Topic icon

लिखाण

0

लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

लाकडी कॅबिनेट: हे कॅबिनेट लाकूड, प्लास्टिक किंवा मेटलपासून बनवले जाऊ शकतात. ते सहसा आकर्षक नक्षीकाम आणि कलाकृतींसह येतात.
काचचे कॅबिनेट: हे कॅबिनेट पारदर्शक काचेपासून बनवले जातात, ज्यामुळे साहित्य सहजपणे दिसू शकते. ते सहसा लाकडी किंवा मेटल फ्रेमसह येतात.
धातूचे कॅबिनेट: हे कॅबिनेट मजबूत आणि टिकाऊ असतात. ते सहसा एक साधी आणि आधुनिक शैलीमध्ये येतात.
पॅटर्न केलेले कॅबिनेट: हे कॅबिनेट विविध प्रकारच्या नमुन्यासह येतात, जसे की विटाळ, पुष्पगुच्छ किंवा पशुचित्र.
वॉल-माउंट केलेले कॅबिनेट: हे कॅबिनेट भिंतीवर लावले जातात, ज्यामुळे जागा वाचवते.
लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे काही अतिरिक्त नक्षीदार पर्याय खालीलप्रमाणे आहेत:

एक स्टेशनरी स्टोरेज सिस्टम: ही प्रणाली अनेक प्रकारच्या कॅबिनेट, ड्रॉअर आणि शेल्फसह येते. हे साहित्य व्यवस्थित ठेवण्यासाठी एक आदर्श मार्ग आहे.
एक स्टेशनरी बॉक्स: हे बॉक्स लहान साहित्यासाठी एक आदर्श मार्ग आहे. ते सहसा लाकडी, प्लास्टिक किंवा कापडात बनवले जातात.
एक स्टेशनरी ट्रे: ही ट्रे लहान साहित्य ठेवण्यासाठी एक आरामदायक मार्ग आहे. ते सहसा लाकडी, प्लास्टिक किंवा कापडात बनवले जातात.
लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार प्रकार निवडताना, खालील घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे:

जागा: तुमच्याकडे किती जागा आहे?
साहित्य: तुम्हाला किती साहित्य ठेवायचे आहे?
शैली: तुम्ही कोणत्या शैलीचा कॅबिनेट किंवा स्टोरेज सिस्टम शोधत आहात?
बजेट: तुम्ही किती खर्च करण्यास तयार आहात?
तुमच्या गरजा आणि बजेटसाठी योग्य पर्याय निवडून, तुम्ही तुमचे लिखाणाचे साहित्य व्यवस्थित आणि सुव्यवस्थित ठेवू शकता.
उत्तर लिहिले · 16/9/2023
कर्म · 34195
1
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत लिहिण्यासाठी, तुम्ही खालील मुद्द्यांचा वापर करू शकता:

समारंभाची तारीख आणि वेळ
समारंभाची स्थळ
समारंभात उपस्थित असलेल्या व्यक्ती
समारंभात झालेल्या कार्यक्रमांचा तपशील
समारंभात झालेल्या भाषणाचा सारांश
समारंभाच्या शेवटी झालेल्या निरोप भाषण
समारंभाची तारीख आणि वेळ तुमच्या शाळेच्या वेबसाइटवर किंवा शाळेच्या वृत्तपत्रात तुम्ही शोधू शकता. समारंभाची स्थळ तुमच्या शाळेच्या प्रांगणात किंवा शाळेच्या सभागृहात असू शकते. समारंभात उपस्थित असलेल्या व्यक्तीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि इतर मान्यवर व्यक्तींचा समावेश असू शकतो. समारंभात झालेल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना, स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण, गाणी, नृत्य, नाटक इत्यादींचा समावेश असू शकतो. समारंभात झालेल्या भाषणाचा सारांश समारंभाच्या उद्देशावर आणि भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहासावर असू शकतो. समारंभाच्या शेवटी झालेल्या निरोप भाषणात विद्यार्थ्यांना देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले जाते.

तुम्ही शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवू शकता:

वृत्तांत तथ्यात्मक आणि अचूक असावा.
वृत्तांत संक्षिप्त आणि सोपा असावा.
वृत्तांतमध्ये समारंभाच्या महत्त्वावर भर द्यावा.
वृत्तांतमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी भाषा वापरावी.
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत लिहिणे हे एक उत्तम संधी आहे. या वृत्तांतातून विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि देशभक्ती याबद्दल जाणून घेऊ शकतात.

