बातम्या
न्यूज वर एखाद्या बातमीत सूत्र म्हणतात, हे सूत्र म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
न्यूज वर एखाद्या बातमीत सूत्र म्हणतात, हे सूत्र म्हणजे काय?
5
Answer link
सूत्र या शब्दाला अनेक अर्थ आहेत. जसे की सूत्र म्हणजे विज्ञानातील रासायनिक, किंवा गणिती संरचना. तसेच सूत्र म्हणजे संकेत, रेषा, धागा, इत्यादी.
त्यातला माध्यमांशी संबंधित सूत्राचा अर्थ बातमी आणणारा धागा किंवा खबरी असा होतो.
बातमी आणण्यासाठी वृत्त वाहिन्या असे लोक ठिकठिकाणी पाठवत असतात, हे लोक बातमी स्वतः टीव्हीवर सादर करत नाहीत, मात्र फोन करून कार्यालयात कळवतात.
मग वृत्त वाहिनीवाले आपल्याला सांगताना म्हणतात की "सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे असे घडले".
ही माहिती कच्च्या स्वरूपाची असते, त्यामुळे अशा बातमीला पुराव्याचा आधार नसतो, म्हणूनच सूत्रांच्या नावाखाली वृत्तवाहिन्या बऱ्याच बातम्या खपवतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर पुराव्यासहित माहिती देणारे लोक प्रतिनिधी असतात, ज्यांची नावे आपल्याला सांगितली जातात. तर तत्काळ माहिती देणारे सूत्र असतात, ज्यांची नावे बाहेर सांगितली जात नाही.
सूत्र हे पोलिसांचे, गुप्तचर विभागाचे, व इतर संघटनांचेही असू शकतात.