औषधे आणि आरोग्य
घरगुती उपाय
पोटाचे विकार
आरोग्य
पित्त खूप होत असेल तर दररोज पाणी पिऊन उलटी काढणे बरोबर आहे का ?
1 उत्तर
1
answers
पित्त खूप होत असेल तर दररोज पाणी पिऊन उलटी काढणे बरोबर आहे का ?
6
Answer link
एकदम चुकीचे आहे, तुमी दररोज उलटी काडत असाल तर आपल्याला अशक्त पणा येईल व प्रतिकारक शक्ती कमी होईल,
आपण सर्व प्रथम कारणे पाहू त्या नंतर प्रतिबदात्मक उपाय पाहू :----
आम्लपित्ताची कारणे : अतिशय तिखट, मसालेदार, चमचमीत जेवण करणं, अतिशय आंबट खाणं, अतिप्रमाणात चहापान करणं, मोठय़ा प्रमाणावर केलेलं मद्यपान, तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण, मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण, अतिजागरण, जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा, भूक लागलेली असताना आहार न घेणं, मानसिक चिंता अशी कारणं सतत घडत गेल्यास व्यक्ती आम्लपित्ताकडे वाटचाल करू लागते.
प्रतिबंधात्मक उपाय : वर सांगितलेली एकूण लक्षणं वाचल्यावर आम्लपित्त आपल्याला होऊच नये, असं सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या सभोवताली आम्लपित्ताने त्रस्त रुग्ण अनेकांनी पाहिलेले असतील. त्यामुळेही आपल्याला यापासून मुक्तता हवी असंच मनापासून वाटत असेल, अशा सर्वानी आम्लपित्ताची वर सांगितलेली सर्व कारणं आपल्या बाबतीत घडणार नाहीत, याची जरूर काळजी घ्यावी. आपली दिनचर्या नियमित ठेवावी. आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे.
ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनीदेखील वर सांगितलेल्या कारणांपैकी आपल्या बाबतीत कोणती कारणं घडताहेत याचा पडताळा घेऊन ती कारणे पुढे घडणार नाहीत, अशी व्यवस्था करावी. रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीमध्ये रोगाच्या कारणांना खूप महत्त्व आहे.
साजूक तुपाचा वापर हवा : आम्लपित्ताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा. तूप हे उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो. शतावरी, ज्येष्ठमध, दुर्वा या वनस्पती द्रव्यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने केल्यास आम्लपित्तामध्ये लाभ होतो.
आयुर्वेदातील पंचकर्मापैकी वमन आणि विरेचन या दोन कर्माचा, आम्लपित्तामध्ये चांगला उपयोग होतो. आम्लपित्ताचा नेहमी त्रास असणा-यांनी मोरावळा खावा. आवळ्याच्या मोसमामध्ये आवळा आणि साखरेचा पाक यांचा उत्तम संयोग असलेला हा मोरावळा तयार करून ठेवावा. आवळा हा थंड गुणधर्माचा, पित्तशामक असल्याने त्याचा आम्लपित्तामध्ये उत्तम उपयोग होतो.
वरील उपाय करून पहा फायदा होईल, या वर अलोपॅथीक उपचार हवा असेल तर
*Gelucin mps 5 ml दोन वेळा
किंवा
*Fandine 40 (15 दिवस) दिवसातून दोन वेळा जेवणा नंतर
किंवा
*Pan 40 दिवसातून दोन वेळा जेवणा नंतर
पहा काही फरक पडतो का
*****धन्यवाद*****