2 उत्तरे
2
answers
बुद्ध म्हणजे काय?
3
Answer link
बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा ; सम्यकसंबुद्ध , किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा तसेच त्यांस सर्वज्ञ किंवा अमर्याद ज्ञानी असे हि म्हणतात . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे नाव आहे .मनाची अशी अवस्था कि , जी मानसिक विकासाच्या अति उच्च शिखरावर पोहचलेली आहे.बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपुर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते .बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करीत .दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत , त्यानंतर सम्यक संबुद्ध होत.
पहिल्या अवस्थेत मुदिता (आनंद ) दुसरया अवस्थेत विमलता (शुद्धता) त्यानंतर प्रभाकारी (तेजस्विता) , अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) , सुदूर्जया (जिंकण्यास कठीण) , अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), दुर जाणे , अचल (अढळ ) , साधुमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे ) आणि दहाव्या अवस्थेत धर्ममेध जाऊन त्यांस बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते .तेव्हा त्यांस बुद्ध म्हणतात..

बुद्ध म्हणतात, मी सांगतो म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा, शंका उपस्थित करा. ते समजण्यासाठी वेगवेगळया कसोट्या लावा. त्यानंतर पूर्णपणे उमजल्यानंतरच विश्वास ठेवा. स्वत:ची सद्सदविवेक बुद्धी वापरून स्वीकारलेले कोणतेही तत्वज्ञान वा स्वीकारलेली वस्तू कधीही बाद होणारी नसते.
धन्यवाद😊
0
Answer link
बुद्ध हा शब्द संस्कृत भाषेतील 'बुध्' या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ 'जागृत होणे' किंवा 'ज्ञान प्राप्त करणे' असा होतो.
बौद्ध धर्मात, बुद्ध म्हणजे तो व्यक्ती ज्याने स्वतःच्या प्रयत्नांनी सत्य ज्ञान प्राप्त केले आहे आणि जो इतरांनाही त्या मार्गावर मार्गदर्शन करतो.
गौतम बुद्ध, ज्यांचे मूळ नाव सिद्धार्थ गौतम होते, हे इतिहासातील सर्वात प्रसिद्ध बुद्ध मानले जातात. त्यांनी जगाला दुःखातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवला, ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात.
बुद्ध ही उपाधी आहे, जी कोणताही व्यक्ती योग्य साधना आणि अभ्यास करून प्राप्त करू शकतो.
बुद्धांच्या काही महत्वाच्या शिकवणी:
- दुःख आहे
- दुःखाचे कारण आहे
- दुःख निवारण शक्य आहे
- दुःख निवारणाचा मार्ग आहे (अष्टांगिक मार्ग)
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: