त्वचेचे विकार
3
Answer link
फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?
बुरशीजन्य संसर्ग खूप सामान्य आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्या संसर्गापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी मजबूत नसल्यास बुरशीने थेट तुमच्या शरीरावर हल्ला केल्यावर बुरशीजन्य संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक संसर्ग आहे जो शरीरावर अनेक प्रकारच्या बुरशी किंवा बुरशीमुळे होतो, ज्यामध्ये डर्माटोफाइट्स आणि यीस्ट्स ठळकपणे आढळतात. जसे की - पायाची बोटे, टाच, नखे, गुप्तांग, स्तन इ.
बुरशीला मारणे कठीण असते. अनेक सूक्ष्मजंतूंप्रमाणे, काही बुरशी आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात आणि काही हानिकारक असतात. जेव्हा हानिकारक बुरशी आपल्या शरीरावर आक्रमण करतात तेव्हा त्यांना मारणे कठीण होऊ शकते, कारण ते वातावरणात टिकून राहू शकतात आणि व्यक्तीला पुन्हा संक्रमित करू शकतात. त्वचा आणि नखांच्या संसर्गासाठी, आपण औषध थेट संक्रमित भागात लागू करू शकता. गंभीर संक्रमणांसाठी तोंडावाटे अँटीफंगल औषधे देखील उपलब्ध आहेत. “बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे आणि कारणे काय असू शकतात ते जाणून घेऊया –
फंगल इन्फेक्शनचा त्रास; करा हे 6 घरगुती उपाय
उन्हाळ्यात आपल्याला अधिक घाम येतो आणि योग्य ती स्वच्छता घेतली नाही तर 'हा' आजार होण्याचा धोका अधिक असतो.
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे आपल्याला खूप घाम येतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांना आपण नकळत निमंत्रण देत असतो. सध्या असाच एक आजार सगळीकडे झपाट्यानं पसरतो आहे.1/ 8
उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामुळे आपल्याला खूप घाम येतो. आपण आपल्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांना आपण नकळत निमंत्रण देत असतो. सध्या असाच एक आजार सगळीकडे झपाट्यानं पसरतो आहे.
झपाट्यानं वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात त्वचेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ह्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपाय तुम्ही पर्यायी म्हणून करू शकता2/ 8
झपाट्यानं वाढणारा आजार म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात त्वचेची आणि स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ह्या आजाराला तुम्ही निमंत्रण देऊ शकता. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. काही घरगुती उपाय तुम्ही पर्यायी म्हणून करू शकता
कडुनिंब- कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकावा. त्या पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे पोट साफ होतं.3/ 8
कडुनिंब- कडुनिंब हे बुरशी मारण्यासाठी उत्तम औषध आहे. कडुनिंबाचा पाला आंघोळीच्या गरम पाण्यात टाकावा. त्या पाण्यानं स्वच्छ आंघोळ करावी. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट फंगल इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी. रोज दोन कोवळी पानं खावी. त्यामुळे पोट साफ होतं.
तुरटी- फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.4/ 8
तुरटी- फंगल इन्फेक्शनमध्ये सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुरटी. तुरटीचं पाणी इन्फेक्शन झालेल्या जागी लावावं ते पुसून टाकू नये. आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवावी.
लसूण- अॅन्टीफंगल म्हणून लसूण काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणीच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं.5/ 8
लसूण- अॅन्टीफंगल म्हणून लसूण काम करतं. ऑलिव्ह ऑइलमध्ये लसणीच्या पाकळ्यांचा रस काढून ते तेल लावावं.
कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम त्वचेवर लावू नका.6/ 8
कोरफडीचा गर काढून तो फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावावा. त्यामुळे खाज सुटणार नाही. त्वचेची आग होणार नाही. कोणताही साबण किंवा केमिकल असलेल्या क्रीम त्वचेवर लावू नका.
खोबरेल तेल- शुद्ध खोबरेल तेल फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला पाळावा.7/ 8
खोबरेल तेल- शुद्ध खोबरेल तेल फंगल इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी लावून मालिश करावी. दालचिनीचं तेल आणि खोबरेल तेल दोन्ही समप्रमाणात घेऊन लावावं. मात्र सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनला चालेल असं नाही त्यामुळे डॉक्टरांनी तेल लावू नये असं सांगितलं असेल तर डॉक्टरांचा सल्ला पाळावा.
स्वच्छ कोमट पाण्यानं दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तातडीनं डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार सुरू करावेत.8/ 8
स्वच्छ कोमट पाण्यानं दिवसातून दोन वेळा आंघोळ करा. कपडे स्वच्छ उन्हात सुकवा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कपड्याला इस्त्री करा. त्यामुळे कपड्यावरील फंगलचे विषाणू मरण्यास मदत होईल. फंगल इन्फेक्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तातडीनं डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार सुरू करावेत.
2
Answer link
प्रत्येक पांढरे डाग कोड असतीलच असे नाही.
बऱ्याचदा गजकर्ण किंवा त्या वर्गातील त्वचारोगांमुळे त्वचेतील मेलेनिन कमी पडते, व अशा वेळेस त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात.
स्वछता राखल्यास आणि योग्य आहार ठरवल्यास हे डाग निघून जातात.
डाग जर एकदम पांढरा शुभ्र असेल आणि त्यावर इतर कुठलेही आवरण वा आकार नसतील तर ते कोड असू शकते.
असे असले तरीही हा नक्की काय प्रकार आहे हे एक त्वचारोगतज्ञच अचूक सांगू शकतील. त्यामुळे पहिले त्वचारोगतज्ञाला दाखवून घ्या.
