औषधे आणि आरोग्य
सरकारी योजना
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?
1 उत्तर
1
answers
एखादी अशी योजना आहे का, कि ज्यातुन एखादया दुर्धर आजारावरील औषधे दर महीन्याला मोफत मिळतील?
3
Answer link
कामगार आरोग्य विमा योजना या योजनेत सर्व सर्वच आजारांवर मोफत दर महिन्याला मिळतात.किवा पालिका रुग्णालयात सर्व आजारांवर मोफत दर महिन्याला औषध मिळता
सेवाआरोग्य विमा सेवाकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)
कामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)
राज्य कामगार विमा योजना
(महाराष्ट्र शासन – सार्वजनिक आरोग्य विभाग )
परिचय / इतिहास
भारतीय राज्य कामगार विमा योजना ही कामगार वर्गाला सामाजिक आर्थिक सुरक्षितता पुरविण्यासाठी तयार केलेली बहुमुखी सामाजिक सुरक्षितता प्रणाली असून त्या अंतर्गत त्यांचे अवलंबित सुद्धा समाविष्ट आहेत. कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना नोकरीच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण वैद्यकीय देखभाली बरोबरच विमाधारक व्यक्तीचे आजारपण, तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व, इत्यादीमुळे कमाईच्या क्षमतेत झालेली घट व विमाधारक महिला विविध तऱ्हेचे रोख लाभ मिळण्यास पात्र असतात. औद्योगिक अपघात किंवा सेवेतील इजेमुळे किंवा व्यावसायिक जोखीमिमुळे मृत्यू पावणाऱ्या विमा धारक व्यक्तीवर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना अवलंबित्व लाभ नावाने दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते.
राज्य विमा योजनेचे वैशिष्ट्य असे की त्यातील अंशदान हे वर्गणीदाराच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो.
योजनेविषयी
राज्य कामगार विमा अधिनियम १९४८ अंतर्गत लागू करण्यात आलेली राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. सुरक्षिततेची भावना ही मनुष्य स्वभावात अनुस्युतच आहे. एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत चालल्यामुळे, औद्योगिकीकरण, व नागरीकरणामुळे आधुनिक काळात सुरक्षितता आवश्यक झाली आहे. १४ इस्पितळे, व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. महाराष्ट्रात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू आहे.
अंमलबजावणी केलेल्या क्षेत्रांमध्ये कामगारांना एक वैद्यकीय व समान दराने रोख स्वरुपात अशा दोन पद्धतीने लाभ दिला जातो. दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत अंतर्भूत करण्यात आले आहे. वरील सर्व आस्थापनांमध्ये ह्या योजनेत पात्र होण्यासाठी रु १५०००/- ही कमाल वेतन मर्यादा (ज्यादा काम वगळून) आहे.
राज्य कामगार विमा योजना
ESI SCHEME - Medical Care
राज्य कामगार विमा योजना अधिनियम
राज्य कामगार विमा योजना अधिनियम १९४८ मध्ये आजारपण, मातृत्व, तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाचे अपंगत्व, सेवेतील इजेमुळे होणारे मृत्यू व त्यामुळे कमविण्याच्या क्षमतेत होणारी घट यासारख्या आकस्मिक घटनांमध्ये कामगारांचे हितरक्षण करण्यासाठी सामाजिक सुरक्षा देणारी सर्वसमावेशक योजना असावी अशी योजना होती. अधिनियामध्ये कामगार व त्यांच्या लगतच्या अवलंबीतांच्या वैद्यकीय देखभालीची हमी देण्यात आली आहे. अधिनियमाचा आधार घेऊन केंद्र सरकारने योजना प्रशासित करण्यासाठी राज्य कामगार विमा महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर, ही योजना दिल्ली व कानपूर येथे २४ फेब्रुवारी १९५२ रोजी प्रथम अंमलबजावणी करण्यात आली. या अधिनियमाने मालकांना मातृत्व लाभ अधिनियम १९६१ आणि कामगार नुकसानभरपाई अधिनियम १९२३ मधील बंधनातून मुक्त केले. कामगारांना देण्यात आलेले लाभ हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अभिसंधीशी सुसंगत आहेत.
(आणखी नियम व विनियम यासाठी कृपया http://www.esic.nic.in/esi_act.php ह्या लिंकवर जावे )
उपयोगिता / अंमलबजावणी
उपयोगिता
अधिनियमाच्या कलम २(१२) नुसार हे अधिनियम १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांना लागू होतात.
