3 उत्तरे
3
answers
उपासना म्हणजे काय?
4
Answer link
उपासना :
उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम, पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते. जप हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे कर्माकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्माकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.
जप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही कर्मांग नसते, तर पृथक असते. जगातील सगळे उच्च धर्म, कर्मकांडास गौण ठरवून ह्या पृथक उपासनेचे महत्त्वच अधिक वर्णितात

धन्यवाद
1
Answer link
उपासना : उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इ. स्वरूपाची असते. उपासना ही दोन प्रकारची : (१) कर्मांग व (२) पृथक. यज्ञ, होम, पूजा, भजन इ. देवताविषयक कर्मकांड आचरीत असता, मनोभावना ही उपासनात्मक असावी लागते. देवतेचे गुण, आकार, सामर्थ्य, चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासनेमध्ये चालवायचे असते. जप हा उपासनेचाच एक प्रकार आहे. प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे कर्माकांड असते. साधना म्हणजे इष्टदेवतेच्या अनुग्रहाने इष्टफल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड. पुत्रप्राप्ती, शत्रुनिवारण, रोगनिवारण इ. विशिष्ट ऐहिक फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड ‘साधना’ होय. साधना ह्या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचाही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्माकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते. आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.
जप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय. ज्ञानयोग, भक्तियोग व ध्यानयोग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही कर्मांग नसते, तर पृथक असते. जगातील सगळे उच्च धर्म, कर्मकांडास गौण ठरवून ह्या पृथक उपासनेचे महत्त्वच अधिक वर्णितात [→ भक्तिमार्ग].
!! उपासना म्हणजे काय!!
उपासना म्हणजे श्रद्धेने किंवा भक्तिभावाने केलेले इष्ट देवतेचे चिंतन किंवा ध्यान, ही उपासना मंत्रोच्चार, प्रार्थना इत्यादी स्वरूपाची असते.
उपासना दोन प्रकारची असते....
१. कर्मांग
२. पृथक, यज्ञ, होम, पूजा भजन इत्यादी
देवताविषयक कर्मांग करीत असता मनोभावना ही उपासना त्मक असावी लागते. देवतेचे गुण आकार सामर्थ्य चरित्र इत्यादिकांचे चिंतन उपासना मध्ये चालवायचे असते.
जप हा उपासनेचा ऐक प्रकार आहे.
प्रत्येक धर्मात साधना व आराधना या प्रकारचे कर्मकांड असते.
साधना म्हणजे इष्ट देवतेच्या अनुग्रहाने ईस्ट फल प्राप्त करून घेण्याचे कर्मकांड.
शत्रु निवारण ,रोग निवारण इत्यादी विशिष्ट आहे फलांच्या प्राप्तीकरिता सामर्थ्य मिळवून देणारे कर्मकांड साधना होय
साधना या शब्दात व्यापक अर्थाने क्वचित आराधनेचा ही समावेश होतो. साधनेत कर्मकांडावर भर असतो व कर्मकांडात मोठी शक्ती आहे अशी श्रद्धा असते आराधना म्हणजे इष्ट देवतेची कृपा संपादन करून घेण्याचे कर्मकांड होय.
जप किंवा केवल ध्यान ही कर्मांग नसलेली पृथक उपासना होय.
ज्ञान योग भक्तियोग ध्यान योग यांच्यामध्ये मुख्य उपासना ही करमांग नसते तर पृथक असते.
जगातील सगळे उच्च कर्मकांडात गौण ठरवून या पृथक उपासनेचे महत्त्व मानतात भक्तिमार्ग.
श्री समर्थ भक्त . स्वप्निल रामदासी जांबसमर्थ
#श्रीसमर्थरामदासस्वामी #जयसदगुरु #जयजयरघुवीरसमर्थ #सदगुरु #समर्थ विकसित
0
Answer link
उपासना म्हणजे काय?
उपासना म्हणजे एखाद्या देवतेच्या सान्निध्यात राहून, तिच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणे. हे केवळ शारीरिकरित्या मंदिरात जाणे नव्हे, तर आपल्या मनात त्या देवतेच्या गुणांचे चिंतन करणे आणि ते गुण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आहे.
उपासनेचे विविध प्रकार आहेत:
- नामस्मरण: देवाचे नाव जपणे, म्हणजेच नामस्मरण करणे.
- ध्यान: चित्त एकाग्र करून देवाच्या स्वरूपावर किंवा गुणांवर लक्ष केंद्रित करणे.
- पूजा: देवाची मूर्ती किंवा चित्र यांची विधीवत पूजा करणे.
- प्रार्थना: देवाला आर्ततेने विनंती करणे.
- कीर्तन: देवाची स्तुती गाणे, त्याचे गुणगान करणे.
उपासनेचे फायदे:
- मनःशांती आणि समाधान मिळते.
- एकाग्रता वाढते.
- आत्मविश्वास वाढतो.
- सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.
- नैतिक आणि आध्यात्मिक विकास होतो.
उपासना ही एक व्यक्तिगत बाब आहे आणि ती कोणीही आपल्या श्रद्धेनुसार करू शकतो.