3 उत्तरे
3
answers
एकादशीला मांसाहार करणे चालते का ?
2
Answer link
बिलकुल नाही . एकादशीला मांसाहार वर्ज्य आहे . मांसाहार केल्याने मानवाची तामस प्रवृत्ती वाढते . सहा विकारांमध्ये असणारा क्रोध वाढतो. खरे तर मांसाहार हा जिभेने पाणी पिणाऱ्या प्राण्यांचा आहार आहे. आपला नाही. पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे . पण माझे असे प्रांजळ मत आहे की कोणत्याही माणसाने मांसाहार करू नये .
2
Answer link
आपण जेंव्हा उपवास करतो. तेंव्हा आपले आचरण शुद्ध व सात्त्विक असावे. अर्थात उपवास करण्याचा हेतू प्रत्येकाचा वेगळा वेगळा असु शकतो. परंतु, हिंदू रिवाजाप्रमाणे उपवास हा शरिरातील पचन यंत्रणेला विश्रांती देण्यासाठी व काही व्रतवैकेल्लय करण्यासाठी करतात. तुम्ही जर लंघन करणार असला तरी हलका आहार घेणे श्रेयस्कर असते. व त्यामुळे उपवास करताना आहार पचावयास हलका व सात्त्विक असावा. मांसाहार पचण्यास जड असल्याने मांसाहार उपवासाच्या दिवशी करु नये.
1
Answer link
1 )
एकादशी दिनी खाईल जो अन्न ॥ सुकर होऊनि येईल जन्मा ॥१॥
एकादशी दिनी करील जो भोग ॥ त्यासी माता संग घडतसे ॥२॥
एकादशी दिनी खळेल जो सोंगटी ॥ काळ हाणील खुंटी गुदस्थनी ॥३॥
रजस्त्री शोणीत सेविल्या समान ॥ तांबुल चर्वण करील जो ॥४॥
नामा ह्मणे नाही माझ्याकडे दोष ॥ पुराणी हे व्यास वाक्य आहे ॥५॥ ॥
2 )
एकादशीस अन्न पान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठे समान ।
अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान ।
नेमें आचरती जन ।
गाती ऐकतीं हरीकीर्तन ।
ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ ।
विडा भिक्षतां तांबूल ।
सांपडे सबळ ।
काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग ।
करी कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग ।
जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना ।
अणिकां वारी जातां कोणा ।
त्याच्या पापें जाणा ।
ठेंगणा महा मेरु ॥४॥
तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलीया ॥५॥
एकादशी दिनी खाईल जो अन्न ॥ सुकर होऊनि येईल जन्मा ॥१॥
एकादशी दिनी करील जो भोग ॥ त्यासी माता संग घडतसे ॥२॥
एकादशी दिनी खळेल जो सोंगटी ॥ काळ हाणील खुंटी गुदस्थनी ॥३॥
रजस्त्री शोणीत सेविल्या समान ॥ तांबुल चर्वण करील जो ॥४॥
नामा ह्मणे नाही माझ्याकडे दोष ॥ पुराणी हे व्यास वाक्य आहे ॥५॥ ॥
2 )
एकादशीस अन्न पान ।
जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठे समान ।
अधम जन तो एक ॥१॥
ऐका व्रताचें महिमान ।
नेमें आचरती जन ।
गाती ऐकतीं हरीकीर्तन ।
ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥
अशुद्ध विटाळसीचें खळ ।
विडा भिक्षतां तांबूल ।
सांपडे सबळ ।
काळाहातीं न सुटे ॥२॥
सेज बाज विलास भोग ।
करी कामिनीचा संग ।
तया जोडे क्षयरोग ।
जन्मव्याधी बळिवंत ॥३॥
आपण न वजे हरीकीर्तना ।
अणिकां वारी जातां कोणा ।
त्याच्या पापें जाणा ।
ठेंगणा महा मेरु ॥४॥
तया दंडी यमदूत ।
झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत ।
एकादशी चुकलीया ॥५॥