अधिनियमच्या कलम १(५) नुसार ही योजना २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकाने, हॉटेल्स, रेस्तोरांत, चित्रपटगृहे, रस्ते मोटार परिवहन मंडळे व वर्तमानपत्रांच्या आस्थापनांना लागू करण्यात आली आहे.
तसेच अधिनियमाच्या कलम १(५) नुसार, ही योजना २० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या खासगी वैद्यकीय व शैक्षणिक संस्थांना सुद्धा काही राज्यांमध्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने ह्या राज्य कामगार विमा योजना अधिनियमांच्या तरतुदी दुकाने, वर्तमानपत्र आस्थापना, चित्रपटगृहे, रस्ते परिवहन मंडळ, व उपाहारगृहांना लागू केली आहे.
ह्या अधिनियमात समाविष्ट होण्यासाठी दि ०१.०५.२०१० पासून वेतनाची मर्यादा रु १५०००/- आहे.
राज्य कामगार विमा योजनेच खर्च, राज्य विमा योजना व राज्य सरकार ७:१ ह्या प्रमाणात करतात. १.४.२०१२ पासून प्रति आयपी वर खर्चाची वार्षिक मर्यादा रु १५००/- करण्यात आली आहे.
टीप : १४ राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेशांनी दुकाने व अन्य आस्थापना ह्या अधिनियमांतर्गत येण्यासाठीची मर्यादा २० वरून १० वर आणली आहे. उरलेली राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेश हे लागू करण्याच्या प्रक्रीयेत आहेत.
अंमलबजावणी
ही योजना नागपूर येथे ११.७.१९५४, मुंबई व उपनगरात ३.१०.१९५४ व पुणे येथे १५.८.१९६५ अशी टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली.
आज ही योजना ४४ केंद्रांमध्ये राबविण्यात येते.
व्याप्ती
रुग्णालयांची एकूण संख्या १२+ १ ( एमजीएम रुग्णालय )
कार्यादिष्ट खाटांची एकूण संख्या २३८०
प्रस्तावित राखीव खाटा ५४८
सेवा दवाखान्यांची एकूण संख्या ६२
एकूण विमा वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या ७५५ ( २०.३.१३ रोजी)
मान्यताप्राप्त औषध विक्रेत्यांची संख्या ३१ ( २०.३.१३ रोजी )
समाविष्ट आस्थापना व कारखान्यांची संख्या ९४०५३
समाविष्ट कामगारांची एकूण संख्या २२२४९६३ ( ३१.३.२०१२ रोजी)
एकूण विमित व्यक्ती २३.२८ लाख (३१.३.२०१२ रोजी)
लाभार्थींची एकूण संख्या ९३ लाख
विमित व्यक्तीची नोंदणी
नोंदणी म्हणजे काय ?
नोंदणी प्रक्रिया म्हणजे प्रत्येक नियोक्ता / कारखान्यास व वेतनावर ठेवलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यास ह्या योजने अंतर्गत ओळख दिली जाते व त्यांच्यासाठी त्यांचे वैयक्तिक अभिलेख तयार केले जातात.
समाविष्ट होऊ शकणाऱ्या प्रत्येक कारखाना / दुकान / आस्थापना यांच्या तपशिलाची माहिती मिळविणे व त्यांना क्रमांक देऊन ओळख देणे म्हणजेच प्रादेशिक कार्यालयाने दिलेला संकेंतांक ज्यायोगे त्यांनी देय / भरणा केलेले अंशदान व मालकांच्या संबंधित जबाबदाऱ्या यांचा मागोवा ठेवणे ही पहिली पायरी होय. त्यानंतर समाविष्ट कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रादेशिक / स्थानिक कार्यालयाकडून नोंदणी ( जिथे कामगारांच्या नोंदणीचे काम विकेंद्रित झाले आहे अशा ठिकाणी ) व त्यांना क्रमांक म्हणजेच विमा क्रमांक देऊन ओळख देणे व योजनेअंतर्गत त्यांच्या पात्रतेप्रमाणे ज्या विमा लाभांना पात्र असतील अशा लाभांचे अभिलेख तयार करणे ही दुसरी पायरी होय. प्रत्येक कामगाराचे / नियोक्त्याचे वैयक्तिक अभिलेख हे भविष्यात वेळोवेळी बदल करता येतील व नियोक्त्यांकडून होकार मिळण्यावर व विमित व्यक्तींना लाभ मिळण्यावर योग्य ते लक्ष ठेवता येईल.
नियोक्त्यांची नोंदणी
१.२ राज्य कामगार विमा योजना अधिनियमाच्या कलम २ अ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आहे :-
२ अ कारखाने व आस्थापनांची नोंदणी ज्या कारखान्यांना किंवा आस्थापनांना हे अधिनियम लागू होतात, त्यांनी ह्या संदर्भात विनिर्दिष्ट केलेल्या विनियामात असलेल्या तरतुदीनुसार नोंदणी करून घेतली पाहिजे.
१.३ एक पाठपुराव्याची तरतूद म्हणून १०ब हा विनियम राज्य कामगार विमा विनियम (सर्वसाधारण) १९५० मध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यात खालील प्रमाणे नमूद करण्यात आले आहे : -
१० ब कारखाने किंवा आस्थापनांची नोंदणी –
अ) कारखाना किंवा आस्थापनेच्या संदर्भात ज्या नियोक्त्यांना हे अधिनियम पहिल्या वेळी लागू होतात पण ज्यांना नियोक्ता संकेतांक मिळालेला नाही, आणि कारखाना किंवा आस्थापनेच्या संदर्भात ज्या नियोक्त्यांना हे अधिनियम पूर्वी लागू होत होते पण काही काळासाठी लागू होत नाही, त्यांनी योग्य त्या प्रादेशिक कार्यालयात, कारखान्याला किंवा आस्थापनेला, जशी बाब असेल तशी , हे अधिनियम लागू झाल्यापासून १५ दिवसांचे आत नमुना क्र १ मध्ये नोंदणीचे घोषणापत्र सादर करावयाचे आहे. (यानंतर ह्याचा उल्लेख नियोक्त्याचा नोंदणीचा अर्ज असा करण्यात येईल )
ब) नियोक्त्याच्या नोंदणी अर्जामध्ये सादर केलेल्या सर्व माहिती व तपशिलाच्या सत्यते बद्दल नियोक्ता जबाबदार असेल.
क) जो नियोक्ता ह्या विनियमाच्या परिच्छेद अ मधील विनियमाचे त्यामध्ये निर्देशित कालमर्यादेत योग्य त्या प्रकारे पालन करीत नसेल, तिथे योग्य त्या प्रादेशिक कार्यालयाने, पूर्णपणे भरलेला नियोक्त्याचा नोंदणी अर्ज त्यांनी विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत त्या प्रादेशिक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश द्यावेत व त्या नियोक्त्याला ह्या संदर्भातील अनुदेशांचे पालन करावे लागेल.
ड) पूर्णपणे भरलेला नियोक्त्याचा नोंदणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर, त्या कारखान्यास किंवा आस्थापनेस हे अधिनियम लागू होतात अशी प्रादेशिक कार्यालयाची खात्री झाल्यास, (व त्या कारखान्याला किंवा आस्थापनेला नियोक्त्याचा संकेतांक दिलेला नसल्यास ) प्रादेशिक कार्यालयाने त्यांना संकेतांक द्यावा व ती क्रमांक नियोक्त्याला कळवावा.
ई) तदनंतर ह्या अधिनियमांतर्गत, नियम व या विनियमानुसार बनविलेल्या किंवा पूर्ण केलेल्या कुठल्याही कागदपत्रावर किंवा योग्य त्या कार्यालायाबरोबरच्या सर्व पत्रव्यवहारामध्ये तो नियोक्त्याचा संकेतांक प्रवेष्टीत केला पाहिजे.
लाभ :
वैद्यकीय लाभ
आजारपणाचे लाभ
अपंगत्वाचे लाभ
मातृत्वाचे लाभ
अवलंबितांचे लाभ
अंत्यविधीचे लाभ
अधिनियमाच्या कलम ४६ नुसार सहा प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभांची तरतूद करण्यात आली आहे :-
अ) वैद्यकीय लाभ :
विमित व्यक्तीला व त्याच्या कुटुंबियांना त्याने सेवेत प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून वैद्यकीय देखभाल केली जाते. विमित व्यक्तीच्या किंवा त्याच्या कुटुंबियाच्या उपचाराच्या खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. निवृत्त आणि कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या विमित व्यक्तींना व त्यांच्या पत्नीला वर्षाला नाममात्र रु १२० हप्त्यामध्ये वैद्यकीय देखभाल केली जाते.
उपचाराची प्रणाली
वैद्यकीय लाभाचे मोजमाप
निवृत्त विमित व्यक्तींना लाभ
राज्यातील वैद्यकीय लाभाचे प्रशासन
अधिवासी उपचार
विशेषज्ञांकडून तपासणी
अंतर्रुग्ण उपचार
एक्सरे सेवा
कृत्रिम पाय व मदत
विशेष तरतुदी
प्रतिपूर्ती
(ब) आजारपणाचे लाभ :
विमित कामगारांना प्रमाणित आजारपणात वर्षामध्ये जास्तीतजास्त ९१ दिवसांपर्यंत वेतनाच्या ७०% दराने रोख स्वरुपात नुकसानभरपाई मिळू शकते. आजारपणाचे लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी ६ महिन्यांच्या अंशदान कालावधीमध्ये विमित कामगाराने ७८ दिवसांचे अंशदान दिलेले असले पाहिजे.