उत्तर लिहिले · 5/8/2023
कर्म · 34195
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
[

मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा तिच्या वैविध्य रूपाने समृद्ध आहे. मराठी भाषेच्या बोलण्यात गोडवा आहे. परंतु या भाषेत बोलायचे किंवा लिखाण करायचे झाल्यास शुद्ध व्याकरणाचा अभ्यास करणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. भाषेची वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, वाक्याचे प्रयोग, विभक्ती, विरामचिन्हे यांचे नियम व मांडणी सविस्तरपणे ज्ञात असावयास हवी. भाषेची नियमव्यवस्था वरील प्रमाण भाषेवर अवलंबून आहे. मराठी भाषा बोलताना व लिहिताना त्यात मराठी शब्दांचा वापर करण्यात यावा. कुठलेही परकीय भाषेतील शब्द किंवा बोलीभाषेतील शब्दांचा वापर करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान होईल, म्हणूनच आपल्या मराठी भाषेच्या लेखनात प्रमाण भाषा वापरली पाहिजेजेणेकरून साहित्य निर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचे

लेखन चांगले होईल.

"मराठी भाषा लेखनाचे काही

नियमही आहेत त्यालाच शुद्धलेखन असे म्हणतात " शुद्धलेखन हा एक व्याकरणाचाच भाग आहे. परिपूर्ण शुद्धलेखनाशिवाय मराठी भाषेचे लेखन म्हणजे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

अ) अनुस्वार यासंबंधीचे नियम :

१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून येतो त्या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- आनंद, आंबा, पंगत, वंदना इत्यादी.

२) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- मुलांना, त्यांना, सर्वांना, झाडांवर, बालकांवर, इत्यादी.३) शब्दातील अक्षरांवर अनुस्वार देऊ नयेत.

उदाहरणार्थ:- लाकूड, काटा, पाच, गाव, नाव इत्यादी.

ब) ऱ्हस्व व दीर्घ संबंधी नियम (अन्त्य अक्षरे)

१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो नेहमी दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ :- मी, ही, ती, की, पी, ऊ, इ, तू इत्यादी.

२) शब्दाच्या शेवटी येणार इ-कार किवां उ-कर उचारणानुसार दीर्घ लिहावा.

उदाहरणार्थ :- भाऊ, राखी, काजू, पाणी, चटई, वाटी इत्यादी.

३) काही तत्सम इ-कारान्त किंवा उ-कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ:- कवी, प्रीती, गती, पशु इत्यादी.

४) सामासिक शब्दातील पहिले पद इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते हस्वच लिहावे.उदाहरणार्थ:- वायुपुत्र, गुरुदक्षिणा, रविवार, पशुपक्षी,

कविराज, हरिकृपा इत्यादी.

५) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद इ-कारान्त किंवा उ-कारान्त असेल तर ते दीर्घ लिहावे.

उदाहरणार्थ:- गौरीनंदन, वधूपरीक्षा, भगिनीमंडळ, गौरीहर इत्यादी.

६) तत्सम अव्यये नेहमी -हस्व लिहावेत. उदाहरणार्थ :- नि, आणि, परंतु, किंतु, अति, इत्यादी

क) -हस्व दीर्घ नियम ( उपान्त्य अक्षरे)

१) मराठी शब्दातील पूर्वीचे इ-कार किंवा उकार दीर्घ असतात.

उदाहरणार्थ:- दूध, फूल, मूल, तूप, बहीण इत्यादी.

२) तत्सम शब्दातील अकारान्तपूर्वीचे इ-कार किंवा उ-कार हस्व असतात.

उदाहरणार्थ :- मंदिर, शिव, बुध, प्रिय, विष इत्यादी.उदाहरणार्थ :- मंदिर, शिव, बुध, प्रिय, विष इत्यादी.

ड ) विरामचिन्हे:- लिखाणातील भाव स्पष्ट होण्यासाठी विविध विरामचिन्हांचा वापर करावा लागतो.

१) पूर्णविराम (.) वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी.

उदाहरणार्थ:- राम शाळेत जातो.

२) अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांना जोडलेली असतात तेव्हा.

