उपवास
नवरात्रीमध्ये अडीच दिवसाचे उपवास कसे कधी करतात?
1 उत्तर
1
answers
नवरात्रीमध्ये अडीच दिवसाचे उपवास कसे कधी करतात?
1
Answer link
नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीच्या उपवासात नियमांचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. शास्त्रात नवरात्रीच्या उपवासासाठी काही नियम सांगितले गेले आहेत. नवरात्रीचा उपवास जरी कोणीही ठेवू शकतो, परंतु म्हत्वाचे काही दिवस उपवास कसा ठेवावा याबद्दल शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जरी नवरात्रीचे सर्व उपवास पाळण्याची परंपरा आहे, पण ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत किंवा त्यांच्यात तेवढी शक्ती नाही, त्यांच्यासाठी हे पर्यायही शास्त्रात नमूद केलेले आहेत.
पहिला प्रकार हा सप्तरात्र व्रत. हे व्रत प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत ठेवले जाते. अशाप्रकारे उपवास केल्याने एखाद्याला पूर्ण परिणाम मिळतो.
याशिवाय ज्यांना पूर्ण उपवास करता येत नाही, ते भक्त फक्त पंचमीला व्रत करू शकतात. या व्रतामध्ये तुम्ही एक वेळ जेवण करू शकता.
सहाव्या दिवशी नक्तव्रत म्हणजे रात्रीच्या जेवणासह उपवास आणि सप्तमीला अयानित व्रत केले जाऊ शकते. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीने न मागता जे काही मिळेल ते उपभोगले पाहिजे.
काही लोक ज्यांना सर्व उपवास शक्य नाहीत ते सप्तमी, अष्टमी आणि नवमीचे व्रत पाळू शकतात. याला त्रिरात्र व्रत म्हणतात.
जे प्रतिपदा आणि अष्टमीचे व्रत करतात त्यांना युगमरात्र व्रत म्हणतात. दुसरीकडे, जो फक्त उपवासाची सुरुवात आणि शेवट पाळतो त्याला एकात्र व्रत म्हणतात.
घटस्थापना : नवरात्री प्रारंभ, नातलगांना द्या नवरात्रोत्सवाच्या खास शुभेच्छा
उपवासाचे नियम
उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही चटईवर झोपू शकता. जो नवरात्रीचा उपवास करतो त्याने झोपेसाठी पलंग, गाद्या वापरणे टाळावे. शक्य असल्यास, ९ दिवस गादीशिवाय झोपा. त्या उपासकांनी जास्त अन्न खाऊ नये. जर तुम्हाला फक्त फळे किंवा थोड्या प्रमाणात फराळ करू शकता. उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा, उदारता आणि उत्साह आणावा. वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे. उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे. मनाला संयमात ठेवले पाहिजे. कोणालाही अपशब्द बोलणे टाळा. व्रत करणाऱ्या व्यक्तीने देवी दुर्गाची पूजा केल्यानंतर इष्ट देवतेचे ध्यान करावे. उपवासा दरम्यान वारंवार पाणी पिणे टाळावे आणि गुटखा, तंबाखू आणि मसाले खाऊ नयेत. उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
उपवासाचे फायदे -
शास्त्रात नवरात्रीचे महत्त्व विशेष मानले गेले आहे. मानले जाते की उपवास करणारी व्यक्ती, जी नियमांचे पालन करत नाही, ती आजारी पडते किंवा मूलहीन असते. त्याचबरोबर जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते, त्याच्यावर देवीची कृपा राहते आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.