कीटक नाश मच्छर

मलेरिया कोणत्या डासांमुळे होतो?

1 उत्तर
1 answers

मलेरिया कोणत्या डासांमुळे होतो?

2
कसा होतो मलेरिया?
' मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात.

' मलेरिया'चे चार प्रकार-
(1) प्लासमोडियम फेल्सीपेरम
(2) प्लासमोडियम वाइवॅक्स
(3) प्लासमोडियम मलेरिया
(4) प्लासमोडियम ओवेल
प्लासमोडियम फेल्सीपेरम व प्लासमोडियम वाइवॅक्स हे कमी क्षमतेचे आजार आहे मात्र, फेल्सीपेरम मलेरिया सर्वात धोकेदायक असून याचे संक्रमण झपाट्याने होते.

कसा पसरतो मलेरिया-
' मलेरिया' एक विषाणूपासून संक्रमित केला जातो. या विषाणूचे संक्रमण डास चावल्याने होते. डास चावत असताना रक्त ओढत असतो, त्या दरम्यान मलेरियाचा विषाणू शरीरात प्रवेश करतो व सरळ पोटात जाऊन बसतो. त्या ठिकाणी तो आपली संख्या वाढवतो. 8-9 दिवसात ते विषाणू मोठे होतात व तांबड्या रक्त पेशींवर हल्ला चढवितात. तेव्हा त्या ठिकाणी ही ते त्यांची संख्या वाढवितात.

कोणता डास धोकादायक-
' एनोफिलिस' जातीचा डास मलेरियाच्या विषाणूंचे संक्रमण करतो. मलेरिया झालेल्या व्यक्तीला हा डास चावतो व रक्त शोषत असताना मलेरियाचे विषाणू डासाच्या शरीरात प्रवेश करतात. तोच डास मलेरिया न झालेल्या व्यक्तीला चावतो तेव्हा त्याच्या शरीरात ते विषाणू प्रवेश करतात व त्याला ही मलेरियाची लागण होते.
उत्तर लिहिले · 28/2/2021
कर्म · 14895