Topic icon

माणुसकी

2
  
हरवत चालली माणुसकी..!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.



सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने "मन" आणि "बुध्दी" बहाल केलीय... बुद्धीच्या जोरावर त्याने आज दाही दिशा आक्रंदण्यास सुरुवात केलीय. बुद्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत, पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय... आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय...
       
खरंतर, आपले प्रियजन, शेजारी पाजारी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी मिळून मिसळून वागून आनंद लुटावा, सर्वांना आनंदाची खिरापत वाटून त्यांच्या सहवासात राहण्याचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात किती मोठे स्वर्गसुख दडले आहे. हेच माणूस विसरलाय... किंबहुना विसरत चाललाय. 


   
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, नोकर चाकर यांसारख्या भौतिक सुखांमागे धावताना तो दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेटच्या कृत्रिम जगात जगण्यातच स्वतःला धन्य मानू लागलाय, तिथल्या कोलाहलात, मल्टीप्लेक्स, पार्टीहबमध्ये रमू लागलाय त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्याचे एकरूप होण्याचे प्रमाण संपुष्टात येऊ पाहत आहे. समाजात वावरताना परस्परांशी असलेले संबंध, डावावर लागताना दिसत आहेत, इतकेच काय पण मानवाला खुणावणारे निसर्ग सौंदर्यही या आधुनिक युगातील मानवापुढे आता हार मानू लागले आहे.


    
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी, एकाच आईच्या उदरी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा वैर भावनेने एकमेकांशी वागू लागली आहेत. हे आज समाजाचे वास्तव आहे. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आता तो विसरत चाललाय, एकमेकांप्रति असलेल्या सद्भावनेमुळे सतत प्रकृतीचे, सृष्टीचे, निसर्गाचे, मानवी जीवनाचे सिंचन, पोषण होत असते. पण माणूस शिकून किती मोठा झाला, पण त्याचे आद्यकर्तव्यच तो विसरला याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येऊ लागलाय, त्यामुळे सुख, शांती, समाधान, समृद्धी, संपन्नता आनंद, दया, प्रेम या सर्व गोष्टी लोप पावत चालल्यात."एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी" अशी गत झालीय माणसाची माणसाशी वागण्याची, यावरून मला सुचलेल्या काही काव्यपंक्ती...

हरवत चालली माणुसकी..!

माणूस पेराल! उगवेल माणुसकी
ही म्हण आता खोटी होत चाललीय
मूल्यहीन समाजात माणुसकी ही
आता औषधाला पण नाही उरलीय...

खून,दरोडे,भांडणे,चोऱ्यामाऱ्या
साऱ्यांचा वाढत चाललाय कहर
बेकारी, महागाई,बेरोजगारीचा
समाजजीवनावर होतोय असर...


अमानुषपणे वागलास निसर्गाशी
प्राणवायू अभावी गुदमरला श्वास
स्वार्थासाठी वृक्षांची केली कत्तल
कोरोनाने आवळला गळ्यास फास...

दुष्काळी,अवकाळी,चक्रीवादळाने       
झालीय पिकांची अतोनात हानी
तरी येत नाही सरकारला जाग
बळीराजाच्या मात्र डोळ्यांत पाणी

भ्रष्टाचाराने पोखरलेय समाजास
आता हरवत चालली माणुसकी
एकमेकांबद्दल,माया,प्रेम,जिव्हाळा
राहिली नाही माणसास आपुलकी...


उत्तर लिहिले · 7/1/2024
कर्म · 48555
1
माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागणे हे माणुसकी असण्याचे मुख्य लक्षण आहे असे मला वाटते,

माणूस माणसाला जेव्हा म्हणतो

दादा, वहिनी , भाऊ,ताई, काका काकी

अजून ही नाती आहेत बाकी

मी त्यांचा ती माझी सदैव आठवण मनात राखी

अशा माणसास म्हणावे आहे माणुसकी.
उत्तर लिहिले · 24/4/2022
कर्म · 1850
3
माणुसकी दाखवणारे त्रास सोसत नाहीत माणुसकी करणारे त्रास सोसताना आढळतात, ज्यांना कुणी विचारत नाही. दाखवणारेच अधिक चमकत असतात.

• माझं मत आहे की नियती प्रत्येक पावलावर प्रत्येक माणसाची परिक्षा घेत असते. चांगल्या आणि वाईट सर्व दिवसांत. ते तिचं कामच आहे. परिक्षा फक्त संत संज्जनांची घेतली जाते सामान्यांची नव्हे हा आपला गोड गैरसमज आहे. पृथ्वी वर जन्माला आल्या पासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला परिक्षा द्यावी लागते. ज्याचा रिझल्ट आपण परमेश्वर जवळ पोहोचल्या नंतर आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच इथे माणूस सहज पापं करतो आणि पचवतो.

