झोप शरीर

अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

2 उत्तरे
2 answers

अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात?

2
अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते, हार्मोनिक इम्बॅलन्सही वाढतो. सुस्ती जाणवते, वजन वाढतं. कदाचित सिगारेट, दारूचं व्यसनही लागू शकतं. याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होत असतो.
अपुऱ्या झोपेमुळे होतात ‘हे’ पाच परिणाम
अपुऱ्या झोपेमुळे होतात ‘हे’ पाच परिणाम
अपुरी झोप
  
आपल्या मेंदूनं व्यवस्थित काम करावं यासाठी आठ तास झोप मिळण्याची गरज असते. मात्र हल्ली बऱ्याच कारणांनी झोप अपुरी राहते. त्याचे परिणाम हळूहळू दिसायला सुरुवात होते. बदललेली शैली, कामाच्या वेळा, असणारा ताणतणाव, मोबाईल अथवा गॅझेट्सचा अतिवापर या सगळ्यामुळे सध्या झोप कमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अपुरी झोप अर्थात निद्रानाश. यामुळे आरोग्यावर अतिशय विपरित परिणाम होतात. झोप न येण्याची कारणं काहीही असली तरी त्याचा मेंदूवर नकारात्मक परिणाम होत असतो. जाणून घेऊया काय होतात अपुऱ्या झोपेचे परिणाम?
१. मेंदूच्या कार्यावर होतो परिणाम – पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करण्याची अर्थात मन एकाग्र करण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर होतो. पण ८ तास झोप मिळाली तर तुम्ही पूर्ण दिवस आनंदी आणि तरतरीत राहू शकता.
२. सतत मूड बदलत राहतो – कमी झोप मिळाल्यामुळे एका क्षणात हसणं तर दुसऱ्याच वेळी उदास होणं अशा तऱ्हेनं जर तुमचा मूड सतत बदलत राहतो. काळजी, ताण, नैराश्य, सतत विचार करणं या कारणांमुळे तुमचा मूड सतत बदलू शकतो. या सगळ्या गोष्टींमुळे झोप पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो.
३. अपुऱ्या झोपेमुळे जडतात रोग – सतत विचार, चिंता आणि वैताग यामुळे झोप अपुरी होते. त्यामुळे ह्रदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा, निराशा असे रोग तुम्हाला जडतात. एकदा हे रोग जडले की, तो बरा होणं शक्य नसतं. त्यामुळे रोज आठ तास झोप मिळालीच पाहिजे याची काळजी घ्यावी.
४. स्मरणशक्तीवर होतो परिणाम – अपुऱ्या झोपेमुळे स्मृतीभ्रंश अर्थात स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विचार करण्याच्या शक्तीवर मर्यादा येतात. या सगळ्याचा परिणाम सकारात्मक विचारसरणीवरदेखील होतो. एखादी गोष्ट शिकण्याची तुमची क्षमता खालावत जाते. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे एकाग्रतेवरदेखील परिणाम होतो.
५. मनोविकार उद्भवू शकतात – अपुरी झोप ही गंभीर समस्या आहे. मात्र लोक त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. त्यामुळे अतिविचार करून मनोविकार उद्भवतात. याकडे वेळेवर लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
एखादी गोष्ट शिकण्यासाठी, आरोग्याच्या समस्या आणि सायकायट्रिक डिसऑर्डर्स टाळण्यासाठी शांत आणि पुरेशा झोपेची आवश्यकता आहे.


उत्तर लिहिले · 2/1/2022
कर्म · 121765
0
येथे काही परिणाम आहेत जे अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर होऊ शकतात:

रोगप्रतिकारशक्ती कमी होणे: झोप कमी झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे अनेक रोगांचा धोका वाढतो.

वजन वाढणे: अपुरी झोप चयापचय क्रियेवर परिणाम करते, ज्यामुळे वजन वाढू शकते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या: झोप कमी झाल्यास उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

मानसिक आरोग्य समस्या: अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक समस्या वाढू शकतात.

एकाग्रता कमी होणे: झोप कमी झाल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते, स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

मधुमेह: अपुरी झोप इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

त्वचेवर परिणाम: पुरेशी झोप न मिळाल्यास त्वचेवर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसू लागतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 680

Related Questions

जास्त वेळ झोपण्याचे नुकसान काय आहे?
अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी काय खावे म्हणजे झोप पण येणार नाही आणि पोट पण भरेल?
रात्रीच्या वेळी जास्त गाढ झोप लागू नये आणि अधून मधून जाग यायला पाहिजे, यासाठी काय करावे?
जेवल्यानंतर झोप का येते? जेवल्यानंतर झोपणे योग्य की अयोग्य?
30 ते 40 वयातील पुरुषांनी किती वेळ झोप घ्यावी?
टिटवी या पक्षाचे अंडे मनुष्य प्राण्याने खाल्ले तर त्याची झोप पूर्णपणे नाहीशी होते का?
तुम्ही दररोज किती तास झोप घेता?