झोप
तुम्ही दररोज किती तास झोप घेता?
1 उत्तर
1
answers
तुम्ही दररोज किती तास झोप घेता?
4
Answer link
तुम्ही किती तास झोपता? कोणत्या वयाच्या व्यक्तीने किती तास झोपले पाहिजे?
उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये मानसिक ताणतणाव जास्त असतो. यामुळे आजकाल बहुतेक लोकांना नीट झोप येत नाही.
उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये मानसिक ताणतणाव जास्त असतो. यामुळे आजकाल बहुतेक लोकांना नीट झोप येत नाही. झोप आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाची असते.
आपण किती तास झोपतो आणि किती तास आपल्याला चांगली झोप येते, हे आपण किती हेल्दी आणि निरोगी आहोत, यावरून समजते. वयानुसार प्रत्येकाला 7 तास ते 15 तासांची झोपेची आवश्यकता असते. डॉक्टरांनी नवजात बाळाबद्दल सांगितले की, त्यांना सर्वात जास्त झोपेची आवश्यकता असते. 3 ते 11 महिन्यांच्या बाळाला दिवसात किमान 14-15 तासांची झोप आवश्यकत असते
12 महिन्यांपासून 35 महिन्यांपर्यंतच्या मुलांना म्हणजेच एका वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 12 ते 14 तासांची झोप पाहिजे
3 ते 6 वयोगटातील मुलांना 11 ते 13 तासांची झोपेची आवश्यकता असते. 6 ते 10 वर्षांची मुले, डॉक्टर त्यांना सांगतात की, त्यांना किमान 10 ते 11 तासांची झोपेची आवश्यकता असते. त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी झोप आवश्यक असते
11 ते 18 वयोगटातील तरूणांना सुमारे 9 तासांची झोप आवश्यक असते. तर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सरासरी 8 तास झोपेची आवश्यकता असते. वृद्धांसाठी देखील 8 तास झोप आवश्यक असते.