शेती खते व बी बियाणे शेतकरी

बियाणाचे वाण जतन करणारी महिला कोण?

2 उत्तरे
2 answers

बियाणाचे वाण जतन करणारी महिला कोण?

2
अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील आदिवासी समाजातील अशिक्षित महिला राहिबाई सोमा पोपेरे या शेतकरी महिलेने भात,वाल,नागली,वरई,उडीद,वटाणा,तूर,वेगवेगळी फळे,भाज्या अशा गावरान पिकांच्या ५२ वाणांचा अमूल्य ठेवा जतन केला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=180441289020469&id=100011637976439
दिल्ली येथील इंडियन कौंसिल ऑफ अॅग्रीकल्चर या संस्थेने राहीमावशींच्या या कार्याची दखल घेऊन गौरविले आहे.तर १७ राज्यातील आदर्श महिला म्हणून मावशींची नोंद झाली आहे.
त्यांना बायफ मित्रा संस्थेचे नाशिक विभागाचे प्रकल्प प्रमुख जितीन साठे व जव्हार येशील संशोधक संजय पाटील वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.आता अकोले तालुक्यातील व राज्यभरातील २४५ वाणांचे कळसुबाई नावाने ओपन पेटंट व्हावे यासाठी बायफ मित्रा ही संस्था प्रयत्न करत आहे.या संस्थेने तालुक्यात बचत गटाच्या माध्यमातून २५०० महिलांचे नेटवर्क उभे केले आहे.
राहीमावशींच्या या कार्याची दखल अकोले तालुका पत्रकार संघाने घेऊन महिला दिनी त्यांचा यथोचित सत्कार केला.यावेळी संघाचे संस्थापक विश्वस्त विजय पोखरकर,भाऊसाहेब मंडलिक,मगन येलमामे,प्रा.डी.के.वैद्य,प्रकाश टाकळकर,अध्यक्ष प्रकाश आरोटे,उपाध्यक्ष हेमंत आवारी,सेक्रेटरी अमोल वैद्य,खजिनदार सूर्यभान सहाणे,छायाचित्रकार राजेंद्र मालुंजकर,दत्ता जाधव उपस्थित होते. 🌾🌽🍒🍅🍆🍇🍉🍌🍋🍊🍐🍎🍏🍐🍊
अशिक्षित राही मावशी यांनी सात मिनिटांचे सफाईदार भाषण केले.आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की,आता माझ्या मनात महिला विशेष बोलायचं आलयं.तुम्ही खरच मुलींना शिकवा.माझी आई शिकलेली असती तर मी अडाणी राहिले नसते.मुलींचं सारं आईवरच असतं.मी लहान असतानाच माझी आई मरुन गेली.ती असती तर मीही अक्षर ओळख शिकली असते.माहिती सेवा गृप पेठवड़गाव आपल्या कार्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की अगोदर महिला घाबरत असत.गावात सुध्दा त्या एकत्र बसत नव्हत्या.कोणी कोणाच्या घरी,कामाला जाईल तेवढंच.बायफच्या मार्गदर्शनाने महिला बचत गट तयार केला.त्यातून गावाच्या विकासाची वेगवेगळी कामे करु लागलो.२६ जानेवारी,१५ ऑगस्ट आम्ही पोरांना गोळ्या-बिस्किटं वाटतो,गरीबाची मुलं असेल तर त्याला बक्षीसीपण देत असतो,गावाच्या सप्ता-यात्रेत भाग घेतो.गावाची साफ-सफाई करतो,अशी सगळी कामं आम्ही महिला एकत्र येऊन करतो.
पुढे बचत गटातून आम्हाला गांडूळ खत कसं करायचं ते कळलं.चार-पाच वर्षे मी दुसरे कोणतेच खत वापरले नाही.फवाराही गांडूळ खत पाण्याचाच मारतो.माझ्या शेतातला भाजीपाला,झाडं-फळं मी डोक्यावर पाणी घालून केले.सांडपाण्यावर परसबागेतील झाडे वाढवली.त्याच झाडांना आज फले येऊन राहिली आहेत.आता मी गावोगाव महिलांना मार्गदर्शन करते.प्रत्येक महिलेने एक-एक,दोन-दोन झाडे वाढवायला हरकत नाही,असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
यापुढे बचत गटात आम्हाला शोषखड्डे करायचे आहेत.त्या सांडपाण्यावर वांगी,घेवडा घेता येईल.मला आणखी घेवडयाचे बी बँकेत साठवायचे आहे.जुनं ते सोनं.म्हणून पुढच्या पिढीसाठी हे जुने वाण मी लाऊन धरले आहेत.प्रत्येक महिलेने असा भाजीपाला केला तर मुलाबाळांना तो विकत घ्यावा लागणार नाही.आपल्या घरातच आहार भेटून जाईल.नागलीची भाकरी आणि लसणाची चटणी आम्ही खाल्ली.आम्हाला चार-चार मुलं झाली तरी कधी इंजेक्शन घेतलं नाही.आता दोन दिवस,चार दिवस झाली की मुलं दवाखान्यात.मला पुरस्कार मिळालेत.वेळप्रसंगी मी पायी बायफ मित्राच्या मिटिंगला जाते.लिहिता-वाचता येत नाही पण मी काहीच वाया जाऊ देत नाही.माझं बेणं पुणे,नगरला गेले असे त्या अभिमानाने सांगतात🍐🍊🍎🍒🍏🍏.गावरान खा,बिन खताचं खा,पोषण खा असा सल्ला त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
संशोधक संजय पाटील म्हणाले की अन्न सुरक्षा,पोषण सुरक्षा,स्वयंपूर्णता यांच्या बद्दल जगात खूप बडबड चालू आहे पण जगाच्या पोषणासाठीची उत्तरे राहीमावशींकडे आहेत.तिची सीड बँक समाजाची प्रॉपर्टी म्हणून घोषित केली आहे.तिची बहुतांशी पिकं औषधी पिके आहेत.काळाच्या ओघात टेकनॉलजिच्या नावाखाली ती हळूहळू कमी होत गेली पण पुन्हा त्यांची खूप गरज आहे.जगातली अनेक संशोधने अकोले तालुक्यात आहेत.येथील सर्व वाणांचे कळसुबाई नावाने ओपन पेटंट व्हावे,असे मत व्यक्त केले.♍🍊🍐🍏🍎🍆🍒

