1 उत्तर
1
answers
मनगटावर लहान लहान पांढरे डाग आहेत, ही कोड असू शकतात काय ?
2
Answer link
प्रत्येक पांढरे डाग कोड असतीलच असे नाही.
बऱ्याचदा गजकर्ण किंवा त्या वर्गातील त्वचारोगांमुळे त्वचेतील मेलेनिन कमी पडते, व अशा वेळेस त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.
स्वछता राखल्यास आणि योग्य आहार ठरवल्यास हे डाग निघून जातात.
डाग जर एकदम पांढरा शुभ्र असेल आणि त्यावर इतर कुठलेही आवरण वा आकार नसतील तर ते कोड असू शकते.
असे असले तरीही हा नक्की काय प्रकार आहे हे एक त्वचारोगतज्ञच अचूक सांगू शकतील. त्यामुळे पहिले त्वचारोगतज्ञाला दाखवून घ्या.