1 उत्तर
1
answers
वृत्तपत्रीय लेखनात कशाचे महत्त्व असते?
0
Answer link
वृत्तपत्रीय लेखनात अनेक बाबींवर लक्ष ठेवावे लागते. वृत्तपत्रीय लेखनाला आजही महत्त्व आहे. मात्र लेखनात मुख्य महत्व हे बातमीला असते. या बातमीवर व उत्कृष्ट लेखनावर वृत्तपत्राची लोकप्रियता अवलंबून असते. तसेच उत्कृष्ट संपादकीय लेख हे एक वृत्तपत्राचे वैशिष्ट्य आहे. बातमीइतकेच महत्व हे संपादकीय लेखाला आहे . यात आपण काही गोष्टी समजावून घेऊ. बातमी : १. लोकांचा पूर्ण घटना जाणून घेण्याऐवजी कमीतकमी शब्दात ऐकण्याचा मानस असतो . त्यामुळे कमीत कमी शब्दात चांगली माहिती ही बातमीद्वारे दिली जाते .
२. दिल्या जाणाऱ्या बातमीत सत्यता असली पाहिजे . व बातमी विश्वासपूर्ण पाहिजे कारण लोकांचा बातम्यांवर जास्त विश्वास असतो.
३ . प्रक्षोभ निर्माण करणाऱ्या बातम्या वृत्तपत्रात देऊ नये.
संपादकीय लेख : १. संपादकीय लेख हे वृत्तपत्रांची लोकप्रियता वाढण्याचे एकमेव साधन आहे.
२. संपादकीय लेख हे संपादक लिहीत असतात.
३. विविध प्रसंगानुसार हे लेख लिहिले जातात .
4. जसे जयंती पुण्यतिथी काही लेख हे आरोप - प्रत्यारोप व सडेतोड व घटनेला वाचा फोडणारे असतात .
बातमी वृत्तपत्रांचा प्राण व संपादकीय लेख हा वृत्तपत्रांचा आत्मा असतो.
म्हणून माझ्या मते दोन्हींचे महत्व अधिक आहे.
धन्यवाद.