0
राहीबाई पोपरे या अकोले तालुका अहमदनगर जिल्ह्यातील आहेत त्यांनी खूप देशी बियाण्यांचे वाण जतन करून ठेवलेत
उत्तर लिहिले · 4/6/2023
कर्म · 7180

Related Questions

शेतकरी गटाचे योजना काय आहे?
देवस्थान ईनाम वर्ग ३ शेतजमीन एखादा शेतकरी ६० वर्षाहुन अधिक काळ कसत असताना देवस्थान ट्रस्ट कडून जर त्या शेतकर्‍यास अचानक तेथे शेतीकरण्यास मनाई होत असल्यास शेतकर्‍याने काय करणे योगय राहिल?
शेतकरी स्वत: सरकारला थेट संपर्क करण्यासाठी सध्याच्या काळात कोणता मार्ग मोकळा नाही, मग काय करावे?
पत्रकार परीषद एक ग्रामीण शेतकरी कशी घेऊ शकतो पद्धत व संपुर्ण प्रक्रिया कशी करावी?
खरीप पिक म्हणजे काय? खरीप पिकाचे प्रकार कोणते आहे?
भारतातील आद्य शेतकरी याविषयी माहिती मिळेल का?
मला माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, पण क्षेत्र सामायिक आहे आणि इतर शेतकरी सहमती देत नाहीत काय करता येईल?