आजार
शिवाजी महाराज
शाहू महाराज
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
शाहू महाराज यांनी प्लेग साथीच्या वेळी जनतेची कशी काळजी घेतली?
1 उत्तर
1
answers
शाहू महाराज यांनी प्लेग साथीच्या वेळी जनतेची कशी काळजी घेतली?
3
Answer link
शाहू महाराजांच्यांमुळे कोल्हापुरात प्लेग शिरू शकला नाही
प्लेगमुळे मुंबईत ९ लाखांच्या दरम्यान मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. पुण्यातही या रोगामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली होती. मात्र कोल्हापूरात प्लेग झालेल्या रुग्णांचे प्रमाण नाममात्रच होते.
याच कारण शाहू महाराज. संकटाच्या वेळी कसं काम करावं याचा आदर्श वस्तुपाठच महाराजांनी या घटनेत घालून दिला.
शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानचा कारभार स्वीकारुन दोन ते तीन वर्ष झाली होती.
बंगलोरहून फ्रेजर साहेबांनी त्यांनी पत्र पाठवलं होतं त्या पत्रात लिहलं होतं.
“I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal exertions in the matter of plague and famine. Stick to it, Maharaja, this is the time to show what a man is made of”
मुंबई शहरात प्लेगच्या साथीन धुमाकुळ घातला होता. कोल्हापूरात साथ येवू नये म्हणून महाराजांनी संपुर्ण शहर खाली केलं.
हा तोच काळ होता तेव्हा देशभरातले संस्थानिक ऐशो-आरामचं जीवन जगण्यात मश्गुल होते तेव्हा हा शाहूराजे कोल्हापूरमध्ये प्लेगचा एकही बळी जावू नये म्हणून झटत होते.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
प्लेग देवीदेवतांच्या प्रकोपामुळे येते अशी त्यावेळीची समजूत, करणार तर काय ?
आपली जनताच भाबडी होती. तेव्हा या शाहूमहाराजांनी आपल्या संस्थानात प्लेगची शास्त्रशुद्ध माहिती देणारी हजारो पत्रक वाटली. गावोगावी सभा भरवल्या. कुलकर्णी पाटलांकडून गावातल्या लोकांसमोर त्याच जाहिर वाचन केलं.
प्लेग का होतो ? कशामुळे होतो ? गावागावातील लोकाचं त्यांनी पुर्नवसन केलं. गाव स्वच्छ केलं.
गाव तर दूर पण कोल्हापूरसारखं शहर महाराजांनी पुर्नवसन करुन प्लेगची साथ थांबवल्याची पुरावे आहेत. लोकांच्या वसाहती तयार झाल्या. त्यांच खानपिणं हा राजा स्वत: बघायचा.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,याच काळात भास्करराव जाधव यांची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ती झाली. महाराजांनी याच काळात केललं पहिलं काम म्हणजे गावोगावी सुसज्ज दवाखाने काढले.
महाराज प्लेगवर नेमकं औषध शोधत होते. चौकशी करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांना होमिओपेथीमध्ये अस औषध असल्याचे दाखले मिळाले. त्यांनी तात्काळ चौकशी केली. होमिओपॅथीचा भारत प्रवेश पंजाबचा राजा रणजीतसिंहाने घडवून आणला होता. पण तो फक्त स्वत:साठी.
त्यांनी आपल्या दरबारात जर्मनीवरुन होमिओपॅथीचा डॉक्टर बोलावला होता. मात्र प्रजेसाठी संपुर्ण हिंदूस्थानात एकही होमिओपॅथीचा दवाखाना नव्हता.
भारतातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथीचा दवाखाना निघाला तो कोल्हापूरात.
शाहू महाराजांना प्लेगवर होमिओपॅथीमध्ये औषध आहे हे समजतात त्यांनी १८९८ मध्ये हा सार्वजनिक दवाखाना सुरू केला.
असाच प्रसंग कृष्णाबाईंचा. केळवकर घराणं हे कोल्हापूरातलं विद्याव्यासंगी घराण म्हणून प्रसिद्ध. रखमाबाई केळवकर या कोल्हापुर संस्थानच्या स्त्रीशिक्षणाधिकारी आणि त्यांची कन्या कृष्णाबाई. कृष्णाबाईंबद्दल सांगायच झाल तर त्या भारतातल्या पहिल्या स्री वैद्यकीय अधिकारी. डॉ.आनंदीबाई जोशी यांच्यानंतर त्या डॉक्टर झाल्या.
त्या इंग्लडला गेल्या तिथे प्रसुतीशास्त्राच शिक्षण घेतलं आणि कोल्हापूरात येवून कोल्हापूरच्या हॉस्पीटलमध्ये रुजू झाल्या. त्यांचा पुढे ब्रिटीशांनी कैसर-ए-हिंद पदवी देवून सन्मान केला. शाहू महाराजांनी कृष्णाबाईंना दरबाराच्या खर्चाने ग्रॅंट मेडिकल कॉलेजला पाठवलं होतं तिथूनच त्या पुढे परदेशात शिक्षण घेवून आल्या.
भारतातल्या पहिल्या महिला स्री रोग तज्ञ घडवण्याचं श्रेय देखील शाहू महाराजांना जात.
अशीच काही कागदपत्रे महाराष्ट्र इतिहास प्रबोधनी या संस्थेने प्रकाशित केली होती. त्यामध्ये शाहू महाराजांनी डॉ. कृष्णाबाईंना लिहलेली काही पत्र मिळाली या पत्रात महाराजांनी अल्बर्ट एडवर्ड हॉस्पीटलमध्ये बेवारस अर्भकांसाठी सुरू केलेल्या स्वतंत्र विभागाची माहिती मिळते.
तर दूसरीकडे महाराजांनी व्हिक्टोरिया राणीच्या डायमंड ज्यूबिली महोत्सवाच निमित्त साधून व्हिक्टोरिया लेपर असायलम या कुष्ठरोग्यांच्या जखमेवर फुंकर घालणाऱ्या संस्थेची स्थापना केली होती. राज्यकारभार हातात आल्यानंतर महाराज नरसोबाच्या वाडीला गेले होते.
तिथेच त्यांना कुष्ठोरोग्यांच्या व्यथा दिसल्या. त्या पाहून महाराजांनी या संस्थेची स्थापना केली.
संदर्भ –
कित्ता, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ, Rajashri shahu Chhatrapati Papers, Vol 2
https://m.facebook.com/story.php?story_fbid=958335544564369&id=100011637976439