1 उत्तर
1
answers
उसावर मावा पडला आहे काय करावे ?
6
Answer link
व्यवस्थापनाचे उपाय :
१) ऊस लागवड फेब्रुवारीनंतर करू नये.
२) ऊस लागवड करताना जर्मिनेटर बरोबर प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाचा बेणे प्रक्रियेसाठी वापर करावा.
३) ऊस उगवणीनंतर ऊस ४५ दिवसांचा झाल्यावर बाळबांधणी करावी म्हणजे खोडकिडीने निर्माण केलेली छिद्रे बंध होतील व पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल.
४) खोडकिडीची अंडी व किडग्रस्त भाव अळ्यासह गोळा करून नष्ट करावा.
५) खोडकिडीची अळ्या ऊस तोडणीनंतर खोडक्यात राहतात, म्हणून ऊस तोडणी नंतर लगेच नांगरणी करावी व अळ्या गोल करून नष्ट कराव्यात.
६) ऊस उगवणीनंतर पाचटाचे ५ टन प्रती हेक्टरी आच्छादन करावे म्हणजे खोडकिडीचया अळ्यांना खोडामध्ये जाताना अडथळा होईल.
७) २५ कामगंध (फेरोमोन) सापळे प्रती हेक्टरी लावावेत.
८) खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अंड्यावरील परोपजीवी कीटक ट्रायकोग्राम चिलोनीस हेक्टरी ५० हजार प्रमाणे दर १० दिवसाच्या अंतराने ४ ते ६ वेळा सोडावेत.
९) उसाची लागवड करताना सरीमधून कार्बारील दाणेदार हेक्टरी २५ किलो द्यावे.
१० ) उसाची लागवड झाल्यानंतर २१ दिवसांनी अथवा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रोटेक्टंट २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी १५ टक्के गाभेमर आहे. गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.
११) खोडकिडग्रस्त ऊस उपटून अळीसह नष्ट करावा.
१२) उसाची तोडणी जमिनीलगत करवी.
लोकरी माव्याचे व्यवस्थापन : जगात लोकरी माव्याच्या सिरटोव्हॅक्यूना लॅनिजेरा, सिराटोव्हॅक्यूना ग्रामिनम व सिरटोव्हॅक्यूना जापोनिका या तीन जातीआढळतात. त्यापैकी भारतातील उसावर सिरटोव्हॅक्यूना ग्रामिनम या जातीच्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. महाराष्ट्रामध्ये प्रथम सांगली जिल्ह्यात को.सी. ६७१ व को. ८६०३२ ह्या जातीच्या उसावर जुलै २००२ मध्ये लोकरी माव्याचा उपद्रव्य आढळून आला. त्यानंतर त्याचा प्रसार दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये वाढू लागला. ही कीड बाल्ल्यावस्थेत ४ वेळा कात टाकते, म्हणजेच चार रूपांतर अवस्थेतून जाते.
प्रथम बाल्यावस्थेतील ही कीड ०.७७ मि. मी. लांब ब ०.२७ ते ०.३८ मि.मी. रुंद पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असते. ही अवस्था अतिशय चपळ असून पोटाच्या मागील भागात दोन कॉरनिकल्स असतात. द्वितीय बाल्यावस्थेत कीड १.२३ मि.मी. लांब व ०.३० ते ०.४६ मि.मी. रुंद, तृतीय बाल्यावस्थेतील १.८३ मि.मी. लांब व ०.४६ ते १.०७ मि.मी. लांब रुंद व चौथ्या बाल्यावास्थेतील २.०१ मि.मी. लांब व ०.६५ ते १.२८ मि .मी. रुंद आढळते. साधारणपणे तिसर्या बाल्यावस्थेपासून किडीच्या पाठीवर पांढरे लोकारीसारखे तंतू दिसू लागतात. हे तंतू संरक्षणासाठी तयार केलेले मऊ कवच असते. हे कवच तयार करण्यासाठी लागणारे अमीनो आम्ल व नत्र कॉरनिल्समधून बाहेर टाकले जाते. बाल्यावस्था पानाच्या पाठीमागे प्रामुख्याने मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला स्थिरावलेली आढळते. प्रादुर्भाव वाढत गेल्याने पानाच्या इतर भागावरही दिसून येते.
प्रौढ अवस्थेतील कीड : चौथ्या अवस्थेनातर कात टाकून प्रौढ कीड बाहेर येते. प्रौढ कीड बाहेर येते. प्रौढ काळ्या रंगाचे, २.०९ मि. मि. व ०.४७ ते ०.७८ मि. मी. रुंद असतात. पाठीवर पारदर्शक रुंद पंखाच्या २ जोड्या असतात. पंख २.७१ मि.मी. लांब व १.२१ मि.मी. रुंद असून पंखाखालील शिरा स्पष्टपणे दिसतात. प्रौढ अवस्थेतील किडीला दोन संयुक्त डोळे असतात. पोटाकडील भागात दोन कॉरनिकाल्स आढळतात. कॉरनिकल्स प्रौढापेक्षा बाल्यावस्थेमध्ये ठळकपणे आढळून येतात.