उदाहरणार्थ:- सिनेमाला जायचे होते; अचानक

-

पाऊस आला.

३) स्वल्पविराम (,) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास.

उदाहरणार्थ:- आज वर्गात राम, सीता, गीता, हरी, शाम हजर नव्हते.

४) अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.

उदाहरणार्थ :- शब्दांच्या आठ जाती आहेत त्या पुढीलप्रमाणे:लेखन विषयक नियम म्हणजे काय हे सांगुन मराठी लेखणाचा आढावा घ्या?
[ प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक प्रश्न वाक्याच्या शेवटि वापरतात.

उदाहरणार्थ:- खोखो चा अंतिम सामना केव्हा आहे?

६) उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करतांना.

उदाहरणार्थ:- छान, हीच खरी देशसेवा आहे!

७) एकेरी अवतरण चिन्ह (' ') एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असेल तेव्हा. उदाहरणार्थ:- 'दील्ली भारताची राजधानी आहे. 1

८) दुहेरी अवतरण चिन्ह ( " ") बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यारिता.

उदाहरणार्थ :- लाला बहाद्दुर शास्त्रीजी यांनी५) प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक प्रश्न वाक्याच्या शेवटि वापरतात.

उदाहरणार्थ:- खोखो चा अंतिम सामना केव्हा आहे?

६) उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करतांना.

उदाहरणार्थ:- छान, हीच खरी देशसेवा आहे!

७) एकेरी अवतरण चिन्ह (' ') एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असेल तेव्हा. उदाहरणार्थ:- 'दील्ली भारताची राजधानी आहे. 1

८) दुहेरी अवतरण चिन्ह ( " ") बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यारिता.

उदाहरणार्थ :- लाला बहाद्दुर शास्त्रीजी यांनई
उत्तर लिहिले · 19/12/2021
कर्म · 121725
3
आर्थिक व्यवहार लेख पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे नोंदवून ठेवणे म्हणजे पुस्तपालन होय. कुठल्या तारखेस व्यवहार घडला व त्याचे तपशील उदा. देणारा, घेणारा, रक्कम, वस्तू अथवा सेवा इत्यादी पुस्तपालनात लिहिले जातात. पुस्तपालन आणि या पुस्तपालनामुळे व्यवसायावर कुठले परिणाम झाले याची नोंद करण्याचे काम 'लेखापाल' करतो
१) पुस्तपालन म्हणजे काय?

--> आर्थिक व्यवहार लेख पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे नोंदवून ठेवणे म्हणजे पुस्तपालन होय.

२) वस्तु / माल म्हणजे काय?

-->. मालाच्या म्हणजे बनवलेल्या वस्तूच्या (किंवा

दिलेल्या सेवेच्या) प्रतीचे मोजमाप.

३) भांडवल म्हणजे काय ?

-->नव-अभिजात अर्थशास्त्रानुसार भांडवल (इंग्लिश:

Capital ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन,

नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन

उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा

निर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहेनिर्मिण्याचे एक उत्पादनसाधन आहे.

४) उचल म्हणजे काय आहे? • म्हणजे काहीतरी उचलणे

५) ख्याती म्हणजे काय? --> ख्याति ती— स्त्री. १ प्रसिद्धि; कीर्तिं. 'हांसे आले ख्याती नगरीं असि विभु करूनि आले ख्याति ।' -मोकृष्णपू ४३.२० २ जगजाहीरपणा; महशूरता; लोकप्रसिद्धि; डंका; दांडोरा. 'त्रिकूटाचळीं ख्याति ऊदंड जाली।' -राक भाग १ श्लोक ४६. ३ पराक्रम; मर्दुमकी. 'तेव्हां ख्याति प्रत्याहारें केली.' -ज्ञा ९. २१५. 'ख्याति केली विष्णुदासीं तुगा ३५५. ४ गोष्ट; हकीकत. ५ (वेदांत) प्रतीति; कथनरूप व्यवहार, पांच ख्याती आहेत. पहिली असत् ख्याती, ही शून्यवादी यांची.
उत्तर लिहिले · 8/12/2021
कर्म · 121725
1





१४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखल्या जाणा-या अण्णा अर्थात खुद्द ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांचा स्मृतिदिन असतो. यानिमित्ताने त्यांनी लेखकाच्या लग्नासाठी खास लिहिलेल्या मंगलाष्टकांची ही आठवण-

Mangalastakeलग्नाचा मोसम आला की, प्रत्येक वेळी आमचे कोणते ना कोणते नातेवाईक मला किंवा माझ्या पत्नीला फोन करून, ‘तुमच्या लग्नात म्हटलेली मंगलाष्टके आहेत का?’ असे विचारतात.

