उपवास

मी नेहमी संकष्टी चतुर्थी पकडतो पण या वेळेस माझ्या लक्षात नाही राहिले आणि माझा चतुर्थीचा उपवास सुटला काय करावे ?

1 उत्तर
1 answers

मी नेहमी संकष्टी चतुर्थी पकडतो पण या वेळेस माझ्या लक्षात नाही राहिले आणि माझा चतुर्थीचा उपवास सुटला काय करावे ?

1
तुम्ही  नेहमी संकष्टी चतुर्थी पकडता पण या वेळेस तुम्हाला लक्षात नाही राहिले आणि तुमचा चतुर्थीचा उपवास सुटला काय करावे काहीही नाही करायचं नाही परत पुढच्या वेळेस संकष्टी चतुर्थी चा उपवास करु शकता.
मुळात आपण देवाला घाबरतो.

कुठला तरी हेतू मनात ठेवून, स्वार्थी वृत्तीने उपवास करूच नये, उपवासाचा एक हेतू शास्त्रीय आहे, शरीर शास्त्रा प्रमाणे पोटाला आराम देऊन त्याला अजून कार्यक्षम ठेवण्याचा अन दुसरा हेतू आहे मनाने देवाजवळ राहण्याचा, आपण सध्याच्या युगात दोन्हीही हेतूंना हरताळ फासला आहे,

आपण सर्व आरत्या झाल्यावर एक श्लोक म्हणतो

त्वमेव माता च पिता त्वमेव,……..

ह्या श्लोकातील, सर्वात महत्वाचा, म्हणजे मला वाटणारा, आवडणारा भाव म्हणजे, त्वमेव बंधुश्च, सखा त्वमेव,

जर आपण देवाबद्दल हा भाव ठेवला तर मुळात उपवास केला असता, मोडला असता काही पाप लागेल का? का काही तोडगा करावा लागेल काय, असले प्रश्नच मुळात उद्भवणार नाहीत. चुकून काही खाल्ल्याने तो जगनियंता रागावणार मुळीच नाही, वृत्ती, हेतू प्रामाणिक असेल तर आणि तरच उपवास करण्याला अर्थ आहे, नाही का?

उत्तर लिहिले · 2/11/2023
कर्म · 48425

Related Questions

उपवास चा कालावधी किती असतो?
उपवासाला लवंग चालते का?
नवरात्रीमध्ये अडीच दिवसाचे उपवास कसे कधी करतात?
उपवासाला गाजर चालते का?
उपवासाला कॅडबरी चालते का?
उपवास म्हणजे नेमकं काय ?
एकादशीला मांसाहार करणे चालते का ?