विस्तारीत आजारपणाचा लाभ :
३४ प्रकारच्या गंभीर व दीर्घ मुदतीच्या आजारांमध्ये वेतनाच्या ८०% दराने आजारपणाचा लाभ दोन वर्षेपर्यंत वाढविला जाऊ शकतो.
वाढीव आजारपणाचा लाभ :
नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या विमित पुरुष व महिला कामगारांना त्यांच्या वेतनाएवढा आजारपणाचा लाभ अनुक्रमे ७ व १४ दिवसांसाठी मिळू शकतो.
(क) मातृत्वाचा लाभ :
मागील वर्षात ७० दिवसांचे अंशदान केल्याच्या अधीन राहून पूर्ण वेतनाएवढ्या रकमेचा मातृत्व लाभ तीन महिन्यांसाठी पात्र असतो व वैद्यकीय सल्ल्यानुसार तो एक महिना वाढविता येऊ शकतो.
ड) अपंगत्वाचे लाभ
तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ :
सेवेतील इजा असल्यास अंशदान अदा केले असेल अगर नसेल, तरीसुद्धा विमित सेवेत प्रवेश केल्यापासून तात्पुरत्या अपंगत्वाचे लाभ मिळतील. अपंगत्व कायम असेपर्यंत वेतनाच्या ९०% रक्कम तात्पुरते अपंगत्व लाभ म्हणून देय असेल.
कायम अपंगत्वाचे लाभ :
वैद्यकीय मंडळाने प्रमाणित केलेल्या कमविण्याच्या क्षमतेतील घटीनुसार वेतनाच्या ९०% रक्कम लाभाच्या स्वरुपात दर महा दिली जाते.
ई) अवलंबीतांचे लाभ :
विमित व्यक्तीचे सेवेतील इजेमुळे किंवा नोकरीतील जोखिमीमुळे निधन झाले असल्यास मृत व्यक्तीवार अवलंबून असलेल्या अवलंबिताना वेतनाच्या ९०% दराने अवलंबिताचे लाभ दिले जातात.
फ) इतर लाभ :
अंत्येष्टीचा खर्च : मृत विमित व्यक्तीवरील अवलंबित किंवा त्याची अंत्येष्टी विधी करणाऱ्याला रु १००००/- पर्यन्त रक्कम दिली जाते. An amount of Rs.10,000/- is payable to the dependents or to the person who performs last rites from day one of entering insurable employment. प्रसुती खर्च : राज्य कामगार विमा योजनेखाली वैद्यकीय सेवा उपलब्ध नसतील अशा ठिकाणी विमित स्त्री किंवा विमित व्यक्तीची पत्नीची प्रसूति झाल्यास प्रसुती खर्च देण्यात येतो.
त्या व्यतिरिक्त विमित कामगारांना गरजेनुसार अन्य लाभ दिले जातात.
व्यावसायिक पुनर्वसन :
कायम स्वरूपाचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण केंद्रामध्ये व्यावसायिक पुनर्वसन प्रशिक्षण घेण्यासाठी
शारीरिक पुनर्वसन :
सेवेतील इजेमुळे शारीरिक अपंगत्व आल्यास
वृद्धापकाळ वैद्यकीय देखभाल :
सेवानिवृत्ती किंवा ऐच्छिक सेवानिवृत्ती योजने अंतर्गत व कायम स्वरूपाच्या अपंगत्वामुळे सेवा त्याग करावा लागलेल्या विमित व्यक्तींसाठी व त्यांच्या पत्नीसाठी वार्षिक रु १२०/- भरून वैद्यकीय देखभाल उपलब्ध आहे.
राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना :
बेरोजगार भत्त्याची ही योजना १.४.२००५ पासून लागू करण्यात आली आहे. विमित झाल्यावर तीन किंवा जास्त वर्षांनी कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास :-
जास्तीत जास्त एक वर्ष कालावधी पर्यंत वेतनाच्या ५०% रक्कम बेरोजगार भत्ता देण्यात येईल.
विमित व्यक्तीला बेरोजगार भत्ता प्राप्त होत असेपर्यंत, त्याला व त्याच्या कुटुंबाला राज्य कामगार विमा योजना रुगानालये / दवाखान्यातून वैद्यकीय देखभाल मिळेल.
आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाटी व्यावसायिक प्रशिक्षण – शुल्क / प्रवास भत्ता यावरील खर्च राज्य कामगार विमा महामंडळ सोसेल.
अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन :
राज्य कामगार विमा योजनेचे लाभ घेण्यास पात्र होण्यासाठी वेतनाची कमीतकमी मर्यादा रु २५०००/- आहे.
केंद्र सरकारतर्फे नियोक्त्याचे अंशदान ३ वर्षांसाठी दिले जाईल.
लाभ व अन्शादानाच्या शर्ती : :
राज्य कामगार विमा योजनेचे वैशिष्ट्या म्हणजे त्यातील अंशदान हे देण्याच्या क्षमतेवर अवलंबून कामगारांना देय असणाऱ्या वेतनाची ठराविक टक्केवारीच्या स्वरुपात असते तर मिळणारा सामाजिक सुरक्षिततेचा लाभ हा प्रत्येकाच्या गरजेनुसार कोणताही भेदभाव न करता दिला जातो. महामंडळातर्फे रोख लाभ त्यांच्या शाखा कार्यालयातून / अधिदान कार्यालयातून अंश्दानाच्या शर्तींच्या अधीन राहून केले जाते.
१ वैद्यकीय देखभाल वैयक्तिक खर्चावर कोणतीही कमाल मर्यादा नसलेली प्राथमिक, दुय्यम, व तिय्यम वैद्यकीय देखभाल
२ आजारपणाचा लाभ ९१ दिवस
३ विस्तारीत आजारपणाचा लाभ ३४ विशिष्ट आजारांसाठी ७३० दिवस ( दोन वर्षेपर्यंत )
४ मातृत्वाचा लाभ ८४ दिवस + १ महिना (प्रसूति, गरोदरपण, मुदतीपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास इत्यादी )
५ तात्पुरता अपंगत्व लाभ / कायमचे अपंगत्व लाभ कमविण्याच्या क्षमतेत नुकसान झाल्याच्या प्रमाणात / अपंगत्व अस्तित्वात असेपर्यंत
६ अवलंबिताचे लाभ विमित व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ती हयात असेपर्यंत / पुनर्विवाहित होईपर्यंत व कुटुंबियांना विवाह / वया संबंधी असलेल्या शर्तीनुसार
७ राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना कारखाना / आस्थापना बंद झाल्यावर किंवा कपातीमुळे किंवा सेवेतील इजेमुळे ४०% पेक्षा कमी नसलेल्या कायमस्वरूपी अपंगत्वामुळे तो बेरोजगार झाल्यास एक वर्षा पर्यंत दैनंदिन सरासरी वेतनाच्या ५०% पर्यंत
८ अपंग व्यक्तींना नियमित सेवेत घेणाऱ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांना प्रोत्साहन रु २५०००/- पर्यंत मासिक वेतन घेणाऱ्या अपंग व्यक्तींच्या नियोक्त्यांच्या अंशदान पहिल्या तीन वर्षांसाठी केंद्र सरकार तर्फे देण्यात येईल
९ निवृत्त विमित व्यक्तींना वैद्यकीय देखभाल वार्षिक रु १२०/- भरून राज्य कामगार विमा योजने अंतर्गत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा.