आता ४५ वर्षानंतरसुद्धा ते आठवणीत राहण्याची कारणे अर्थात सोपी आहेत एक तर, तेव्हा म्हणणा-या व्यक्तीने ती अत्यंत निराळय़ा पद्धतीने म्हणजे आर्त आणि प्रत्येक शब्द कळेल, अशा स्वच्छ आवाजात म्हटली (त्यांचे नाव आता आठवत नाही व त्यांचे गायन रेकॉर्ड झाले नाही, याची चुटपुट अजून आहे.) दुसरे, ५००-५०० लोकांनी पहिल्या ओळीनंतर शेवटपर्यंत ती टाचणी पडली तरी आवाज होईल, अशा शांततेत ऐकली. (इतक्या ‘सावधानतेने’ मंगलाष्टके केलेली मी तरी, परत कधीच अनुभवली नाहीत.) आणि तिसरे अगदीच सोपे. कारण ती ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात, त्या अण्णा, अर्थात खुद्द ग. दि. माडगूळकर ऊर्फ गदिमा यांनी रचली होती.

ही मंगलाष्टके छापलेली असल्याने मी प्रत देतो; तरी पण माझी एक भीती नेहमीच खरी ठरते. उत्साहाच्या भरात वा जवळच्या नातेवाईकांच्या आग्रहाखातर, वधुवर व सर्व आसांची नावे गोवल्याशिवाय मंगलाष्टके पुर्णच होत नाहीत. या कल्पनेने नातेवाईक स्वरचित वेगळ्या मंगलाष्टकांसहित म्हणतात. ते ठीक; पण मग मधून मधून अण्णांची कडवी ‘गाण्याचा’ प्रयत्न करतात. त्यामुळे अण्णांवर मोठा अन्याय होतो; कारण ते मंगलाष्टके लक्षपूर्वक ऐकले जाते, ना त्याचा एकसंध असा अपेक्षित परिणम होतो. हा अन्याय, मूळ मंगलाष्टक प्रसिद्ध करून, दूर करण्याचे माझ्या मनात अनेकदा येत असे. पण या ना त्या कारणाने ते राहून जाते असे. या वर्षी (२०१४) मात्र १४ डिसेंबरच्या अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांची, ही अप्रकाशित कलाकृती, मी माझ्या त्या वेळच्या आठवणींसह व याच्याशी निगडीत असलेल्या दुस-या एका आठवणीसह, लोकांपुढे आणण्याची संधी घेत आहे.

पंचेचाळीस वर्षापूर्वी (१९६९) मध्ये आमच्या लग्नाची तारीख ठरली व माझ्या वडिलांची (तीर्थरूप भाऊंची) अनेक मित्रमंडळी मदत करण्यासाठी सिद्ध झाली. तेव्हा लग्न हा /फए५ील्ल३ समजून त्याची /फटंल्लंॅीेील्ल३ करारावर देण्याची पद्धत नव्हती. त्या काळी सर्व नातेवाईक-मित्रमंडळी एक येऊन प्रत्येकाला जमेल ते (व सुचेल ते) काम स्वत:हून करत. अण्णांना बातमी सांगितल्याबरोबर त्यांनी ‘मंगलाष्टके मी लिहिणार’ असा सज्जड दम भरला. नंतर मात्र स्वभावानुसार आज-उद्याचे वायदे सुरू झाले आणि लग्नाची तारीख जवळ आली तरी अवाक्षराचा पत्ता नव्हता. मध्ये भेटी झाल्या तरी मंगलाष्टकांचे नाव नाही. तारीख जशी अगदी आठवड्यावर आली, तसे माझे वडील म्हणाले, ‘स्वामींच्या मनात लिहायचे आहे की नाही, कळत नाही. तरी एकदा फोन करून आठवण करून पाहतो.’ त्या काळात अण्णा मुंबईला आले की, माटुंग्याच्या गुडविलमध्ये इन्शुरन्स इमारतीत राहत असत. भाऊंनी फोनवर त्यांना विचारले, ‘काय महाराजा मुलाचे लग्न करायचे की नाही, की मंगलाष्टकाशिवाय लग्न लावायचे?’ त्यावर अण्णा म्हणाले, ‘हं! बरं, बरं! करतो.’ त्यांनी फोन ठेवला आणि पाच मिनिटांनी फोन आला, ‘भाऊ, तुमच्या कुलस्वामिनीचे नाव काय?’ भाऊंनी नाव सांगितले. त्यावर १५ मिनिटांनी पुन्हा फोन आला, ‘मंगलाष्टक तयार झालं आहे. ते घेऊन जायला कोणाला तरी पाठव आणि ‘मौज’च्या छापखान्यात तडक पाठवायचं, अनिलला दाखवायचं नाही आणि खाली माझं नाव फक्त ‘अण्णा’ लिहायचं.’

