औषधे आणि आरोग्य दंड कोरोना आरोग्य

कोरोना ची लस दंडातच का देतात ?

1 उत्तर
1 answers

कोरोना ची लस दंडातच का देतात ?

12
--
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला शरीरातील काही महत्त्वाच्या काम करणाऱ्या संस्था समजून घेतल्या पाहिजेत. आपल्या शरीरात सर्व पेशींना शुद्ध रक्तपुरवठा करणे, त्यामधून त्यांना लागणारे अन्न पुरवणे आणि अशुद्ध रक्त माघारी घेणे ही कामे करणारी जी संस्था असते तिला रक्ताभिसरण संस्था (Blood Circulatory) म्हणतात. त्याचबरोबर आपल्या मेंदूपासून निघणारी आणि सर्व शरीरात पसरलेली अशी मज्जासंस्था (Nervous System ) असते, या दोन्हीबद्दल आपल्याला शालेय किंवा कॉलेज अभ्यासक्रमात शिकवले आहे. मात्र या दोन्हीसारखीच अजून एक संस्था असते ती म्हणजे लिम्फ सिस्टिम (Lymphatic system). यालाच शरीराची सांडपाणी यंत्रणा (sewage syatem) असे म्हणतात आधुनिक काळात याला लसीका प्रणालीसुद्धा, असे म्हणतात. या यंत्रणेबद्दल मात्र फारच कमी लोकांना माहीत आहे. आश्चर्य म्हणजे याबद्दल अनेक डॉक्टरांनासुद्धा माहीत नसते. ही यंत्रणा पेशींमध्ये नको असलेले पदार्थ बाहेर काढते आणि ते रक्तामध्ये सोडते. आपल्या रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडणारे सर्व द्रव काढून ते आपल्या शरीराच्या पेशींमधील द्रव पातळी राखते आणि महत्त्वाचे म्हणजे ही यानंतर आपल्या सामान्य आणि विशिष्ट रोगप्रतिकारक प्रतिक्रियांच्या चांगल्या कार्यप्रणालीसाठी म्हणजेच अतिशय महत्त्वपूर्ण असते.
या यंत्रणेचे संपूर्ण शरीरभर जाळे असते आणि त्या जाळ्याचे काही चेक पॉइंट्स असतात, त्यालाच लिम्फ नोडस् (Lymph nodes ) असे म्हणतात. याची काही उदाहरणे म्हणजे आपल्या गळ्याच्या वरच्या बाजूला असणारे टॉन्सिल्स हे अवयव, हे दोन्ही टॉन्सिल्स हे लिम्फ सिस्टिमचे चेक पॉइंट्स असतात, त्यांच्या शरीरातील स्थानामुळे ते तोंडावाटे किंवा नाकावाटे शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंना थांबवू शकतात. टॉन्सिलमध्ये पांढऱ्या रक्तपेशी जय रोगप्रतिकारक शक्तीचा सर्वात महत्त्वाचा घटक असतात आणि त्या शरीरात प्रवेश करणाऱ्या जंतूंना ठार मारण्यास कारणीभूत असतात. असेच काही रोगप्रतिकारक यंत्रणेचे चेक पॉइंट्स हे आपल्या दंडामधील स्नायूंमध्येसुद्धा असतात. याच दंडाच्या स्नायूंमध्ये रोगप्रतिकारक यंत्रणेमधील अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजेच डिन्ड्रिटिक पेशी असतात. या डिन्ड्रिटिक पेशी जंतूंच्या पृष्ठभागावर राहतात आणि त्याना शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतात.
डेन्ड्रिटिक पेशी स्थलांतरसुद्धा करत असतात, दंडामधून त्या शरीरातील वेगवेगळ्या ठिकणी लिम्फ नोड्समध्ये जातात. तेथे त्यांना पांढऱ्या रक्त पेशी, टी पेशी आणि बी पेशी आढळतात, या पेशी जे विशिष्ट रोगजंतूंपासून आपल्या शरीराचे रक्षण करण्यास मदत करतात. डेन्ड्रिटिक पेशी रोगजंतू ओळखणाऱ्या इतर पेशींना म्हणजेच टी आणि बी पेशींना आपल्याकडील माहिती देतात आणि त्यानंतर या पेशी अँटीबॉडीज (प्रतिपिंडे) तयार करण्यास सुरुवात करतात आणि कमी कालावधीतच त्या पेशी मोठ्या प्रमाणात एखाद्या रोगजंतूंच्या विरोधाचे गुणाकार पद्धतीने अँटीबॉडीज तयार करतात.
लस दंडाच्या स्नायूमध्ये दिली जाते तेव्हा तेथील डेन्ड्रिटिक पेशी लसीमधील असणाऱ्या रोगजंतू घटकाला ओळखतात आणि त्याची माहिती कमी वेळेतच टी आणि बी पेशींना देतात आणि मग लगेचच या पेशी अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करतात. दुसरे म्हणजे दंडाच्या स्नायूमध्ये असणारे काही घटक (गोल्डीलॉक्स टिश्यू) हे लस हळूवारपणे किंवा कमी वेगाने शरीरात इतरत्र पाठवतात, त्यामुळे लस दिल्यानंतर येणाऱ्या शरीराची प्रतिक्रिया (ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे) यांची तीव्रता कमी होते. लस जर औषधासारखी सलाईन किंवा इंजेक्शने रक्तवाहिन्यांमध्ये दिली तर ती एकदम रक्तामध्ये जाते आणि रक्तामधील काही प्रोटिन्स आणि इन्झाईम्स (Enzymes) लसीच्या घटकावर आक्रमण करून लसीला निष्प्रभ करतात. त्यामुळेच लस ही दंडात देतात.
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖➖
*(कॉपी पेस्ट)*
😊
उत्तर लिहिले · 6/3/2021
कर्म · 3965

Related Questions

पयावरणीय परीणाम आणि इलेक्ट्रॉनिकसवरील आरोग्यावर होणार परीणाम कमी करणे आहे?
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री?
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?
आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छता बाबत थोडक्यात माहिती लिहा?
आरोग्य हे एक देणगी?
💉जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चलाच का साजरा केला जातो?
खोकल्यामुळे छातीत का दुखते?