संपर्क :
मुख्य कार्यालय :
आयुक्त कार्यालय, राज्य कामगार विमा योजना, पंचदीप भवन, सहावा मजला, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ मुंबई ४०००१३ ०२२–२४९५०८१९
राज्य कामगार विमा इस्पितळे :
क्र. पत्ता दूरध्वनी क्र
१ गणपतराव कदम मार्ग, पोद्दार रुग्णालया मागे वरळी -१८ ०२२- २४९३३१४२/४३
२ ठाकूर व्हीलेज्, केलीपाडा कांदिवली पूर्व मुंबई ४००१०१ २८८७७७६९
३ लाल बहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम मुंबई ४०००८० २५६००६९६
४ वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम – ४००६०४ २५८२३५५१
५ सेक्टर ५, वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे २७८२१२६४
६ सेंट्रल हॉस्पिटल जवळ, कॅम्प क्र ३ उल्हासनगर ३ जिल्हा ठाणे ०२५१- २७०१२२२
७ मोहन नगर चिंचवड पुणे १८ ९५२०- २७४६८६६६
८ होटगी रस्ता सोलापूर ०२१७- २६०१७४७
९ त्र्यम्बक रस्ता नासिक ०२५३- २३५१०४५
१० एमआयडीसी सिडको, चिकलठाणा औरंगाबाद ०२४०- २४८०४६५
११ मानेवाडा रस्ता, सोमवारी पेठ नागपूर . ०७१२- २७४१५३५
१२ डॉ एस एस राव रस्ता, परळ मुंबई ४०००१२ २४१३००३५
राज्य कामगार विमा योजना सेवा
क्र. सेवा दवाखाना दूरध्वनी क्र
१ चेम्बुर दवाखाना , प्लॉट क्र ७०, जोशी हॉस्पिटल इमारत, डी एस रस्ता, आंबेडकर उद्यानासमोर मुंबई ९३२०७१९८७७
२ राज्य कामगार विमा रुग्णालय, सेंट्रल रस्ता, एमआयडीसी अंधेरी पूर्व ९९२०७६८२०६
३ सायन राज्य कामगार विमा सेवा दवाख्नाना, नागरी आरोग्य केंद्र, पहिला मजला, ६० फुटी रोड धरावी मुंबई Sion ESIS Service Dispensary Urban Health Center, 1 st floor, 60 feet road dharavi, Mumbai. ९८३३९४४३२१
४ राज्य कामगार विमा योजना विशेषज्ञ केंद्र, मशीद प्लाझा इमारत, पाठारे रोपवाटिकेजवळ, डॉ आंबेडकर रस्ता कल्याण (पश्चिम ) ०२२-२२००३०९
५ चारकोप औद्योगिक वसाहत, राज्य कामगार विमा योजना स्थानिक कार्यालय दवाखाना कांदिवली पश्चिम मुंबई ०२२- २८६८३९०६
८ राज्य कामगार विमा योजना दवाखाना लाल बहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम मुंबई . ०२२—२५६४५५२१ /२२/२३
७ राज्य कामगार विमा महामंडळ, एमजीएम कॉम्प्लेक्स पहिला मजला, एस एस राव रस्ता परळ मुंबई . ०२२- २४१३२५७५
८ कल्याण दवाखाना पहिला मजला, अकबर आली पलेस, शिशुविकास शाळेजवळ पाठारे रोपवाटिकेजवळ डॉ आंबेडकर रस्ता, कल्याण पश्चिम ठाणे ९९२०४४४५१२
९ विले पार्ले दवाखाना, नानावटी रुग्णालयाजवळ सरोजिनी नायडू रस्ता, विलेपार्ले पश्चिम. . ०२२-२६१२६३९३
१० राज्य कामगार विमा महामंडळ सेवा दवाखाना, जयहिंद पेट्रोल पंपाजवळ पुणे मुंबई महामार्ग रस्ता, पुणे ०२०-२७४७००२०
११ वैद्यकीय अधीक्षक ०२०-२७४६२५१४ राज्य कामगार विमा दवाखाना ०२०- ७४६२४८६, ब्लॉक डी-३, सर्व्हे क्र १३०, प्लॉट क्र ९,१०,११, मोहन नगर चिंचवड पुणे ४११०१९ ०२०-२७२८०२८६ / २७४७००२०
१२ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, “बदादे बिल्डिंग “ होटेल कृष्णछाया जवळ गाडीतळ हडपसर ०२०-२६९९९१७८ /९४२२०८५९१०
१३ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, गव्हाणे वस्ती, औयोगिक वसाहत, लांडेवाडी भोसरी ०२७१-२१०३६
१४ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, ४०५ गुरुवार पेठ, जुन्या सिव्हील हॉस्पिटल आवार, सातारा ९२२५१००५०७
१५ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, सर्व्हे क्र २७६, डॉ आर पी पाटील शाळे समोर, मुक्काम पोस्ट कुपवाड तालुका मिरज ९८२२३४५२५१
