युट्यूब बातम्या

काही लोक एवढे अस्खलित कसे काय बोलतात न अडखळत जसे की काही यूट्यूब वाले किंवा न्यूज वाले आपल्याला काय करावे लागेल?

1 उत्तर
1 answers

काही लोक एवढे अस्खलित कसे काय बोलतात न अडखळत जसे की काही यूट्यूब वाले किंवा न्यूज वाले आपल्याला काय करावे लागेल?

13
कुशल वक्ता नेहमी आपल्या भाषणाची पटकथा तयार करतो आणि त्याचा सराव करून मगच श्रोत्यांसमोर ते सादर करतो.
जेव्हा तुम्हाला कुठे बोलायचे असेल त्याअगोदर ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयासंबंधी एक छोटीशी मुद्देशीर कथा तयार करा. नंतर त्यावर सराव करा. हे केल्यावर जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचे बोलणे देखील तितकेच मुद्देसूद वाटेल जितके युट्युब किंवा बातमी देणाऱ्याचे वाटते.

याबरोबरच तुमचे संबंधित विषयाचे ज्ञान देखील प्रगल्भ असणे गरजेचे असते, त्यामुळे अधिक अभ्यास करून ज्ञान वाढवा. असे म्हणतात की जेव्हा तुम्ही १० तास अभ्यास करता तेव्हा तुम्ही १० मिनिटे त्या विषयावर अस्खलित बोलू शकता.
उत्तर लिहिले · 8/9/2020
कर्म · 282915

Related Questions

दरडी कोसळणे/ भूस्खलनाच्या घटना व त्यामुळे झालेली हानी या संदर्भातील बातम्या, कात्रणे, छायाचित्रे यांचा संग्रह कसा कराल?
वृत्तपत्रातील बातम्या वगळता इतर कोण कोणत्या विषयावर लेखन केले जाते? त्यातील मुलाखत लेखन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात?
भारतातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासंबंधी वृत्तपत्र प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा समूह कोणता होता?
वृत्तपत्रे सुरु होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत?
ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची पद्धत म्हणजे काय?
न्यूज वर एखाद्या बातमीत सूत्र म्हणतात, हे सूत्र म्हणजे काय?
वृत्तपत्रीय लेखनात कशाचे महत्त्व असते?