शिक्षण सरकारी योजना अभ्यासक्रम शिष्यवृत्ती

बारावी शिष्यवृत्ती सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना?

1 उत्तर
1 answers

बारावी शिष्यवृत्ती सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना?

2
_*🎓राज्यात 12 वीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*_

*🔰📶महा डिजी I शासकीय योजना*

⚡ राज्य शासनाने अल्पसंख्यांक लोकसमुह म्हणुन घेाषीत केलेल्या राज्यातील मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख व पारशी या सामाजातील तांत्रिक व व्यवसायीक तसेच इ.12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते.

🧐 *योजनेसाठी प्रमुख अटी* :

▪ इ. 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांमध्ये (कला ,वाणिज्य, विज्ञान) प्रथम वर्ष ते अंतिमवर्षात शिकत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना लागू आहे.
▪ विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व त्याने उच्च माध्यमीक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी.
▪ अर्जदार हा इतर कोणत्याही शिष्यवृत्ती/स्टायपेंडचा लाभार्थी नसावा.
▪ पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
▪ नुतनिकरणासाठी विद्यार्थ्यांने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.

*📃आवश्यक कागदपत्रे* :

● विद्यार्थ्याचा फोटो
● माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व त्यापुढील परीक्षांमधील गुणपत्रीकेच्या प्रती.
●  पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
●  महाविद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट.
●  बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत.
●  विद्यार्थ्याचे अल्पसंख्यांक असल्याबाबतचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
●  महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
●  आधार कार्ड छायांकित प्रत.

*💸लाभाचे स्वरूप असे* : 5 हजार रुपयांपर्यंत. सदर रक्कम ही तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांचेतर्फे विद्यार्थ्यांचे बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येते.

*📍या ठिकाणी संपर्क साधावा* : उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, ससून सर्वोपचार रुग्णालयाजवळ, पुणे स्टेशन, पुणे -411 001.

👉(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 6/2/2020
कर्म · 569205

Related Questions

पी एम किसान योजनेत सातबारावर जेवढी नावे असेल तेवढ्या खातेधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मिळते का?
'सरकारी योजना' कशासाठी असतात?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे व माझ्या वडीलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे,तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांचा दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही म्हणून मी ओबीसीचा दाखला काढु शकतो का?
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?
शेळीपालन योजना कशी मिळेल?
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?