१६ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, राजवाडा चौक सांगली ०२३३-२३७७६३६
१७ पहिला मजला, सुतिकागृह, जवाहर रुग्णालय आवार बार्शी ०२१८४-२२२४२७
१८ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, / शाखा कार्यालय १५९/१६० पंच्दीप भवन लक्ष्मी पथ दमाणी नगर ९४२२४५९००७
१९ प्रभारी वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा योजना दवाखाना,, महात्मा फुले मार्केट . ९०११५५७२६७
२० राज्य कामगार विमा योजना दवाखाना, प्रादेशिक कार्यालय इमामवाडा, आयसोलेशन रुग्णालया समोर ESIS RO Immamwada Near opposite isolation hospital ०७१२-२७४१४३५ /२७४१५३५
२१ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, अंबड सीएफसी बिल्डिंग, एमआयडीसी अंबड नासिक १० ०२५३-२३८३४१०
२२ राज्य कामगार विमा योजना दवाखाना, अशोकस्तंभ , भगवान प्रसाद आश्रमाजवळ घारपुरे घाट नासिक ४२२००२ ०२५३-२५७५९६०
२३ प्रभारी वैद्यकीय अधिकारी, द्वारा युसुफ शेख बिल्डिंग, दानिश मंझिल, वार्ड क्र ३, घर क्र ७८, कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, नवीन वसाहत बुटीबोरी, नागपूर ०७१०३-२०२५४५
२४ नांदेड क्र १ दवाखाना, धूमपलवार बिल्डिंग एसआयडी सिडको नांदेड ४३१६०१ ९०९६८२०४६६ /०२४६२-२५९९०८
२५ प्रभारी वैद्यकीय अधिकारी, द्वारा श्री अब्दुल रशीद बिक्ल्दिंग प्लॉट क्र १०२, एनआयटी बगीचा जवळ, दत्तात्रय नगर नागपूर ०७१२-२७४६१८४
२६ राज्य कामगार विमा योजना केंद्रिय भांडार, आयसोलेशन रुग्णालया जवळ इमामवाडा ४००००३ ०७१२-२७४४७३७
२७ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा अनुसयाबाई तुळशीराम दंडे, प्लॉट क्र ९५, दंडे भवन दरोडकर चोक गरोबा मैदान नागपूर. ०७१२-२७६४३११
२८ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा श्रीमती आशा रामराव वानखेडे यांची बिल्डिंग, प्लॉट क्र १७ गावंडे लेआउट रिंग रोड, खामला नागपूर IMO C/o Smt Asha Ramrao Wankhede's Building, Plot No,17 Gawande layout Ring Road, khamia nagpur. ०७१२-२२८४२१०
२९ प्रभारी वैद्यकीय अधिकारी श्री मुदलीयार यांची इमारत , गड्डीगोदाम चौक कामठी रस्ता नागपूर . ०७१२-२५६०८२०
३० प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा डॉ अभय भाऊराव मुडे, खेडेकर मुलांच्या रुग्णालयासमोर, लक्ष्मी टोकीज चौकाजवळ, शिवाजी वार्ड, तेहसील कचेरी रस्ता, हिंगणघाट जिल्हा वर्धा. ९४२२१४३७/०७१५३
३१ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा डॉ संदीप कश्यप, घर क्र एस/३६ कलांना रस्ता कामठी नागपूर . ०७१०९-२७०७२८
३२ राज्य कामगार विमा योजना कुकडे दवाखाना जोशीवाडी, एक्सप्रेस मिल कॉलोनी प्लॉट क्र ४०अ कुकडे लेआउट नागपूर २७. ०७१२-२७४९१९७
३३ राज्य कामगार विमा योजना दवाखाना सिडको, एन-३२/एफ-१ सेक्टर सप्तशृंगी चौक, लेखा नगर सिडको नाशिक ०९. ०२५३-२३९२६०१ /२३७२२०८
३४ राज्य कामगार विमा योजना, सोमवारी पेठ दवाखाना परिचारिका वसतीगृह इमारत, राज्य कामगार विमा योजना रुग्णालयासमोर, मानेवाडा रस्ता नागपूर ९५०३९८३०६५ / ०७१२-२७४४७८५
३५ प्रभारी वैद्यकीय अधिकारी सेलोकर भवन, हनुमान नगर नागपूर ०९ ०७१२-२७४४३३७
३६ बँक ऑफ महाराष्ट्रा जवळ, कॉमन सर्व्हिस सेंटर बिल्डिंग, औद्योगिक वसाहत हिंगणा रोड नागपूर ९४२२११९१३२ /०७१०४-२३७३९६
३७ नांदेड क्र २ एमआयडीसी नांदेड . ०२४६२- २४२४२७
३८ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा श्री विजय लांबट यांची बिल्डिंग, प्लॉट क्र १८७, नंदनवन लेआउट नागपूर ०७१२-२७४६४३२