• माणुसकी दाखवण्याचं नाटक करणारे इथे ९९ %आणि खरी मदत करणारे १ % भेटतील हे कलीयुगाचं वास्तव आहे. खरी माणुसकी करणाऱ्या व्यक्तीला नेहमी वास्तव जवळुन पहायला मिळतं जे हादरवणारं आहे. इथे सभ्यतेचा आव आणणारे, शोषण करणारे, दुसऱ्यांचा गैरफायदा घेणारे, टॉर्चर करणारे, अपमान करणारे, श्रीमंतीचा फायदा घेणारे, अशा लबाडांच्या अनेक प्रजाती आहेत. पण खरी मदत करणाऱ्याला हा भेदभाव कळत नाही. तो निरपेक्ष मदत करायला जातो आणि पाय मागे खेचणारे, अपमान करणारे, मनस्ताप देणारे अधिक भेटतात. ज्यात ती व्यक्ती, त्यांचं कुटुंब, मुलंबाळं भरडली जातात.

• हा प्रश्न मलाही पडतो, परमेश्वरा तु खरंच अस्तित्वात आहेस का ? की पुराणातच हरवलास ? की मी तुझ्यावरआंधळा विश्वास ठेवते आहे ? आज उघड उघड इतके गुन्हे चालले आहेत. बायका मुलीबाळी लहान मुलं धोक्यात आहेत. तु कुठे आहेस ? हे सगळं कधी थांबणार ? तुझा न्याय कुठे आहे ? घरगुती हिंसाचार, सामाजिक हिंसाचार वाढत चालला आहे. असाच तुझ्या वरचा विश्वास उडाला तर प्रामाणिकपणे कुणीही वर्तन करणार नाही. तेव्हा ह्या त्रासाला ईलाज नाही हे सत्य स्विकारून होईल तितकी मदत आपण इतरांना द्यावी आणि पुढे चलावं हेच बरं.
उत्तर लिहिले · 4/12/2021
कर्म · 121725
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
10
एक चित्रपट येवून गेला *दाम करी काम *त्याच्या नंतर असतील शिते तर जमतील भुते या उक्ती प्रमाणे  जगाला हेच पाहीजे असते पैसेवाला कितीही अशिक्षित ,अज्ञान क्रुर ,गुंड असला तरी त्याचे सगळे गुन्हे माफ असतात कारण त्याच्या कडे पैसा आसतो अगदी चरीत्रहिन असला तरी कारण लोक समाज पैशाला किंमत देतो या उलट गरीबाला काहीच किंमत मिळत नाही श्रीमंत लोक गरीबाला वापरुन घेतात लोक पैशाचे पुजारी आहेत गरीबहूशार असला तरी लोक त्याला व्यासपीठावर बसवत नाही श्रीमंताला बसविले जाते कारण घडे सर्व काही या पैशाच्या पायी ..एक गाजलेले गाणे होते ...धन्यवाद
उत्तर लिहिले · 27/10/2020
कर्म · 10515
1
नमस्कार ,
जर तो समाज मंदिर असेल तर तुम्ही हक्काने तिथे जाऊ शकता तसेच येवढ माहिती करुन घ्या कि तो समाज मंदिर त्या लोकांनी बांधला आहे कि कोणत्या सामजिक पक्षाने येवढ माहीती करुन घ्या. जर तो मंदिर सरकारी खर्चातुन बांधला असेल तर तो समाज मंदिर सर्वच समजासाठी बांधला असेल.
कारण त्या मंदिरा पुढे समाज असा उल्लेख आहे सर्वच समाजाचे लोक तिथे जाउ शकतात.

आणि महत्वाचं म्हणजे बौध्द धर्माच मंदिर आहे . बौध्द धर्मात अस कुठे लिहीलेल नाहि कि बौद्ध धर्माच्या मंदिरात इतर लोकांनी प्रवेश करू नये. गौतम बुध्दानी तर समाजार एकत्र येण्याचा असा वैभवशाली संदेश दिला.
तसेच भारती संविधानाचे जनक डाॅ. बाबासाहेब अंबेडकर यानी सुध्दा समाजाला एकत्र येण्या/जगण्यासाठी व सर्वांना योग्य न्याय मिळण्यासाठी संविधान लिहलं आहे.
उत्तर लिहिले · 21/10/2019
कर्म · 590