शब्दाचा अर्थ
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
2 उत्तरे
2
answers
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
0
Answer link
स्वयं अध्ययन म्हणजे क्लासेस न लावताश ; शाळा ,कॉलेज रेगूलर न करता घरच्या घरीच स्वतःच पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करणे होय. बरीच विद्यार्थी अनेक कारणांमुळे स्वयं अध्ययन करतात. ते मोठे अधिकारी सुद्धा होतात. आता तर या कोरोनाच्या काळात सर्वचजण स्वयं अध्ययन करत आहेत.
0
Answer link
Self Study (स्वत:चा अभ्यास करणे)
स्वयंनिर्देशित अध्ययन ही पूर्णपणे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणारी एक विद्यार्थीकेंद्रित वैयक्तिक अभ्यासपद्धती किंवा अध्ययनपद्धत आहे. स्वयंनिर्देशित अध्ययन हे प्रौढ अध्ययनाला प्रेरणा देणारी अध्ययन पद्धती आहे. ज्यामध्ये मार्गदर्शन, अध्ययन आणि नियोजन यांची पूर्णतः जबाबदारी अध्ययनार्थीची असल्याचे गृहीत धरले जाते. स्वयंनिर्देशित अध्ययनपद्धतीचा वापर सर्व वयोगटातील अधयनार्थी करू शकतात. या पद्धतीने शिकणे ही स्वतः अध्ययनार्थ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. हिमस्ट्रा, आर. यांच्या मते, स्वयंनिर्देशित अध्ययन ही अभ्यासाची एक पद्धत असून या पद्धतीमध्ये नियोजन, प्रयत्नांची दिशा ठरविणे आणि त्याचे मुल्यपमान करणे या बाबींची प्राथमिक जबाबदारी अध्ययनार्थ्यांवर असते.