Topic icon

श्रध्दा सबुरी

0

सुफी संतांची श्रद्धा खालीलप्रमाणे होती:

  • ईश्वर प्रेम: सुफी संत ईश्वरावर निस्सीम प्रेम करत असत. ते प्रेमळ भक्ती आणि ईश्वरचिंतनात मग्न असत.
  • मानवता: सुफी संतांनी मानवतेला महत्त्व दिले. त्यांनी जात, धर्म, लिंग यांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मानले.
  • शांती आणि सहिष्णुता: सुफी संतांनी शांती आणि सलोख्याचा मार्ग दाखवला. त्यांनी लोकांना सहनशील असण्यास शिकवले.
  • साधे जीवन: सुफी संतांनी साधे जीवन जगण्यावर भर दिला. ते भौतिक सुखांपासून दूर राहिले आणि त्यांनी आत्म-संयमाचे महत्त्व सांगितले.
  • गुरु-शिष्य परंपरा: सुफी संतांनी गुरु-शिष्य परंपरेला महत्त्व दिले. ते गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असत.
  • संगीत आणि नृत्य: सुफी संतांनी ईश्वराची उपासना करण्यासाठी संगीत आणि नृत्याचा उपयोग केला.

या श्रद्धेच्या माध्यमातून सुफी संतांनी लोकांमध्ये प्रेम, एकता आणि सद्भाव वाढवण्याचा प्रयत्न केला.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 840
4
उपासना :

उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम,  पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते.  जप  हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे  कर्माकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्माकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.

जप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही कर्मांग नसते, तर पृथक असते. जगातील सगळे उच्च धर्म, कर्मकांडास गौण ठरवून ह्या पृथक उपासनेचे महत्त्वच अधिक वर्णितात



धन्यवाद
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 16930
3

बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा ; सम्यकसंबुद्ध , किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा तसेच त्यांस सर्वज्ञ किंवा अमर्याद ज्ञानी असे हि म्हणतात . बुद्ध हे व्यक्तीचे नाव नव्हे. ते मनाच्या स्थितीचे किंवा मनाच्या अवस्थेचे नाव आहे .मनाची अशी अवस्था कि , जी मानसिक विकासाच्या अति उच्च शिखरावर पोहचलेली आहे.बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य ज्ञानप्राप्तीपुर्वी सिद्धार्थ गौतम केवळ बोधिसत्व होते .बोधिसत्व आपल्या जीवनामध्ये क्रमाक्रमाने प्रगती करीत .दहा पारमितांचा परिपूर्ण अभ्यास करीत , त्यानंतर सम्यक संबुद्ध होत.
पहिल्या अवस्थेत मुदिता (आनंद ) दुसरया अवस्थेत विमलता (शुद्धता) त्यानंतर प्रभाकारी (तेजस्विता) , अर्चिष्मती (अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता) , सुदूर्जया (जिंकण्यास कठीण) , अभिमुखी (पदार्थांची उत्क्रांती व तिच्या कारणांची बारा निदाने जाणणे), दुर जाणे , अचल (अढळ ) , साधुमती (धर्माच्या सर्व दिशा जाणणे ) आणि दहाव्या अवस्थेत धर्ममेध जाऊन त्यांस बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते .तेव्हा त्यांस बुद्ध म्हणतात..


बुद्ध म्हणतात, मी सांगतो म्हणून तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करा, शंका उपस्थित करा. ते समजण्यासाठी वेगवेगळया कसोट्या लावा. त्यानंतर पूर्णपणे उमजल्यानंतरच विश्वास ठेवा. स्वत:ची सद्सदविवेक बुद्धी वापरून स्वीकारलेले कोणतेही तत्वज्ञान वा स्वीकारलेली वस्तू कधीही बाद होणारी नसते.

धन्यवाद😊
उत्तर लिहिले · 28/3/2020
कर्म · 55350
0
तिरुपतीमधील अलीपिरी येथे सुरू होणारा पदमार्ग 9 कि.मी. लांब आहे आणि त्याला 3,550 पायऱ्या आहेत.
उत्तर लिहिले · 8/11/2022
कर्म · 283280
3
श्रद्धा चा अर्थ  असा होतो की विश्वास,ईश्वरावरील भक्ती
मनात ईश्वराची खऱ्या मनाने भक्ती केली तर ईश्वर हा खरोखर ऐकेल.

सबुरी चा अर्थ  संयम असा अर्थ होतो.जर ईश्वरावरील भक्ती चे फळ हे कधीना कधी उशिरा का होईना मिळवण्यासाठी मनात संयम ठेवला पाहिजे.आपण कष्ट घेतले  म्हटल्यावर त्याचे फळ कधीना कधी लवकर मिळेल.त्यामुळे आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे.
उत्तर लिहिले · 29/10/2017
कर्म · 36090