शेती पिके कीटक नाश शेतकरी

टोळधाड किड्याबद्दल माहिती द्यावी?

1 उत्तर
1 answers

टोळधाड किड्याबद्दल माहिती द्यावी?

0
🔔 _*शेतकऱ्यांनो ! देशात टोळधाडीचा धुडगूस; महाराष्ट्रात विदर्भातून एन्ट्री*_

🔰📶 _*महा डिजी | अपडेट्स*_

🦗 _देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या टोळधाडीने मे महिन्यात धुडगूस घातला आहे. हरियाना, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या विदर्भात अमरावती, वर्धा येथे टोळधाडीने शिरकाव केला असून पिके फस्त करण्यास सुरवात केली आहे. राजस्थानमधील 18, उत्तर प्रदेशातील 17, मध्यप्रेदशातील 8 जिल्ह्यांमध्ये थैमान घालण्यास सुरू केले आहे._

🧐 _*काय आहे टोळधाड ?*_
_टोळ हा एक विध्वंसक कीटक आहे. टोळांचा एक थवा शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतो. 1 किलोमीटरच्या एका थव्यात जवळपास 8 कोटी टोळ असतात. 1 टोळ जवळपास 2 ग्रॅम किंवा त्याच्या वजनाएवढी हिरवी वनस्पती फस्त करू शकतो. टोळधाड एका दिवसांत 130 किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते. ‘एफएओ’च्या मते, ‘‘4 कोटी टोळांचा एक थवा 35 हजार लोकांना पुरेल एवढे अन्न एका दिवसांत फस्त करतो, म्हणजेच 80,500 किलो अन्न 1 टोळांचा थवा 1 दिवसांत फस्त करु शकतो._

🌾 _*या पिकांना धोका*_
_अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडिद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा पिके शेतकऱ्यांनी जिवापाड जोपासली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणले नाही आणि टोळ असेच विस्तारत राहिल्यास हि सर्व पिके टोळ फस्त करतील, यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसेल. त्यामुळे टोळधाडीवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे._
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 29/5/2020
कर्म · 569205

Related Questions

जानेवारी महिन्यात कोणती पिके घावित?
सोयाबीन पिकाचे उत्पन्न कसे वाढवता येते?
प्रक्रियेतील कडधान्य वापरावीत का?
पिक रचना म्हणजे काय ?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
पिकांमध्ये वाढणाऱ्या अनावश्यक वनस्पतींना ______म्हणतात?
मास निवड पद्धती कोणत्या पिकात वापरली जाते?