1 उत्तर
1
answers
उपवासाला कॅडबरी चालते का?
10
Answer link
माझ्या माहेरी ताई उपवास धरताना मी पाहिले होते की ती साबुदाणा खिचडीत जिरं, कढीपत्ता, मिरची, दाण्याचा कूट, काळीमिरी पूड अशी जिन्नस टाकत.
माझ्या सासरी सासू दर रविवारी घरातील कुलदैवत खंडोबा यांच्या साठी उपवास धरत. त्या साबुदाणा खिचडीत फक्त मिरची आणि दाण्याचा कूट टाकत. कोथिंबीर, काळीमिरी पूड, जिरं अगदी कढीपत्ता देखील त्यांना त्यात चालत नसे.
माझ्या आई बाबांच्या गावी कोकणात लग्नाआधी मी जायचे तेव्हा समोरच्या आत्याकडे(आम्ही आक्का असे हाक देत) दिवसभर पडवीत खेळायला किंवा असंच गप्पा मारायला बसत. त्यांचा उपवास असायचा तेव्हा ते उपवासाच्या पदार्थांत उपवासाचे मीठ (सैंधव) वापरायचे.
माझी गोड मैत्रीण ती दर मंगळवारी उपवास ठेवते. तिला घरात उपवासाच्या वेळेस मांसाहार पदार्थ बनविलेले आवडत नाही पण इतरांना खायचे असतात म्हणून नाईलाज म्हणून बनवते. मग ती फक्त दिवसभर चहावर असते.
मी स्वतः उपवास धरत नाही. फक्त माझ्या लग्नात मला धरायला लावलेला. पण एक दिवस सर्वांचं मन राखण्यासाठी मी तो उपवास धरला. तेव्हापासून मला उपवास हा प्रकार आवडायला लागला. उपवासाच्या नावाने तर मला भरपूर वेफर्स खायला मिळत असे.
आता वरील प्रसंग प्रासंगिक घटना आहेत. यात वास्तव आहे. वेगवेगळी माणसं. वेगवेगळे विचार. साबुदाणा खिचडी एकच. पण उपवासात ती बनवताना प्रत्येक घरात त्यांच्या मनानुसार ठरलं असतं की यात आपण कोणते पदार्थ टाकून खाल्ले पाहिजे.
सांगण्याचा उद्देश काय तर, उपवासात काय खावे अन काय खाऊ नये हे मानवच ठरवतो.
मला दररोज कॉफी पिणे आवडत नाही.
ग्रीन टी शरीराला खरच चांगली असते पण मी ती घेत नाही. मला चहाच आवडते. ग्रीन टी घेणं चांगलं असतं पण ते मी मनापासून स्वीकारलं नाही. म्हणून ग्रीन टी पिण्याने माझ्या शरीरावर कोणतेच चांगले परिणाम दिसून येणार नाही कारण मी त्यास स्वीकारले नाही. मला चहा आवडते. सकाळी प्यायल्याने फ्रेश वाटतं. कॉफी पिणं म्हणजे आमच्या घरात एक छोटासा कॉफी सेलिब्रेशन असतो.
तसेच उपवास करताना तुम्ही मनातून उपवास धरत असाल तर तुम्ही आंतरिक ऊर्जेने दिवसभर उपाशी राहू शकता. यामुळे तुम्हाला पित्त, चक्कर येणे असे कोणतेच दुष्परिणाम तुमच्यावर घडणार नाही. कारण ते तुम्ही मनातून उपवास करणे स्वीकारले आहे.
जर तुम्ही मनापासून स्वीकारलं नसेल उपवास तर तुमच्या मनाला समोर येईल त्या गोष्टी खाव्याश्या वाटतात.
मनाचे खेळ आहेत हे!!
उपवास हा शरीरशुद्धीसाठी आणि पोटाला आराम मिळण्यासाठी होय.
(तुमचा मूळ प्रश्न:- उपवासाला कॅडबरी चालते का??
उत्तर :- नाही)
एकादशीला अनेक पुरुष मंडळी उपवास धरताना जवळून पाहिलीत. उपवास असताना मावा खाणे, तंबाखू खाणे, सिगारेट ओढणे हे सर्व चालूच असतं. मग त्यांना हे अंमली पदार्थ उपवासात चालत असेल तर कॅडबरी हा उपवासासाठी तर उत्तम असेल. कॅडबरी यात एनर्जी असते. ज्यामुळे आपले मन आणि पोट ही भरू शकते.
उपवास धरताना साबुदाणा, भगर, शिंगड्याचे पीठ हे का वापरतात. तर मनुष्य श्रम करतो. त्यास श्रम करण्यास ऊर्जा मिळावी म्हणून ही पदार्थ भूक शमविण्याचं उत्तम काम करतात. आणि पौष्टिक ही असते. साबुदाणा हा वाळवून सडवून बनविला जात नाही. एका साबू वनस्पतीच्या खोडापासून याची निर्मिती केली जाते.
उपवास करा हो!! पण आपल्या शरीराला आनंद मिळेल, आराम मिळेल म्हणून उपवास धरावा.
साबुदाणे वडे, वेफर्स, उपवासाच्या पुऱ्या बनवून शरीर शुद्ध होत नाही.
दूध, फळे, वरई भात आणि शेंगदाण्याची आमटी असा सकस आहार घेण्याचा प्रयत्न करावा.
तेही अगदी प्रमाणित घ्यावे.