठी हा रुद्राक्ष वरदानापेक्षा कमी नाही, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी हे दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे.

2 मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे नियम
दोन मुखी रुद्राक्ष धारण करणारी व्यक्ती चांगल्या आचरणाची अनुयायी असावी.
दोन मुखी रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीची भगवान शंकरावर गाढ श्रद्धा असावी.
मांस, मद्य किंवा इतर मादक पदार्थांपासून दूर राहावे.
धारण पद्धत
सोमवार किंवा शिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ असते.
रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी गंगाजल किंवा कच्च्या दुधाने रुद्राक्षाची शुद्धी करावी.
रुद्राक्ष जागृत करण्यासाठी ओम नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा .
2 मुखी रुद्राक्षाचे फायदे
दोन मुखी रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीमध्ये शांतता, संयम, खेळकरपणा, शीतलता आणि नेतृत्व क्षमता विकसित होते.
ते घातल्यानंतर व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. समाजात प्रसिद्धी मिळते. मन शांत राहते.
दोन मुखी धारण केल्याने व्यक्ती मानसिक तणावातून मुक्त होऊन आत्मविश्वास व मन:शांती मिळते.
या रुद्राक्षाच्या प्रभावामुळे मनात चुकीच्या भावना उत्पन्न होत नाहीत, व्यक्ती मानसिक शांतीसाठी देवाचा आश्रय घेतो, धार्मिक कार्यात रुची वाढते.
कर्जासारख्या परिस्थितीचा सामना करणाऱ्या लोकांना कर्जापासून मुक्ती मिळते, दोन मुखी रुद्राक्षांमध्ये शिव आणि पार्वतीची शक्ती असते, ज्यामुळे मानवाला फायदा होतो.
जी व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनावर नाराज आहे, पती-पत्नीमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होत आहेत, विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे, अशा व्यक्तीने दोन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते.

उत्तर लिहिले · 26/10/2023
कर्म · 48555
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही