वजन-उंची महाभारत इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

पांडवकालीन २०० ग्रँम वजनाचा गव्हाचा दाणा कोठे आहे?

1 उत्तर
1 answers

पांडवकालीन २०० ग्रँम वजनाचा गव्हाचा दाणा कोठे आहे?

4
गव्हाच्या एका दाणचे वजन 200 ग्रॅम आहे. विश्वास बसणार नाही; पण हे खरे आहे. पौराणिक मान्यतेनुसार 200 ग्रॅम वजन असलेला गव्हाचा हा दाणा महाभारतकालीन आहे. विशेष म्हणजे सुमारे 5 हजार वर्षापूर्वीचा गव्हाचा दाणा आजही आपण हिमाचल प्रदेशातील देवभूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या ममलेश्वर मंदिरात आहे.@
https://bit.ly/36MfSQQ
हिमाचलमधील करसोगा खोर्‍यात ममेल येथे ममलेश्वर महादेव मंदिर असून तेथे हा गव्हाचा दाणा आहे.. सध्या तो मंदिराच्या पुजार्‍याजवळ सुव्यवस्थित आहे.

विशेष म्हणजे पुरातत्त्व विभागानेही तो अतिप्राचीन असलची पुष्टी दिली आहे. हे शिव-पार्वतीचे मंदिर आहे. याशिवाय या मंदिराचा पांडवाशीही जवळचा संबंध आहे. कारण पांडवांनी आपल्या अज्ञातवासातील काही काळ ममेल गाव परिसरातच घालवला होता.
अतिप्राचीन काळातल्या या देवळात पाच हजार वर्षांपूर्वी चेतविलेली धुनी, भीमाचा ढोल, पांडवांनी स्थापलेली पाच शिवलिंगे ही पाहायला मिळतील.
पांडव अज्ञातवासात असताना या भागात कांही काळ राहिले होते. येथील धुनीबाबतही एक आख्यायिका सांगितली जाते. या गावाजवळच्या एका गुहेत एक राक्षस होता व गावातील रोज एक व्यक्ती त्याला खाण्यासाठी लागत असे. राक्षस शांत रहावा म्हणून गावकर्‍यांनीच ही अट मान्य केली होती. पांडव ज्या घरात राहिले होते तेथील मुलाची राक्षसाकडे जाण्याची पाळी आली तेव्हा त्याची आई रडू लागली. पांडवांना त्या मागचे कारण समजल्यानंतर भीम त्या मुलाऐवजी राक्षसाकडे गेला व युद्ध करून त्याने राक्षसाला ठार केले. त्या स्मरणार्थ येथे धुनी पेटविली गेली ती आजतागायत प्रज्वलित आहे.
येथे पांडवांनी स्थापन केलेली पाच शिवलिंगे आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू अतिप्राचीन असल्याचा दाखला पुरातत्त्व विभागाने दिला आहे.
या मंदिरात तब्बल दोन मीटर लांब आणि तीन फूट उंचीचा प्राचीन ढोल आहे. हा ढोल कुणी निर्माण केला याची कुणालाही माहिती नाही. हा ढोल भीमाचा असल्याचे या ठिकाणी सांगितले जाते. अर्थात इतका मोठा ढोल वाजवणे केवळ भीमालाच शक्य आहे!
https://bit.ly/36MfSQQ

Related Questions

प्राचीन भारताच्या इतिहासची अपुरातत्विय साधने?
इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती?
इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा?
वसाहत वाद म्हणजे काय?
सोव्हियेत रशिया विघटन केव्हा झाल?
मानसशास्त्र चा इतिहास?
इतिहासाचे महत्वाचे चार घटक कोणत?