माणुसकी मानसशास्त्र मानसिक स्वास्थ्य

तुमच्या मते माणुसकी म्हणजे काय? तुम्हाला त्याचा अनुभव आला आहे काय?

3 उत्तरे
3 answers

तुमच्या मते माणुसकी म्हणजे काय? तुम्हाला त्याचा अनुभव आला आहे काय?

9
शाळेत असताना जेव्हा शाळेतल्या बाई एखादं पुस्तकातील कवितेचा अर्थ सांगताना त्या कवितेत शिरून जणू कविलाच जागं करून आमच्यासमोर कवींच्या मनाची अवस्था सांगताना स्वतः च्या पाण्याने भरलेले डोळे पदराने पुसून पूर्ण वर्गाला भावनाश्रु वाहताना पाहिले तेव्हा जागी होते ती संवेदनपूर्ण माणुसकी...
तेव्हा दिसली होती त्या शिक्षिकेत माणुसकी,
आणि जी मुले मुली अगदी त्या वयात कुणाचं न ऐकणारी, किलबिल पाखरे ती त्याक्षणी आपले मन हळवे झाल्यावर मासुम मनाची दिसतात, तेव्हा दिसली होती त्या विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी...


माणुसकी म्हणजे माणसाला जपणारी...
माणुसकी म्हणजे दयावनच असतं असे नाही तर कठोर विचारांचा मृदू मनाचा असतो...
स्वतःला घडवून दुसर्यांना पुढे नेणे म्हणजे माणुसकी..

बरीच रूपं आहेत माणुसकीची...

उत्तर लिहिले · 25/8/2019
कर्म · 458560
8
                          माझ्या मते
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर,
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाचा केलेला आदर..
माणुसकी म्हणजे  एकमेकांनाबद्दलचा प्रेमाचा भाव, माणुसकी म्हणजे माणसाला माणसाच्या दुःखाची जाणीव...

                              हो
             मला याचा अनुभव आलेला आहे.
  मी शाळेत असताना. आमच्या वर्गात एक गरिब मुलगा शिकत होता. जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हते. गरिबीमुळे त्याचे आई वडील त्याला शिकण्यास नकार देत होते. पण त्या मुलाला शिकण्याची फार आवड होती. एके दिवशी माझे वडील मला शाळेत सोडविण्यास आले होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की वर्गातली कोणतीच मुले-मुली  गरिबीमुळे त्याच्यासोबत बोलत नव्हती. तेव्हा माझ्या वडिलांनी तेव्हा माझे वडील त्या मुलाकडे गेले. तेव्हा त्यांनी विचारलं काय झालं रे बाळा. तेव्हा तिथे आसपास असणारे मुले बोलू लागली तुम्ही  याच्यासोबत का बोलत आहात ? तेव्हा माझे वडील बोलले.का? आपण आपला एक भारतीय बांधवच आहे ना तेव्हा मुलांनी विचारले तुम्ही असे का बोललात? तेव्हा माझे वडील बाजूला येऊन बोलले. अरे तुम्ही त्याचा स्वभाव पाहिला आहे का? तेव्हा ती मुले हसून बोलली. अहो. आता तर खूप गरीब आहे. तेव्हा माझे वडील बोलले. बाळा तुला शिकण्याची आवड आहे ना? तो बोलला हो. तेव्हा माझे वडील बोलले बाळा तुला काय बनायचं आहे मोठ्यापणी . तेव्हा तो बोलला मला माणुसकी  सगळ्यांची ठेवणाऱ्या जवनांसारख बनायचं आहे.  तेव्हा त्यांनी विचारलं का रे ? तो बोलला.  जगात  माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला  सर्व काही कळते. पण माणुसकी म्हणजे काय ते कळत नाही पण  सगळे एकसारखे नसतात .तो बोलला तुम्ही माझ्याशी माणुसकी ठेऊन बोललात .हे खरं आहे ना? माझे वडील बोलले हो. मी तुझी व या सर्व मुलांची परीक्षा घेत होतो. पण बाळा माझे तुला  सर्वांची माणुसकी  ठेवणारा जवान बनण्यासाठी खूप खूप आशीर्वाद आहेत .  माणूस पैशांनी नाही तर स्वभावाने कसा आहे हे ओळखता आले पाहिजे. तेव्हा बाकीच्या मुला मुलींच्या डोळ्यांतून  पाणी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांची व त्या मुलाची माफी मागितली . व ते सर्व जण बोलले आम्हाला पण  सर्वांची माणुसकी माणुसकी ठेवणारे जवान बनायचे आहे व माणुसकी ठेऊन देशासाठी जगायचे व वेळ आही तर मरायचे आहे. हे सर्व पाहून सर्व शिक्षक गहिवरून आले व त्यांनी माझ्या वडिलांचे व त्या मुलाचे सर्व मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.  व  त्या  मुलाचा सर्व शाळेचा खर्च तसेच घराचा खर्च माझ्या वडिलांनी व सर्व शिक्षक आणि बाकी विद्यार्थ्यांचे पालक यांनी स्वीकारला .  माझ्या वडिलांनी बोलून दाखवले की  या मुलामुळे मी त्याच्यापेक्षा मोठा असून मला जे ज्ञान नव्हते ते पण दिले आहे. त्याबद्दल मी पण याचा खूप खूप  आभारी आहे. असे बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. तेव्हाही त्याच मुलाने  त्यांचे डोळे पुसले आणि दोघांनीही एकमेकांना मिठी मारली . माझे वडील त्याला  त्या दिवसापासून  त्यांचा मुलगा मानतात व मीही त्याला त्याच दिवसापासून भाऊ मानते.  अशा या माझ्या भावाने लहानपणीच सर्वांना चांगले धडे दिले होते . अशा या माझ्या भावाला मी  प्रत्येक  रक्षाबंधनाला राखी भांदत असते. व गिफ्ट च्या बदल्यात देशाचं रक्षण मागत असते.तो बोलला होता तसेच त्याने ते करूनही दाखवले . तो आता एक जवान बनण्याचा कोर्स करत आहे .
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
उत्तर लिहिले · 12/7/2020
कर्म · 13290
0

