आयुष्य
सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी ऐकटी पडतात हे खरंय का?
2 उत्तरे
2
answers
सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी ऐकटी पडतात हे खरंय का?
3
Answer link
सर्वांचं मन जपणारी माणसंच आयुष्यात शेवटी ऐकटी पडतात हे खरंय का
हो हे बर्याचदा खर देखील आहे. परंतु कधी कधी हे उलटे सुध्दा होऊ शकते. परंतु फार कमी प्रमाणात कारण नाते निभवायचे त्याला सभांळून घ्याचे असेल तर आपल्या मनाला दुख होणार हे ही तितकेच खरे आहे. कारण दर वेळी तुम्ही समोरच्याच्या मन जपायला जाता परंतु त्याला त्याचे काही घेणे देणे नसते खूपदा लाखात एखाद्याच तुमच्या या कृतीचे महत्त्व समजेल आणि त्याप्रमाणे तुमच्याशी वागेल. कारण "जया अंगी मोठे पण त्याला यातना कठीण" अस तर म्हटलेच आहे. म्हणून तर ती एकटी पडता अस का तर ते स्वतःला दुसऱ्यासाठी पूर्णपणे हरवून देतात त्याची काळजी करतात आणि स्वतःला विसरून जातात म्हणून ती एकटी पडतात त्यांनी जर आधी स्वतः कडे लक्ष दिले. स्वतः सक्षम आहेत मनाने मतबूत असतील आणि सर्वाची मने जपत असतील आणि तरीही समोरच्याला त्याची किंमत नसेल तर यांना एकटे पडल्यासारखे वाटणार नाही. कारण ते मनाने मजबूत आहेत. कारण आता त्याच मन त्यांना सोबत करत असेल वर वर पहाता ते एकटे पडले आहेत असे वाटेल ही परंतु आतुन ते स्थिर असतील कारण त्यांनी समोरच्याला हवी तेव्हा मदत केली आहे. त्याला वेळ दिला आहे त्याच्या मनाची जपणूक केली आहे. म्हणून तुम्ही एकटे वाटून घेऊ नये तुम्ही किती चांगले काम केले आहे. जो समोरचा कधीही करू शकणार नाही. तुम्ही समोरच्या पेक्षा काहीतरी वेगळे केले आहे म्हणूनच तुम्ही एकटे आणि वेगळे आहात. म्हणून काही अंशी हे फायद्याचे ही आहे तुम्हाला तुमची पेस मिळते तुम्हाला तुमच्या साठी काय कराचे याचा शोध घेता तुम्ही आयुष्य भर ज्या माणसाठी वेळ दिला त्यांना काय हव नको ते बघितले आणि आज तीच माणसे आपल्या सोबत नाहीत. हे लक्षात येते. आणि ते बरे देखील आहे. त्यामुळे आपण आपल्या ऐकटेपणातुन खूप काही शिकू लागतो. दिसताना दिसते आपण एकटे पडलो आहोत परंतु खरे एकटे ति माणस पडलेली असतात कारण आपल्यासारखी एक प्रेमळ व्यक्ती वा सोबती त्याच्या बरोबर आता नाही. शेवटी एकटे पडतो म्हणजे निदान तेव्हा तरी आपण आपल्या सोबत वेळे घालतो कारण ही दुनिया खोटी आहे फसवी आहे हे लक्षात येते म्हणून एकटे असतो. परंतु कणखर देखील असतो. समोरच्याचे मन जरूरी जपावे परंतु सारखे तुम्हालाच झुकावे लागत असेल तर थांबा आणि विचार करा थोडा आणि फार शेवटी एकटे पडण्या पेक्षा आधी एकटे व्हा किंवा बाजूला व्हा तसेही एकटेच पडणार आहोत हे माहिती ही असते मग वेळीच ऐकटे व्हा. जे होते ते चांगल्या साठी ऐवढे लक्षात ठेवा सारा खेळ नियतीचा असतो त्या चक्राचा असतो ते कधी तरी वर खाली होणार म्हणून निराश होऊ नका.
