मराठी चित्रपट युट्यूब चित्रपट

काही मराठी चित्रपट युट्यूब नाही आहेत. जर मी ते अपलोड केले तर चालतील का?

1 उत्तर
1 answers

काही मराठी चित्रपट युट्यूब नाही आहेत. जर मी ते अपलोड केले तर चालतील का?

3
यु ट्यूब वर चित्रपट अपलोड करताना घ्यावयाची काळजी:

यु ट्यूब वर कॉपीराईट व्हिडीओज, चित्रपट, म्युझिक, आवाजे, अपलोड करणं हे बेकायदेशीर आहे..
ज्या व्हिडीओज वा चित्रपटाची तुम्हाला कायदेशीरपणे   यु ट्यूब वर अपलोड करायचे असल्यास तर तुम्ही त्या चित्रपटाच्या मालकास प्रोडक्शन हाऊसमध्ये जाऊन भेट देऊन चित्रपट निर्मात्याशी ऑनलाइन राइट साठी परवानगी घ्यावी लागेल.. आणि ही परवानगी  व्यावहारिक असते.. त्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील.. त्यांचे काही व्यवहार व अटी मान्य करून तुम्ही तुमच्या यु ट्यूब चॅनल वर परवानगी घेतलेले चित्रपट अपलोड करू शकता..
चित्रपट दिग्दर्शक तथा मालक यांना ठराविक रक्कम देऊन परमिशन लायसन्स घेऊन कायदेशीरपणे चित्रपट अपलोड करू शकता आणि त्याला मॉनिटाइझ करून पैसेही कमवू शकता..

यु ट्यूब वर चित्रपट अपलोड करू की नये..
मुळात बेकायदेशीर असेल तर करूच नये.. विना परवाना एखादे कार्य अंगाशी येऊ शकते..
पुढील काही गोष्टी वाचल्यास प्रचीती येऊ शकते..

-> जे यु ट्यूब चॅनल वर चित्रपट अपलोड करून मॉनिटाइझ ही करतात अश्या यु ट्यूब युजर्स पैसे कमवू शकत नाही...
-> जे युजर्स काही एक्सपर्ट टेक्निकल माध्यमातून मुव्ही अपलोड करून आणि फ्रॉड पद्धतीने चित्रपट मॉनिटाइझ करून पैसे कमवितात त्यांना काही दिवसांनी संबंधित चित्रपट निर्माते-मालक यु ट्यूबला कॉपीराईटच्या ऍक्टनुसार रिपोर्ट पाठवतो.. आणि त्या यु ट्यूबर्सची त्या अपलोड केलेल्या चित्रपटातून जेवढी कमाई होत होती तेवढी सर्व अर्निंग चित्रपटाच्या खऱ्या मालकास दिली जाते..
-> बऱ्याच बेकायदेशीर पद्धतीने यु ट्यूब वर चित्रपट अपलोड करणे वाढले असल्याने अनेकांचे अकाउंट ब्लॉक किंवा निलंबित केले गेले आहेत..
-> जर युजर्स एखादी दुसऱ्याची व्हिडीओ वा चित्रपट अपलोड करतो आणि संबंधित चित्रपटाच्या मालकाने यु ट्यूबला तक्रार केली तर यु ट्यूब ३० दिवसांसाठी किंवा कायमचं युजर्सचे चॅनल बंद करू शकतो..
जर तुम्हाला तुमचा यु ट्यूब चॅनल सुरक्षित ठेवायचं असेल तर तुम्ही स्वतःची क्रिएट केलेली व्हिडीओ अपलोड करावीत..  दुसरं म्हणजे दुसऱ्याची व्हिडीओ किंवा चित्रपट हे कायदेशीर पणेच अपलोड करावीत..

उत्तर लिहिले · 10/10/2020
कर्म · 458520

Related Questions

एखादे युट्युब चॅनेल सुरू करायचे असेल आणि त्या नावाचे दुसरे चॅनेल नाही याची खात्री कशी करावी ?
आपण जर एखादे व्हिडीओ गाणे नेटवरुन डाउनलोड केले आणि ते आपल्या युट्युब व्हिडिओला जोडले तर ते कॉपीराईटमध्ये येऊ शकते का ?
मराठी चित्रपट. युट्यूब वर दिसत नाहीत. टकाटक. कुठे . डाऊनलोड करू . कुठे पाहू . लवकर सागा. . लवकर?
YouTube Channel कसा तयार करावा?
यू ट्यूब चा निर्माता कोण आहे ?
यूट्यूबवरील व्हिडिओ आपल्या फोन मेमरीमध्ये कसा डाउनलोड करावा कृपया मार्गदर्शन करावे ?
काही लोक एवढे अस्खलित कसे काय बोलतात न अडखळत जसे की काही यूट्यूब वाले किंवा न्यूज वाले आपल्याला काय करावे लागेल?