Topic icon

महाराष्ट्राचा इतिहास

0
विनायक दामोदर सावरकर
 (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) 
हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. 
तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
 १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होत


 राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.[११] इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला.[१३] हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०).[१४] ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.[१५] पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले.[१६] हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.


उत्तर लिहिले · 16/4/2023
कर्म · 7460
1
तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव 'नांगरवास'असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच संभाजी महाराजांची समाधी आहे.
तुळापूर हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ८१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात गावात ५१० कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या २६८६ आहे त्यांपैकी १४१० पुरुष आणि १२७६ स्त्रिया आहेत. यांमध्ये अनुसूचित जातीचे लोक २२२ असून अनुसूचित जमातीचे १३६ लोक आहेत. तुळापूरच्या सर्वात जवळचे शहर पुणे हे २४ किलोमीटर अंतरावर आहे. तुळापूरचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५६२१० आहे.

शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवासगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.

छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लामला स्वीकारावे यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांचे पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुपूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांचे उभारण्यात आले आहे.

वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाज उभारणी आली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे रेखाचित्रे संभाजी महाराज यांच्यासारखे प्रखर धर्मप्रेम स्वतः:त निर्माण करण्याचा प्रयत्न करूया !

 
उत्तर लिहिले · 21/3/2023
कर्म · 9415
0
महाराष्ट्राचा शाब्दिक अर्थ “महान राष्ट्र” असा आहे, जी शिवाजी महाराजांची भूमी आहे. ती भूमी जिथे तुम्हाला अजूनही लढलेल्या युद्धांचे प्रतिध्वनी ऐकू येतात आणि जिथे तुम्ही मराठे आणि मुघलांच्या वैभवशाली भूतकाळातील आणि समृद्ध संस्कृतीचे साक्षीदार होऊ शकता. दोन्ही साम्राज्यांनी स्थापत्यशास्त्रातील आश्चर्याचे अनेक नमुने तयार केले जे पूर्वीच्या काळातील कथा सांगण्यासाठी येथे राहिले. महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत जे देशाच्या विविध भागातून अनेक वास्तुकलाप्रेमींना आकर्षित करतात.हे 30 सर्वात लोकप्रिय किल्ले आहेत जे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रेमात पडतील.

महाराष्ट्रातील 30 सर्वोत्तम किल्ले
येथे महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी आहे जी तुम्हाला भारतातील या राज्याचा गौरवशाली आणि राजेशाही इतिहास समजून घेण्यास मदत करेल आणि या आकर्षक केंद्रांना एकाच वेळी भेट देण्याची भरपूर कारणे देईल.

लोहगड किल्ला, लोणावळा
जंजिरा किल्ला, मुरुड
दौलताबाद किल्ला, दौलताबाद
पन्हाळा किल्ला, पन्हाळा
रायगड किल्ला, रायगड
शनिवारवाडा किल्ला, पुणे
यशवंतगड किल्ला, रेडी
सिंधुगड किल्ला, मालवण
सिंहगड किल्ला, पुणे
प्रतापगड किल्ला, सातारा
तोरणा किल्ला, पुणे
कंधार किल्ला, नांदेड
राजमाची किल्ला, पुणे
तिकोना किल्ला, लोणावळा
वासोटा किल्ला, सातारा
विसापूर किल्ला, माळवली
सुवर्णदुर्ग किल्ला, दापोली
कोरीगड किल्ला, आंबी व्हॅली सिटी
अकोला किल्ला, अकोला जिल्हा
वसई किल्ला, वसई-विरार
प्रबळगड किल्ला, रायगड जिल्हा
हरिश्चंद्रगड किल्ला, अहमदनगर जिल्हा
मंडणगड किल्ला, रत्नागिरी जिल्हा
विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग
शनिवारवाडा किल्ला, पुणे
घनगड किल्ला, टेल बायला
पुरंदर किल्ला, घेरापुरंधर
मल्हारगड किल्ला, काळेवाडी
तुंग किल्ला, पुणे

उत्तर लिहिले · 31/1/2023
कर्म · 9415
0
महाराष्ट्राचा शाब्दिक अर्थ “महान राष्ट्र” असा आहे, जी शिवाजी महाराजांची भूमी आहे. ती भूमी जिथे तुम्हाला अजूनही लढलेल्या युद्धांचे प्रतिध्वनी ऐकू येतात आणि जिथे तुम्ही मराठे आणि मुघलांच्या वैभवशाली भूतकाळातील आणि समृद्ध संस्कृतीचे साक्षीदार होऊ शकता. दोन्ही साम्राज्यांनी स्थापत्यशास्त्रातील आश्चर्याचे अनेक नमुने तयार केले जे पूर्वीच्या काळातील कथा सांगण्यासाठी येथे राहिले. महाराष्ट्रात जवळपास 350 किल्ले आहेत जे देशाच्या विविध भागातून अनेक वास्तुकलाप्रेमींना आकर्षित करतात.हे 30 सर्वात लोकप्रिय किल्ले आहेत जे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रेमात पडतील.

महाराष्ट्रातील 30 सर्वोत्तम किल्ले
येथे महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी आहे जी तुम्हाला भारतातील या राज्याचा गौरवशाली आणि राजेशाही इतिहास समजून घेण्यास मदत करेल आणि या आकर्षक केंद्रांना एकाच वेळी भेट देण्याची भरपूर कारणे देईल.

लोहगड किल्ला, लोणावळा
जंजिरा किल्ला, मुरुड
दौलताबाद किल्ला, दौलताबाद
पन्हाळा किल्ला, पन्हाळा
रायगड किल्ला, रायगड
शनिवारवाडा किल्ला, पुणे
यशवंतगड किल्ला, रेडी
सिंधुगड किल्ला, मालवण
सिंहगड किल्ला, पुणे
प्रतापगड किल्ला, सातारा
तोरणा किल्ला, पुणे
कंधार किल्ला, नांदेड
राजमाची किल्ला, पुणे
तिकोना किल्ला, लोणावळा
वासोटा किल्ला, सातारा
विसापूर किल्ला, माळवली
सुवर्णदुर्ग किल्ला, दापोली
कोरीगड किल्ला, आंबी व्हॅली सिटी
अकोला किल्ला, अकोला जिल्हा
वसई किल्ला, वसई-विरार
प्रबळगड किल्ला, रायगड जिल्हा
हरिश्चंद्रगड किल्ला, अहमदनगर जिल्हा
मंडणगड किल्ला, रत्नागिरी जिल्हा
विजयदुर्ग किल्ला, विजयदुर्ग
शनिवारवाडा किल्ला, पुणे
घनगड किल्ला, टेल बायला
पुरंदर किल्ला, घेरापुरंधर
मल्हारगड किल्ला, काळेवाडी
तुंग किल्ला, पुणे
उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9415
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
जगात असा कुठला देश आहे ज्यामध्ये रात्री बारा वाजता सूर्य उगवतो .
उत्तर लिहिले · 22/1/2023
कर्म · 20