उपद्रव : माव्याचे तोंड सोंडेसारखे असून पुढील पायाच्या जोडीच्या मध्य भागात वाकलेले असते. सोंडेच्या आत सुईसारखा अवयव असतो. याद्वारे पानाच्या पाठीमागील पर्णरंध्रातून मावा रस शोधतो. पानाच्या अन्नवाहक नलिकेत मावा सुईसारखा अवयव खुपसून तोंडातील लाळ सोडतो व रसातील साखर अमिनो आम्ल व नत्रयुक्त पदार्थ शोषतो. पानाच्या अन्नवाहक नलिकेमध्ये नत्र व अमिनो आम्लापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. जास्तीत - जास्त नत्र मिळविण्यासाठी मावा रस जास्त शोषतो. शरीरास आवश्यक असणारी साखर घेऊन मधासारखा पदार्थ विष्टेवाटे बाहेर फेकला जातो. मावा पानाच्या खालील बाजूस असल्याने त्याने टाकलेली विष्टा खालच्या पानाच्या वरील बाजूवर पडते. त्यामुळे तेथील पानाच्या भागावर (गोड विष्टेवर) काळ्या रंगाची परोपजीवी (कॅप्नोडीयम) बुरशी वाढते. संपुर्ण पान काळे पडते व पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. किडग्रस्त पानांच्या मुख्य शिरेच्या दोन्ही बाजूला व पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. प्रमाण वाढत जाऊन पाने ठिसूळ बनून पानांच्या कडा कोरड्या पडतात. नंतर पुर्ण पाने कोरडी पडून वाळतात. उसाची वाढ खुंटते. परिणामी ऊस उतपन्न व साखर उतार्यात घट येते.
ह्या किडीचा प्रादुर्भाव ढगाळ हवामान थंड हवा, १९ ते ३५ डी. सेल्सिअस तापमान, ८० ते ९५% सापेक्ष आर्द्रता तसेच १००० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस अशा वेळी होतो.
प्रेजोत्यादन पिल्लांन थेट जन्म देऊन होते. पंख असलेली प्रौढ मादी व नराचे मिलन होते व २४ तासात १५ ते ३५ (जास्तीत जास्त ४३) पिल्लांना जन्म दिला जातो. या पिलांमध्ये मादी पिलांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी काळात मोठ्या प्रमाणात होतो.
नर व मादीच्या मिलनाशिवायही मादी पिल्लांना जन्म देते. या पिलांमध्ये नरांचे प्रमाण अधिक असते. ४ बाल्यावास्थातून मावा तयार होतो. साधारणपणे ६ ते २२ दिवात बाल्यावस्था पुर्ण होऊन १ महिन्यात ह्या किडींचा जीवनक्रम पुर्ण होतो.
या किडीच्या नियंत्रणासाठी : क्रायसोपरला कारनी हा परभक्षक मित्र किटक मऊ शरीराच्या किडीवर उपजीविका करतो. क्रायसोपरला कारनी किटकाची एकरी १००० अंडी किंवा अळ्या सोडाव्यात. किडीचा प्रादुर्भाव झाल्याझाल्या लवकरात लवकर सोडाव्यात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास कीड नियंत्रण त्वरीत होत नाही. त्यासाठी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर पुढील प्रमाणे करावा.
बेणे प्रक्रिया : ऊस लागवडीपुर्वी बेणे प्रक्रिया गरजेचे आहे. त्यासाठी जर्मिनेटर १ लि.+ प्रोटेक्टंट १ किलो + १०० लि.पाणी या द्रावणात बेणे १० -१५ मिनिटे भिजत ठेवून लागण करावी. त्यामुळे उगवण एकसारखी, लवकर आणि पुर्ण होते. शिवाय बेणे प्रक्रियेत प्रोटेक्टंट या आयुर्वेदिक किटकनाशकाचा वापर केल्यामुळे सुरुवातीपासूनच लोकरी माव्यास प्रतिबंध होतो. ऊस उगवून आल्यानंतर मर किंवा काजळी काणी होऊ नये म्हणून एकरी जर्मिनेटर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो पाण्यातून सोडावे.
डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर : उसाचे अधिक फुटवे निघून वाढ जोमाने होण्यासाठी तसेच कांड्याच्या संख्येत, जाडीत व लांबीत वाढ होण्यासाठी पुढीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.
१) पहिली फवारणी : ( उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर १ लि.+ थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.
२) दुसरी फवारणी : (पहिल्या फवारणीनंतर १।। ते २ महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.
३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ३ ते ४ महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि.+ प्रोटेक्टंट १ लि. + १५० लि.पाणी. एकत्र मिसळून फवारावे.
तसेच एकरी जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाण्यातून महिन्याच्या अंतराने ३ ते ४ वेळा सोडावे.
या फावराण्यांमुळे उसाचे फुटवे भरपूर फुटून पाने रुंद होऊन त्यावर लव तयार होते. त्यामुळे उसावर खराब हवामानाचा वाईट परिणाम होत नाही . तसेच फुटवे भरपूर फुटल्यामुळे जमीन पुर्ण झाकली जाते. एप्रिल, मे महिन्यात कडक उन्हापासून होणारे बाष्पीभवन थांबते. जमिनीत ओलावा फार काळ टिकतो. परिणामी मध्यमा पाण्याच्या पाळ्यावरही उसाची वाढ चांगली होते. वरील फवारणीमध्ये उसासाठी क्रॉंपशाईनर या औषधाची गरज भासत नाही, मात्र तापमान जर ४२ ते ४४ डी. सेल्सिअसच्या वर गेले तर आणि पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीमधील अंतर वाढत असल्यास वरील फवारणीमध्ये 'क्रॉंपशाईनर' औषध १ लिटर ते १।। लिटर घेऊन फवारणी करावी.
अति पावसाने कोल्हापूर, सांगली भागातील उसाची पाने पिवळी पडतात, पाने फाटतात. पाने कडेने सडू लागतात, शेंडावाढ थांबते. अशा परिस्थितीत जर्मिनेटर, थ्राईवरसोबत 'क्रॉंपशाईनर' १ ते १।। लि/ १५० ते २०० लि. पाण्यातून फवारावे.