औषधे आणि आरोग्य
फंगल इनपेक्शन्स' कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?
2 उत्तरे
2
answers
फंगल इनपेक्शन्स' कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?
1
Answer link
फंगस ; अतिसूक्ष्म बुरशी यामुळे व्यक्तीस फंगल इन्फेक्शन होते.
निसर्गतः अतिसूक्ष्म जिवाणू व बुरशी मानवी शरीरामध्ये आढळतात ते आपल्या आरोग्यास हितकारक असतात.
ओल्या व दमट ठिकाणी च फक्त फंगल इन्फेकॅशन होत असे नाही.
जेव्हा वाईट बुरशी शरीरावर आक्रमण करते व मानवी रोगप्रतिकारक शक्ती विरुद्ध लढण्यास सक्षम नसते किंवा कमी पडते तेव्हा व्यक्तीस फंगल इन्फेक्शन होते.
सतत अँटिबायोटिक्स, आजार पन , डायबिटीस, ओलसर अंगांची योग्य निगा ना राखल्यास.
वाईट बुरशी वातावरणातही योग्य प्रकारे तग धरून पुन्हा मानवास बाधित करण्याची शक्यता असते.
इन्फेक्शन नेमका कुठे झालं हे ही महत्त्वाच असत.
इन्फेक्शन किती आहे, कुठवर पसरलाय, त्वचेच्या आत किती खोल वर गेलाय हे ही महत्वाचं.
उपाय:

कुठल्या फंगस मुळे इन्फेक्शन झालं आहे त्यानुसार डॉक्टर योग्य अशी औषधे किंवा मलम देतीलच.
वेगवेगक्या ठिकाणी वेगवेगळे फंगस आक्रमण करतात.
वर वर ऐकून किंवा सांगून कुठले ही औषध घेऊ नये.
त्याबरोबर तुम्ही रोज रात्री झोपताना आंबेहळद कोमट पाण्यातुन घेऊ शकता. आंबेहळद ही जिवाणू व बुरशी नाशकाच काम करते.
रोज 1 चम्मच हळद योग्य आहे, जास्त प्रमाणात घेऊ नये.
उष्णतेचा त्रास असल्यास हळद वर्ज आहे.
कपडे, बेडशीट, टॉवेल यांना गरम पाण्यात, थोडे dettol टाकून भिजवून ठेवावें मग धुवावे.
जर खूप घाम येत असेल तर 2 वेला अंघोळ करावी.
पाण्यात तुरटी फिरवून घ्यावी.
कोरडे व स्वच्छ अशी शारीरिक निघा राखणे.
डेटॉल स्किन care साबण वापरू शकतो, (सर्वाना मानवेल अस नाही. फक्त skin care!)
ग्रसीत भागात जास्त साबण किंवा रसायनांचा वापर कोरडे पण, खाज वाढवू शकत.