सरकारी योजना

रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?

1 उत्तर
1 answers

रोजगार हमी योजनेची माहिती मिळेल का?

1
रोजगार हमी योजना – महाराष्ट्र  या योजने अंतर्गत केंद्र शासन प्रती कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते व प्रती कुटुंब 100 दिवसांच्या मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. 100 दिवसांवरील प्रती कुटुंब मजूरांच्या मजूरीचा खर्चाचा आर्थिंक भार राज्य शासन उचलते.



सन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनाची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केले, त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनाचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठरावीक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्याबदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो.

अलिकडेच, याच धर्तीवर भारताच्या केंद्रसरकारने सर्व देशासाठी महाराष्ट्रात पायाभरणी झालेल्या या योजनेला केंद्र स्तरावर स्विकारून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एनआरईजीए) करून तो पूर्ण देशासाठी तो लागू केला.


उत्तर लिहिले · 3/5/2022
कर्म · 48555

Related Questions

पी एम किसान योजनेत सातबारावर जेवढी नावे असेल तेवढ्या खातेधारकांना वार्षिक सहा हजार रुपये मिळते का?
'सरकारी योजना' कशासाठी असतात?
माझ्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू-मराठा जात लिहिली आहे व माझ्या वडीलांच्या दाखल्यावर हिंदू-इतर लिहिले आहे,तर मी हिंदू ओबीसीचा दाखला काढू शकतो का? वडिलांचा जन्म 1964 सालचा आहे, पण आजोबांचा दाखल्याचा काहीच पुरावा मिळत नाही म्हणून मी ओबीसीचा दाखला काढु शकतो का?
जातीनिहाय जनगणना म्हणजे काय?
शेळीपालन योजना कशी मिळेल?
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?
सर्व सरकारी योजनांची माहिती कुठे मिळेल?