1 उत्तर
1
answers
माणुसकी दाखवणाऱ्या लोकांना नेहमी त्रास का होतो?
3
Answer link
माणुसकी दाखवणारे त्रास सोसत नाहीत माणुसकी करणारे त्रास सोसताना आढळतात, ज्यांना कुणी विचारत नाही. दाखवणारेच अधिक चमकत असतात.
• माझं मत आहे की नियती प्रत्येक पावलावर प्रत्येक माणसाची परिक्षा घेत असते. चांगल्या आणि वाईट सर्व दिवसांत. ते तिचं कामच आहे. परिक्षा फक्त संत संज्जनांची घेतली जाते सामान्यांची नव्हे हा आपला गोड गैरसमज आहे. पृथ्वी वर जन्माला आल्या पासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाला परिक्षा द्यावी लागते. ज्याचा रिझल्ट आपण परमेश्वर जवळ पोहोचल्या नंतर आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच इथे माणूस सहज पापं करतो आणि पचवतो.
• माणुसकी दाखवण्याचं नाटक करणारे इथे ९९ %आणि खरी मदत करणारे १ % भेटतील हे कलीयुगाचं वास्तव आहे. खरी माणुसकी करणाऱ्या व्यक्तीला नेहमी वास्तव जवळुन पहायला मिळतं जे हादरवणारं आहे. इथे सभ्यतेचा आव आणणारे, शोषण करणारे, दुसऱ्यांचा गैरफायदा घेणारे, टॉर्चर करणारे, अपमान करणारे, श्रीमंतीचा फायदा घेणारे, अशा लबाडांच्या अनेक प्रजाती आहेत. पण खरी मदत करणाऱ्याला हा भेदभाव कळत नाही. तो निरपेक्ष मदत करायला जातो आणि पाय मागे खेचणारे, अपमान करणारे, मनस्ताप देणारे अधिक भेटतात. ज्यात ती व्यक्ती, त्यांचं कुटुंब, मुलंबाळं भरडली जातात.
• हा प्रश्न मलाही पडतो, परमेश्वरा तु खरंच अस्तित्वात आहेस का ? की पुराणातच हरवलास ? की मी तुझ्यावरआंधळा विश्वास ठेवते आहे ? आज उघड उघड इतके गुन्हे चालले आहेत. बायका मुलीबाळी लहान मुलं धोक्यात आहेत. तु कुठे आहेस ? हे सगळं कधी थांबणार ? तुझा न्याय कुठे आहे ? घरगुती हिंसाचार, सामाजिक हिंसाचार वाढत चालला आहे. असाच तुझ्या वरचा विश्वास उडाला तर प्रामाणिकपणे कुणीही वर्तन करणार नाही. तेव्हा ह्या त्रासाला ईलाज नाही हे सत्य स्विकारून होईल तितकी मदत आपण इतरांना द्यावी आणि पुढे चलावं हेच बरं.