मराठी भाषा लिखाण

लेखन विषयक नियम काय आहेत हे सांगून मराठी लेखनाचा आढावा घ्या?

3 उत्तरे
3 answers

लेखन विषयक नियम काय आहेत हे सांगून मराठी लेखनाचा आढावा घ्या?

1
[

मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषा तिच्या वैविध्य रूपाने समृद्ध आहे. मराठी भाषेच्या बोलण्यात गोडवा आहे. परंतु या भाषेत बोलायचे किंवा लिखाण करायचे झाल्यास शुद्ध व्याकरणाचा अभ्यास करणे व त्याचे नियम पाळणे गरजेचे असते. भाषेची वर्णमाला, संधी, शब्दांच्या जाती, लिंग, वचन, वाक्याचे प्रयोग, विभक्ती, विरामचिन्हे यांचे नियम व मांडणी सविस्तरपणे ज्ञात असावयास हवी. भाषेची नियमव्यवस्था वरील प्रमाण भाषेवर अवलंबून आहे. मराठी भाषा बोलताना व लिहिताना त्यात मराठी शब्दांचा वापर करण्यात यावा. कुठलेही परकीय भाषेतील शब्द किंवा बोलीभाषेतील शब्दांचा वापर करणे म्हणजे मराठी भाषेचा अपमान होईल, म्हणूनच आपल्या मराठी भाषेच्या लेखनात प्रमाण भाषा वापरली पाहिजेजेणेकरून साहित्य निर्मिती किंवा वैचारिक स्वरूपाचे

लेखन चांगले होईल.

"मराठी भाषा लेखनाचे काही

नियमही आहेत त्यालाच शुद्धलेखन असे म्हणतात " शुद्धलेखन हा एक व्याकरणाचाच भाग आहे. परिपूर्ण शुद्धलेखनाशिवाय मराठी भाषेचे लेखन म्हणजे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय. हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

अ) अनुस्वार यासंबंधीचे नियम :

१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून येतो त्या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- आनंद, आंबा, पंगत, वंदना इत्यादी.

२) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपांवर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

उदाहरणार्थ:- मुलांना, त्यांना, सर्वांना, झाडांवर, बालकांवर, इत्यादी.३) शब्दातील अक्षरांवर अनुस्वार देऊ नयेत.

उदाहरणार्थ:- लाकूड, काटा, पाच, गाव, नाव इत्यादी.

ब) ऱ्हस्व व दीर्घ संबंधी नियम (अन्त्य अक्षरे)

१) एकाक्षरी शब्दातील इ-कार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो नेहमी दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ :- मी, ही, ती, की, पी, ऊ, इ, तू इत्यादी.

२) शब्दाच्या शेवटी येणार इ-कार किवां उ-कर उचारणानुसार दीर्घ लिहावा.

उदाहरणार्थ :- भाऊ, राखी, काजू, पाणी, चटई, वाटी इत्यादी.

३) काही तत्सम इ-कारान्त किंवा उ-कारान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घ लिहावेत.

उदाहरणार्थ:- कवी, प्रीती, गती, पशु इत्यादी.

४) सामासिक शब्दातील पहिले पद इ-कारान्त किंवा उ-कारान्त तत्सम शब्द असेल तर ते हस्वच लिहावे.उदाहरणार्थ:- वायुपुत्र, गुरुदक्षिणा, रविवार, पशुपक्षी,

कविराज, हरिकृपा इत्यादी.

५) सामासिक व साधित शब्दातील पहिले पद इ-कारान्त किंवा उ-कारान्त असेल तर ते दीर्घ लिहावे.

उदाहरणार्थ:- गौरीनंदन, वधूपरीक्षा, भगिनीमंडळ, गौरीहर इत्यादी.

६) तत्सम अव्यये नेहमी -हस्व लिहावेत. उदाहरणार्थ :- नि, आणि, परंतु, किंतु, अति, इत्यादी

क) -हस्व दीर्घ नियम ( उपान्त्य अक्षरे)

१) मराठी शब्दातील पूर्वीचे इ-कार किंवा उकार दीर्घ असतात.

उदाहरणार्थ:- दूध, फूल, मूल, तूप, बहीण इत्यादी.

२) तत्सम शब्दातील अकारान्तपूर्वीचे इ-कार किंवा उ-कार हस्व असतात.

उदाहरणार्थ :- मंदिर, शिव, बुध, प्रिय, विष इत्यादी.उदाहरणार्थ :- मंदिर, शिव, बुध, प्रिय, विष इत्यादी.

ड ) विरामचिन्हे:- लिखाणातील भाव स्पष्ट होण्यासाठी विविध विरामचिन्हांचा वापर करावा लागतो.

१) पूर्णविराम (.) वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी.

उदाहरणार्थ:- राम शाळेत जातो.

२) अर्धविराम (;) दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांना जोडलेली असतात तेव्हा.

उदाहरणार्थ:- सिनेमाला जायचे होते; अचानक

-

पाऊस आला.

३) स्वल्पविराम (,) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास.

उदाहरणार्थ:- आज वर्गात राम, सीता, गीता, हरी, शाम हजर नव्हते.

४) अपूर्णविराम (:) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.

उदाहरणार्थ :- शब्दांच्या आठ जाती आहेत त्या पुढीलप्रमाणे:लेखन विषयक नियम म्हणजे काय हे सांगुन मराठी लेखणाचा आढावा घ्या?
[ प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक प्रश्न वाक्याच्या शेवटि वापरतात.

