1 उत्तर
1
answers
संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे?
1
Answer link
तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव 'नांगरवास'असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच संभाजी महाराजांची समाधी आहे.
तुळापूर हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ८१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात गावात ५१० कुटुंबे असून गावाची एकूण लोकसंख्या २६८६ आहे त्यांपैकी १४१० पुरुष आणि १२७६ स्त्रिया आहेत. यांमध्ये अनुसूचित जातीचे लोक २२२ असून अनुसूचित जमातीचे १३६ लोक आहेत. तुळापूरच्या सर्वात जवळचे शहर पुणे हे २४ किलोमीटर अंतरावर आहे. तुळापूरचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ५५६२१० आहे.
शहाजी राजे आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरवासगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही केल्या उकल होईना. मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढविले आणि त्या दगडांच्या भाराइतके सोनेनाणे दान करण्यात आले. तेव्हापासून त्या 'नांगरवासास' 'तुळापूर' म्हणू लागले.
छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लामला स्वीकारावे यासाठी औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारले, त्यांचे पार्थिवाचे तुकडे करून वढू, तुपूर (जि. पुणे) येथे टाकले. आज त्या ठिकाणी संभाजी महाराजांचे उभारण्यात आले आहे.
वढू बुद्रुक येथे महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथेही समाज उभारणी आली आहे. त्या ठिकाणची छायाचित्रे रेखाचित्रे संभाजी महाराज यांच्यासारखे प्रखर धर्मप्रेम स्वतः:त निर्माण करण्याचा प्रयत्न करूया !