2
Answer link
गजकर्ण हा असा त्वचाविकर आहे कि एकदा झाल्यावर परत येउ शकतो.त्यामुळे त्याची योग्य ट्रीटमेंट घेणे, काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच डाॕक्टर जोपर्यंत उपचार चालु ठेवण्यासाठी सांगतात.तोपर्यंत उपचार बंद करु नये.खुप वेळा असे होते की आपल्याला वाटते कि आपण आता बरे झालो आहोत आणि आपण उपचार बंद करतो. पण तसे केले तर काही काळानंतर गजकर्ण परत येउ शकते.त्यामुळे उपचार चालु ठेवा आणी कुठल्यातरी एकाच डाॕक्टर कडे ट्रीटमेंट चालु ठेवा म्हणजे नक्की बरे व्हाल.
3
Answer link
आपण सर्वात प्रथम स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करा, आपण आपला चेहरा हा तीन वेळेस धून घेत जा आणि आपण पंतजली चे ऍलोवेरा जेल लावत चला, आपण चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही कंपनी चे गुलाब जल वापरा दिवसातून तीन वेळा, नक्की फायदा होईल, क्रीम बद्दल माहिती हवी असेल तर सर्वात प्रथम आपण आपल्या चेहऱ्याचा type कोणता आहे ते पाहून मार्केट मध्ये भरपूर प्रमाणात क्रीम उपलब्ध आहेत,
त्याच बरोबर आपण आपल्या खान पान वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याचा परिणाम फार मोठा असतो
*****धन्यवाद*****
त्याच बरोबर आपण आपल्या खान पान वर लक्ष केंद्रित केले पाहिजे, त्याचा परिणाम फार मोठा असतो
*****धन्यवाद*****
11
Answer link
गजकर्णावर बरेच मलम बाजारात उपलब्ध आहे पण ते काहीच कामाचे नाही असे मी म्हणेल कारण ते सर्वांना च फायदेशीर ठरेल असे नाही काही वेळेस त्या मलम मुळेच गजकर्ण जास्त होते.
जर तुम्ही डॉकटर कडे गेल्यावर तुम्हाला डॉकटर कमीत कमी 200 ते 300 रु च्या गोळ्या औषध लिहून देईल.
त्यामुळे तुम्हला एक घरगुती उपाय सांगतो.
रामबाण आहे आणि थोडा त्रासदायक पण एकाच दिवसात फरक पडेल.
जिथे गजकर्ण झाले आहे तिथे कोमट पाण्याने साबण लावून धुवून घ्यावी व अंग घासायच्या घासणीने घासून साफ करावी (घासणीने घासावेच)
मग ती जागा संपूर्ण कोरडी करावीत 15मी नंतर डेटॉल लिक्विड घ्यावे व गजकर्णावर लावावे त्यामुळे खूप आग होईल पण आग होऊ द्या.
आणि संपूर्ण दिवस ती जागा ही कोरडीच राहील याची मात्र काळजी घ्या
एकाच दिवसात फरक पडेल तुम्हला

हिवाळ्यातही त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. फंगल इन्फेक्शनही होण्याचा धोका असतो. फंगल इन्फेक्शन डोक्यासंबंधी असो वा त्वचेसंबंधी असो, त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असतं. त्वचेसंबंधी बॅक्टेरिअल आणि फंगल संक्रमण फार त्रासदायक ठरू शकतं. अशात याकडे लक्ष दिलं नाही तर ही समस्या अधिक वाढते.
डोक्याच्या त्वचेत अनेक इन्फेक्शन होतं. याची लक्षणे नॉर्मल स्किन इन्फेक्शनपेक्षा फार वेगळी असतात. डोक्याच्या त्वचेत फंगल इन्फेक्शन झालं तर त्वचेवर छोटे फोडं होतात. जाड, लाल आणि चिकट थर तयार होतो. ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर वेळीच उपाय केला गेला नाही तर तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ शकते.
त्वचेवर होणारं फंगल इन्फेक्शन सुद्धा फारच त्रासदायक असतं. यात त्वचेवर पुरळ येणे, लाल चट्टे, लाल पुरळ, पिंपल्स येतात. काही लोकांच्या हाताच्या त्वचेवरही एक थर तयार होतो.
¶ काय कराल उपाय?
वर सांगितलेलं फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी स्वत:ला कोरडं ठेवा. अॅंटी-बॅक्टेरिअल साबणाचा वापर करा. स्वच्छ कपड्यांचा वापर करा. शरीर स्वच्छ ठेवा. भिजलेले कपडे वापरू नका. याने फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होईल.
अॅलोव्हेरा जेल
अॅलोव्हेरा जेल त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यात मदत करतं. फंगल इन्फेक्शनमध्ये अॅलोव्हेरा जेलचा वापर केल्यास इन्फेक्शन कमी होतं. याने रॅशेज, खाज आणि जळजळ दूर केली जाते. यासाठी अॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा धुवावी.
कडूलिंबाची पाने
कडूलिंबाची झाडे तुमच्या आजूबाजूला बरीच असतील. या झाडाच्या पानांची पेस्ट, काढा अनेक प्रकारचे फंगल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात. कडूलिंबातील तत्व, जे एकप्रकारे अॅंटी-फंगल गुणाने भरपूर असतात. यासाठी कडूलिंबाची पाने बारीक करून पेस्ट तयार करा. यात एक चमचा लिंबाचा रस आणि हळद टाका. फंगल इन्फेक्शन झालेल्या भागात ही पेस्ट लावा. ३० मिनिटांने ही पेस्ट लावूनच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवा. याने त्वचा आणि डोक्याच्या त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील.