औषधे आणि आरोग्य

मोतीबिंदुवर घरगुती उपचार कोणता करता येईल?

1 उत्तर
1 answers

मोतीबिंदुवर घरगुती उपचार कोणता करता येईल?

2
मोतीबिंदू वर घरगुती उपचार 
मुळात हा आजार होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे.

परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.

ह्या उपायांबी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.

आज आपण हे घरगुती उपाय कोणते ते पाहूया

१. बडीशेप आणि धने समप्रमाणात घेऊन त्यात पिठीसाखर मिसळून ठेवाली. हे मिश्रण दररोज सकाळ संध्याकाळ १० ग्राम सेवन करावे.
सकाळ संध्याकाळ १० ग्राम संपन फसल

ह्याचा मोतीबिंदू लवकर न पिकण्यासाठी खूप फायदा होतो.



१. ६ बदाम आणि ७ काळी मिरीचे दाणे कुढून त्यात पाणी घालून ते गाळून घ्यावे. त्या पाण्यात पिठीसाखर मिसळून ते प्यावे. मोतिबिंदुवर गुणकारी आहे.

3. १० ग्राम गुळवेलीच्या रसात १ चमचा सैंधव आणि एक चमचा मध घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट काजळाप्रमाणे डोळ्यात घालावी.
त्रिफळ्याची पाणी घालून घट्ट पेस्ट करून ती डोळ्यावर ठेवून मग त्यावर पट्टी बांधून ठेलाली. नंतर डोळे धुवून टाकावेत. खूप उपयोग होतो.



५. १० मिलि कांद्याचा रस. १० मिलि मध आणि १ ग्राम भीमसेनी कापूर एकत्र मिसळून ते मिश्रण सकाळ संध्याकाळ डोळ्यांना लावावे.

६. गाजर पालक आणि आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे.

७. एक चमचा धने बारीक कुटून एक कप पाण्यात उकळून घ्यावे. हे पाणी गाळून घेऊन सकाळ संध्याकाळ डोळ्यात घालावे.

८. नियमितपणे गाईचे दूध प्यावे. तसेच आहारात मेथी, भेंडी, पालक, केळी, द्राक्षे, सफरचंद, संत्रे, डाळिंब ह्यांचे नियमित सेवन करावे. फार आंबट व तिखट पदार्थ खाऊ नयेत.

११. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा देखील डोळ्यांवर थेट परिणाम होतो.

११. सतत कम्प्युटरवर काम करणे आवश्यक असेल तर दर अर्ध्या तासाने ५ मिनिटे ब्रेक घ्याला. तसेच डोळ्यांचे व्यायाम नियमित करावेत.

हे आहेत मोतीबिंदू वाढू न देण्याचे घरगुती उपाय. ते जरूर करून पहा. हयाबरोबरच आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी डॉक्टरांकडून करत राहणे देखील आवश्यक •आहे. ती देखील करत रहा. आपल्या डोळ्यांची काळजी घ्या.
उत्तर लिहिले · 11/1/2023
कर्म · 48555

Related Questions

अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी तुमच्या परिसरामध्ये जनजागृतीसाठी कोणते प्रयत्न कराल?
रेबीज या आजाराची लस कोणी तयार केली?
गुडघेदुखी थांबण्यासाठी कोणत्या गोळ्या केमिस्टकडे मिळतात?
चेहऱ्यावरील मुरमाचे डाग कसे घालवावे?
वजन कसे कमी होते?
फंगल इनपेक्शन्स' कशामुळे होते, त्यावर उपाय कोणता करावा?
स्टेम सेल पावडर कशासाठी आहे व कशी वापरायची? कोणत्या त्रासासाठी/दुखण्यासाठी वापरतात?