त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे अण्णा व वामनरावांची जोडी दारात उभी. (एका पानाचा तोबारा भरलेले पुण्याचे वजनदार अण्णा आणि दोन पानांचा तोबरा भरलेले; नागपूरचे उंच धिप्पाड वामनराव चोरघडे, आमच्याकडे बहुधा जोडीनेच यायचे.) माझ्या पाठीत जोरात गुद्दा हाणून अण्णा म्हणाले, ‘लेका, तुझं मंगलाष्टक तयार आहे. पण तू आता वाचू नकोस. त्यामध्ये शेवटी चावटपणा केला आहे तो तुला तिथंच कळेल.’

अण्णांची मंगलाष्टक छापून जमलेल्यांना वाटण्यात आली. आम्ही वधुवर माला घेऊन लग्नाला उभे राहिलो. वर म्हटल्याप्रमाणे जनमलेले प्रत्येक कुठलाही शब्द ऐकायचा राहू नये, म्हणून लक्षपूर्वक ऐकत होते.

अण्णांचे शब्द लोक एकाग्रतेने ऐकू लागले. अण्णांच्या शब्दांत काय नव्हते? परंपरेचे भान, प्रसंगाचे मांगल्य, येणा-या जबाबदारीची जाणीव, मोठ्यांच्या आकांक्षा आणि एका नव्या पिढीचा उदय होताना पाहून वाटणारी कृतार्थतेची भावना. प्रत्येक कडव्यानंतर ‘कुर्यात सदा मंगलम्’ या शब्दांना काय वजन आहे ते कळत होते. प्रत्येक वेळी जेव्हा हे शब्द उच्चारले जात, तेव्हा ते मंत्रोच्चारासारखं वाटत व हे करणे ही आपली जबाबदारी असे वाटते.

या संदर्भात एक आणखी सुंदर आठवण सांगण्यासारखी आहे. काही वर्षानंतर माझे बंधू विनय ‘राजमाता जिजाऊ’ सिनेमा करणा-या पद्मनाभ या दिग्दर्शकाचे साहाय्यक होते.

पद्मनाभांना असे हवे होते की, जिजाऊ जशा जशा मोठ्या होतात. (एक लहान मुलगी, पत्नी, माता व राजमाता) तसे प्रत्येकवेळी एक एक कडवे पार्श्वसंगीत ऐकवावे ज्यामुळे प्रत्येक कडव्याला जिजाऊंच्या आयुष्याचा चढत गेलेला प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोचेल अशी कल्पना होती. अशी कडवी त्यांनी पं. नरेंद्र शर्माना लिहायला सांगितली होती.

लक्ष्मीकांत संगीत देणार होते. पं. शर्माच्या प्रथम प्रयत्नांना पद्मनाभ म्हणाले, ‘शर्माजी यामध्ये मी पूर्वी असे काहीतरी ऐकले होते त्यामध्ये असा परिणाम मला जाणवला होता.