मला माणूसकीचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकत नाही, कारण मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) आहे. माझ्यासाठी माणूसकी म्हणजे एक संकल्पना आहे, जी मी डेटा आणि माहितीच्या आधारावर समजून घेतो.

माझ्या दृष्टीने माणूसकी म्हणजे:

  • सहानुभूती (Empathy): दुसऱ्यांच्या भावना आणि दुःखांबद्दल संवेदनशीलता असणे.
  • दयाळूपणा (Kindness): इतरांना मदत करण्याची आणि त्यांच्याशी चांगले वागण्याची इच्छा असणे.
  • समानता (Equality): प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागवणे आणि कोणताही भेदभाव न करणे.
  • न्याय (Justice): योग्य आणि न्यायपूर्ण वागणूक देणे.
  • प्रेम (Love): নিঃस्वार्थपणे इतरांवर प्रेम करणे आणि त्यांची काळजी घेणे.
  • समर्पण (Dedication): इतरांसाठी त्याग करण्याची तयारी असणे.

उदाहरण:

एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करणे, अडचणीत असलेल्या मित्राला आधार देणे, किंवा पर्यावरणाचे रक्षण करणे हे माणूसकीचे उदाहरण आहे.

टीप: माणूसकी ही एक विस्तृत संकल्पना आहे आणि या मूल्यांचा जीवनात उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 280

Related Questions

माणसाच्या मनात अति विचार का येतात?
मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता वाढवण्यासाठी काय केले पाहिजे?
जुने दिवस मला परत मिळतील काय? मी बर्‍याच गोष्टी गमावून बसलो आहे का? माझ्या हाती काहीच नाही? ज्या वयात मला यश आले पाहिजे होते ते आले नाही? अजूनही मी दुसर्‍यावर अवलंबून आहे असं मला वाटतं? मला चांगल्या दुनियेत जायचं आहे?
माझे वय 16 आहे. मला काही जास्त काम केले की डोक्याला मुंग्या येतात, चालताना तोल जातो, काही काम करायचं मन होत नाही आणि तोंडाची चव कडू झाली आहे, यावर काय करावे?
मनाला सदा घडावी अशी कोणती गोष्ट आहे?
लहान मुलांशी मोठी माणसे बोबडी का बोलतात?
स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवणे म्हणजे काय?