तर कधी कधी याचा फायदा ही होतो ना तुम्ही समोरच्याला सांभाळून घेतले त्याची काळजी घेतली तरी कोणीना कोणी तुमची ही काळजी घेतो कारण हा निसर्गाचा नियमच आहे. प्रकृती तुम्हाला द्यायलाच बसली आहे. तुम्ही जे द्याल ते ती तुम्हाला परत करणारच. तुम्ही चांगले दिले तर चांगलेच मिळणार कारण ही तर देवाण घेवाण आहे. या मध्ये जास्त करून स्त्रिया अडकतात किंवा आई या मुलांसाठी खूप काही करतात नाही नंतर एकट्या पडतात कारण त्यांना वाटते मुले सभांळतील लक्ष देतील परंतु तस काही होत नाही. या सगळ्यात स्वतः कडे दुर्लक्ष करता आणि जास्तच एकट्या पडतात. म्हणून जेव्हा केव्हा माणूस स्वतःला विहरून हे सगळ करतो तेव्हा तो जास्त ऐकटा पडतो. कारण नाण्याच्या दोन बाजू असतात कधी चांगले कधी कमी वाईट त्या प्रमाणे हे सारे आहे कधी छापा तर कधी काटा असणार. आता हे काटे हसत झेल्याचे की, रडत ते आपण ठरवायचे. शेवटी आयुष्य आपले आहे त्याची जबाबदारी ही आपली आहे. आपल्याला इतराची मन जपण्याची सवय आहे तर आहे. ते काम न गुतंता करायचे त्याचा परिणामचा विचार नाही करायचा त्या क्षणी जे वाटले ते तुम्ही केले. नंतर समोरचा काय वागेल त्याचा विचार करुन एकाकी वाटून घेऊ नका ते करता त्यावेळी चांगले वाटले तोच आपला आनंद आणि जीवन या अनुषंगाने पुढे जात रहायचे. पडतो शेवटी एकटे तर पडतो त्याचा न दुखी होता स्विकार करायचा. म्हणूनच मन आधी मजबूत करायचे आणि आधी स्वतः ची आणि मनाची जपणूक करायची वा दुसऱ्याची मन जपायची तुमच्या कडे जास्त असेल तरच तुम्ही समोरच्याला देऊ शकाल. आणि ही दुनिया आहे तुमच्या जवळ कामापुरतीच येणार, मतलबासाठी येणार तीचे काम झाले की बाजूला होणार तुम्हाला एकटे पाडणार. म्हणून तुम्ही सावध रहावून वागा हवे तेवढेच गुंता जास्त गुरफटून जाऊ नका. म्हणून हे जरी खरे असले त्यातून आपण आपला आनंद शोधू शकतो. कारण ते म्हणजे जीवनाचा शेवट नाही यातून काय चांगले करता येईल. असा विचार करायचा आणि जे कोणी आपली माणस अशी वागली असतील त्याच्या प्रमाणे आपण वागायचे नाही. म्हणजे आपल्या कृती मुळे कोणी एकटे पडणार नाही. हे कळेल जे कोणी अस वागले असतील त्याच्या मुळे मी कसे वागायचे नाही है शिकलो ना आपण तर आपण यात बदल करायचा. आणि सुरवात आपल्यापासून झाली तर याचे प्रमाण कमी होईल. आणि सर्वच एकामेकांचा आदर करतील त्यांना समजून घेतील. आणि आयुष्य सुखकर करतील. आणि इतराला जपल्यामुळे कधी ना कधी आपल्याला ही कोणीतरी जपत हे ही आहे. तुमच्या अतंरमनाची ताकद तुम्ही वाढवा तुमच्या विचार करण्याची शक्ती वाढवा आणि कोणाला किती महत्त्व द्याचे ते ठरवा. आणि तुमच्या मनाची शक्ती वाढवा म्हणजे या प्रसंगाला तुम्ही बळी पडणार नाही. आणि जरी पडले तरी याचा त्रास होणार नाही.
कारण हे जग एक मृगजळ आहे ज्याला आपण खरे मानतो आणि शेवटी एकटे समजतो. हे अस होणार यांची तयारी ठेवायची आणि आपण आपले चांगले काम करून बाजूला व्हायचे. आणि जास्तीत जास्त वेळ स्वतःचा अभ्यास करण्यात द्यायाचा स्वतःच्या मनाला मजबूत करण्यासाठी द्याचा. अस मला वाटते. तुमचे ही काही वेगळे वाटू शकते कारण प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत त्या सगळ्याचा विचार करुन हा सार समोर मांडत आहे. कारण दरवेळी अस होईलच अस नाही यातून चांगले देखील होऊ शकते यांने अजून चांगले समजूतदारीचे जीवन लाभो शकते. कधी आबंट तर कधी गोड याप्रमाणे आहे ते. आणि किती ही कोणासाठी केले तरी ते कमीच ठरते तो खुश होणारच नाही म्हणून स्वतःला हरवून स्वतः कडे लक्ष न देता हे सगळे करण्याची काही गरज नाही. आणि आपण आलो एकटे जाणार ही एकटे तर खंत कसली मग. हे एकटे पण आनंदाने स्विकारु किंवा आपल्याला हव्या त्या गोष्टींचा आनंद घेऊ निसर्गात रमू आणि झाले गेले विसरून पुढे जात रहावू.