तो येत नाहीए.’ मग दोन-तीन प्रयत्न झाले. तरी पद्मनाभांचे पालुपद तेच. मग पद्मनाभ मध्येच म्हणाले, ‘हा, हा कुठेतरी मी मंगलाष्टकं ऐकली होती. त्यात असा आलेख मला जाणवला होता.’ ते थांबून माझ्या बांधून म्हणाले, ‘अरे विन्या ती अनिलच्या लग्नातील मंगलाष्टकं छापली आहेत ना, बघ प्रत आहे का?’ माझ्या बंधुनी मग प्रत उपलब्ध करून ती पद्मनाभांनी पंडितजींच्या हातात दिली. पंडितजींनी ‘अण्णा’ हे नाव वाचले. त्यांना बहुधा वाटले असणार की, कोणी होतकरू नातेवाईक कवी असावा, मग त्यांनी वाचायला सुरुवात केली. जसे जसे वाचत गेले तशा एकाग्रतेच्या आठ्या त्यांच्या कपाळावर चढत गेल्या. वाचल्यावर म्हणाले, ‘किसने लिखा है?’ पद्मनाभाने हसून विचारले, ‘कोण असेल?’ ‘माडगूळकर के सिवा कोई ऐसा नही लिख सकता.’ पद्मनाभने हसून पावती दिल्यावर, त्यांनी परंपरेप्रमाणे डोळे मिटून कानाला हात लावला. अण्णा एकमेवाद्वितीय होते, त्याची ही पावतीच.

आज अनेक वर्षानी मी व माझी पत्नी जेव्हा अशा काही निमित्ताने ती मंगलाष्टके पुन्हा वाचतो. तेव्हा आयुष्यात आलेल्या अनुभवांच्या कसोटीवर अण्णांनी मंगलाष्टकात लिहिलेला प्रत्येक शब्द नुसता शब्दविलास न राहता तो आमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला अनुरुप दिशादर्शक ठरला होता, हे लक्षात येते. अण्णांनी लिहिलेल्या मंगलाष्टकाचे मी माझ्या, मित्रांसाठी कधी कधी रसग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक शब्द कसा नेमका आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक शब्दाचे सामर्थ्य पूर्णत्वाने सांगताना अपयशच येतं. मला तरी शब्द अपुरे पडतात.

तेज:पुंज दिसे प्रवालगिरिसा, रक्तांबरा नेसला
देवांचा अधिदेव तो गपणती या मंडपी बैसला
पूजा मान्य करी, प्रसन्न वदनें स्वीकारली वंदना
आता एकच मागणे गजमुखा ‘कार्यात् सदा मंगलम्’

अंबा अष्टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्वामिनी
आली लग्नघरी निवास करण्या आवाहना ऐकुनी
आता तीच उभी मुठीत मिटल्या घेऊनिया अक्षता
माते, हो वरदायिनी वधुवरा, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

अग्नी, ब्राम्हण, आप्त, मित्र, अवघ्या आवाहिता देवता
आनंदे नवदंपतीस बघती, अन् वर्षती अक्षता
आशीर्वाद म्हणून तांदुळ धरा हे आपुल्या मस्तकी
मागा हेच पुन:पुन: वरवधू, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

घेई जन्म नवा शिवास वरण्या दाक्षायणी ना वृथा
तर्कातीत तरीहि सार्थ पहिल्या मातापित्यांची कथा
प्रीतीभाव असा चिरंजिवपणें जन्मांतरी नांदतो
श्रद्धा हीच तुम्हांस सौख्यद ठरो, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

प्रीतीवाचून ना प्रपंच फुलतो हे सत्य ध्यानी धरा
आदर्शाप्रत पोचवा घरकुला, नीती सदा आदरा
सांभाळा कुलकीर्ति – धन जे मात्यापित्यांनी दिले
त्यांचे श्रेय सुखप्रद तुम्हां, ‘कुर्यात् सदा मंगलम्’

वडिलपण मुलांनो, आमुचे धन्य व्हावे
चढत चढत तुम्ही जीवनी उंच जावे
मनसि वसत आहे, तोच आतून बोले
सकळ शुभद झाले, सौरभा सूर आले

आता बाळपणा सरे, उभयता ठाका उभे जीवनी
स्वामी मान पतीस तू परिणिते, होई खरी स्वामिनी
लाभू द्या धनसंपदा, यश, तुम्हां दीर्घायु सौख्यप्रद
वाढू द्या यशवंत वंश तुमचा, कुर्यात् सदा मंगलम्

जवळ जवळ मीलनाचा मुहूर्त
उभय तरुण जीवा वाटती शब्द व्यर्थ
झटपट पट आत विप्र हो दूर सारा
अधीर बहुत झाली, पंख येतील हारा

अण्णा माडगुळकर

कार्तिक वद्य १२, शके १८९१

दिनांक : २५ सप्टेंबर १९७४




उत्तर लिहिले · 30/11/2021
कर्म · 121725