उदाहरणार्थ:- खोखो चा अंतिम सामना केव्हा आहे?

६) उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करतांना.

उदाहरणार्थ:- छान, हीच खरी देशसेवा आहे!

७) एकेरी अवतरण चिन्ह (' ') एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असेल तेव्हा. उदाहरणार्थ:- 'दील्ली भारताची राजधानी आहे. 1

८) दुहेरी अवतरण चिन्ह ( " ") बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यारिता.

उदाहरणार्थ :- लाला बहाद्दुर शास्त्रीजी यांनी५) प्रश्नचिन्ह (?) प्रश्नार्थक प्रश्न वाक्याच्या शेवटि वापरतात.

उदाहरणार्थ:- खोखो चा अंतिम सामना केव्हा आहे?

६) उद्गारवाचक चिन्ह (!) उत्कट भावना व्यक्त करतांना.

उदाहरणार्थ:- छान, हीच खरी देशसेवा आहे!

७) एकेरी अवतरण चिन्ह (' ') एखाद्या शब्दावर किंवा वाक्यावर जोर द्यावयाचा असेल तेव्हा. उदाहरणार्थ:- 'दील्ली भारताची राजधानी आहे. 1

८) दुहेरी अवतरण चिन्ह ( " ") बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखविण्यारिता.

उदाहरणार्थ :- लाला बहाद्दुर शास्त्रीजी यांनई
उत्तर लिहिले · 19/12/2021
कर्म · 121765
0
लेखन विषयक नियम म्हणजे काय हे सांगून मराठी लेखनाचा आढावा घ्या.
उत्तर लिहिले · 19/12/2021
कर्म · 5
0

मराठी भाषेमध्ये लेखन करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे लेखनाची गुणवत्ता वाढते आणि ते अधिक वाचनीय होते. मराठी लेखनाचे नियम आणि आढावा खालीलप्रमाणे:

मराठी लेखनाचे नियम:
  • शुद्धलेखन:

    शुद्धलेखण हा लेखनाचा पाया आहे. शब्दांची योग्य आणि अचूक रचना आवश्यक आहे.

  • विरामचिन्हे:

    विरामचिन्हे (Punctuations) वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. स्वल्पविराम (,), पूर्णविराम (.), प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!) इत्यादींचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

  • व्याकरण:

    व्याकरणाचे नियम पाळणे आवश्यक आहे. लिंग, वचन, विभक्ती, काळ आणि क्रियापदांचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.

  • शब्द निवड:

    लेखनामध्ये वापरले जाणारे शब्द हे विषयानुसार आणि गरजेनुसार योग्य असायला हवे. क्लिष्ट शब्द टाळावेत आणि सोपे शब्द वापरावेत.

  • वाक्य रचना:

    वाक्य रचना सुलभ असावी. लहान वाक्ये वाचायला सोपी जातात आणि अर्थबोध लवकर होतो.

  • परिच्छेद:

    एका परिच्छेदामध्ये एकाच विषयावर माहिती असावी. विषयांतर टाळावे आणि प्रत्येक परिच्छेद मागील परिच्छेदाशी जोडलेला असावा.

मराठी लेखनाचा आढावा:

मराठी लेखन अनेक वर्षांपासून चालत आले आहे. यात अनेक बदल झाले आहेत आणि ते अजूनही विकसित होत आहे.

  • प्राचीन लेखन:

    मराठीतील सर्वात जुने लेखन हे शिलालेखांवर आणि ताम्रपटांवर आढळते. त्यामध्ये धार्मिक आणि राजकीय माहिती दिलेली आहे.

  • मध्ययुगीन लेखन:

    या काळात संत साहित्याने मराठी भाषेला समृद्ध केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या संतांनी अभंग, ओव्या व भारुडे यांद्वारे समाजप्रबोधन केले.

    अधिक माहितीसाठी:

    मराठी विश्वकोश - मराठी साहित्य (मध्ययुगीन)
  • आधुनिक लेखन:

    आधुनिक काळात मराठी साहित्यात अनेक नवीन गोष्टींचा समावेश झाला. कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता, लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार रूढ झाले.

    वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली.

    मराठी विश्वकोश - आधुनिक मराठी साहित्य
  • सद्य:स्थिती:

    आजच्या काळात मराठी लेखन हे डिजिटल माध्यमांमध्येही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ब्लॉग, सोशल मीडिया, वेबसाईट यांवर विविध विषयांवर लेखन केले जाते.

मराठी भाषेतील लेखन हे समृद्ध आहे आणि ते सतत बदलत आहे. त्यामुळे, लेखकांनी भाषेचा योग्य वापर करून वाचकांना आवडेल अशा प्रकारे लेखन करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

भूक या कथेतील भिका व्यक्तिरेखा स्पष्ट करा?
लिखाणाचे साहित्य ठेवण्याचे नक्षीदार काय?
शाळेतील स्वातंत्र्य दिन समारंभाचा वृत्तांत कसा लिहाल?
प्रस्तावित हालचालींचे महत्त्व कोणते?
पुस्तपालन म्हणजे काय?
मंगलाष्टका कोणी लिहिल्या?
लग्नाचा बायोडाटा कसा असावा?