३९ राज्य कामगार विमा योजना दवाखाना नासिक रोड – पहिला मजला, प्रशासकीय इमारत नासिक महानगरपालिका नासिक ०१ ०२५३-२४६३७१०
४० प्रभारी वैद्यकीय अधिकारी श्रीमती व श्री जल्स्वाल यांची इमारत, कमाल चित्रपटगृहाजवळ गणेश भवन लष्करबाग नागपूर. ०७१२-२६४०२१७
४१ राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सातपूर . ०२५३-२३६३९०६
४२ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा श्री बाळकृष्ण सावंत यांची इमारत, दक्षिणा मूर्ती चौक हिंदू मुलींच्या शाळेच्या मागे, महाल नागपूर ०७१२-२७४२४३५९
४३ नांदेड क्र ३ दवाखाना नारायणराव पांडुरंगराव चन्नावर इमारत क्र २-९/२१५, सोमेश कॉलोनी, कार्ला मंदिराच्या मागे नांदेड ९६०४७८१५६०
४४ प्रभारी वैद्यकीय अधिकारी विदर्भ सहकारी विपणन संस्था, पंचादीप भवन जवळ, गणेशपेठ नागपूर. ०७१२-२७२६१९७
४५ प्रभारी वैद्यकीय अधिकारी द्वारा श्री अजित सिंग मुलींची इमारत खादगाव रस्ता, वाडी नागपूर ०७१०४-२२३२८३
४६ डॉ श्री कांबळे यांची इमारत, जुने शहर, भाग्रथ वाडी हरीपेठ अकोला ०७२४-२४३५७४२
४७ श्री गजानन वाडोकर यांची इमारत, एमआयडीसी फेज, प्लॉट क्र, गजानन उपहारगृहा जवळ, पोलीस चौकी जवळ अकोला . ०७२४- २२५९०६४
४८ श्री के के बघेल यांची इमारत, शांती निवास, स्टेशन रस्ता, रामदास पेठ अकोला. ०७२४-२४३३७२९
४९ राज्य कामगार विमा योजना दवाखाना डॉ मुदलीयार कंपौंड, खापर्डे गार्डन, कलंत्री इमारत अमरावती ०७२१-२६६१५३२
५० राज्य कामगार विमा योजना दवाखाना कर ४, एस टी कार्यशाळेजवळ चिकलठाणा ०२४०-२४८२४४४
५१ राज्य कामगार विमा योजना दवाखाना क्र ३, मयुरी होटेल जवळ, जळगाव रस्ता, एन११ हडको औरंगाबाद ९४२२२०२४८१
५२ राज्य कामगार विमा योजना दवाखाना क्र २ खडकेश्वर रस्ता, मिल कॉर्नर, औरंगाबाद ४३१००१ ०२४०-२३२१२४०
५३ राज्य कामगार विमा योजना दवाखाना क्र १, महावीर कॉम्प्लेक्स, महाराणा प्रताप चौक, बजाज नगर वाळूंज औरंगाबाद ०२४०-२५५४३३६
५४ वैद्यकीय अधिकारी द्वारा श्रीमती मालिनीबाई आंबटकर यांची इमारत, रामनगर सिव्हील लाईन्स चंद्रपूर ०७१७२-२५४४०३
५५ धुळे क्र १, मदुर शॉपिंग सेंटर ०२५६२-२३६८७५
५६ धुळे क्र २, मदुर शॉपिंग सेंटर, कारागृह रस्ता ०२५६२-२३६८७५
५७ राज्य कामगार विमा योजना दवाखाना अमळनेर पी हस्माजी प्रेमाजी शॉपिंग सेंटर, मंगलमूर्ती पतपेढी समोर पहिला मजला अमळनेर ४२५४०१ ०२५७८-२२३५३८
५८ राज्य कामगार विमा योजना दवाखाना चाळीसगाव प्लॉट क्र २२५, वार्ड क्र १९ लक्ष्मीनगर समोर, चाळीसगाव ४२४१०१ ०२५८९-२२२२२३
५९ राज्य कामगार विमा योजना दवाखाना क्र २ २०/२१ रामनगर, जे जे अग्रोच्या मागे, एमआयडीसी एरिया, जुना मेहरूण रस्ता, जळगाव ४२५००३ ०२५७-२२११२१९
६० राज्य कामगार विमा योजना दवाखाना औद्योगिक वसाहत इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर ९४२२४१७२८४ / २३०-२४३७३०२
६१ नागाळा पार्क, ४४३ सीताराम इमारत नागाळा पार्क कोल्हापूर. ०२३१-२६५३१९७
६२ राज्य कामगार विमा योजना दवाखाना १३९१-ई शाहू नगर राजारामपुरी कोल्हापूर तालुका व जिल्हा कोल्हापूर. ०२३१-२६९२६६६
६३ १८२७/बी ए-वार्ड ताराबाई पार्क कोल्हापूर ०२३१-२६२२४०६
६४ राज्य कामगार विमा योजना दवाखाना क्र १ प्लॉट क्र ३, हिम कमल, दिवाणी न्यायालयासमोर, जिल्हा पेठ जळगाव ४२५००१ ०२५७-२२२९२८३
६५ स्वमिराज शिखरे इमारत, बालनत्रोआ मराठे कन्या विद्यालय शिवाजी नगर मिरज ९४२३२६९३९८