1 उत्तर
1
answers
माणुसकी हरवत चाललेला समाज मराठी भाषण?
2
Answer link
हरवत चालली माणुसकी..!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.
सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने "मन" आणि "बुध्दी" बहाल केलीय... बुद्धीच्या जोरावर त्याने आज दाही दिशा आक्रंदण्यास सुरुवात केलीय. बुद्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत, पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय... आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय...
खरंतर, आपले प्रियजन, शेजारी पाजारी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी मिळून मिसळून वागून आनंद लुटावा, सर्वांना आनंदाची खिरापत वाटून त्यांच्या सहवासात राहण्याचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात किती मोठे स्वर्गसुख दडले आहे. हेच माणूस विसरलाय... किंबहुना विसरत चाललाय.
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, नोकर चाकर यांसारख्या भौतिक सुखांमागे धावताना तो दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेटच्या कृत्रिम जगात जगण्यातच स्वतःला धन्य मानू लागलाय, तिथल्या कोलाहलात, मल्टीप्लेक्स, पार्टीहबमध्ये रमू लागलाय त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्याचे एकरूप होण्याचे प्रमाण संपुष्टात येऊ पाहत आहे. समाजात वावरताना परस्परांशी असलेले संबंध, डावावर लागताना दिसत आहेत, इतकेच काय पण मानवाला खुणावणारे निसर्ग सौंदर्यही या आधुनिक युगातील मानवापुढे आता हार मानू लागले आहे.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी, एकाच आईच्या उदरी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा वैर भावनेने एकमेकांशी वागू लागली आहेत. हे आज समाजाचे वास्तव आहे. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आता तो विसरत चाललाय, एकमेकांप्रति असलेल्या सद्भावनेमुळे सतत प्रकृतीचे, सृष्टीचे, निसर्गाचे, मानवी जीवनाचे सिंचन, पोषण होत असते. पण माणूस शिकून किती मोठा झाला, पण त्याचे आद्यकर्तव्यच तो विसरला याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येऊ लागलाय, त्यामुळे सुख, शांती, समाधान, समृद्धी, संपन्नता आनंद, दया, प्रेम या सर्व गोष्टी लोप पावत चालल्यात."एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी" अशी गत झालीय माणसाची माणसाशी वागण्याची, यावरून मला सुचलेल्या काही काव्यपंक्ती...
हरवत चालली माणुसकी..!
माणूस पेराल! उगवेल माणुसकी
ही म्हण आता खोटी होत चाललीय
मूल्यहीन समाजात माणुसकी ही
आता औषधाला पण नाही उरलीय...
खून,दरोडे,भांडणे,चोऱ्यामाऱ्या
साऱ्यांचा वाढत चाललाय कहर
बेकारी, महागाई,बेरोजगारीचा
समाजजीवनावर होतोय असर...
अमानुषपणे वागलास निसर्गाशी
प्राणवायू अभावी गुदमरला श्वास
स्वार्थासाठी वृक्षांची केली कत्तल
कोरोनाने आवळला गळ्यास फास...
दुष्काळी,अवकाळी,चक्रीवादळाने
झालीय पिकांची अतोनात हानी
तरी येत नाही सरकारला जाग
बळीराजाच्या मात्र डोळ्यांत पाणी
भ्रष्टाचाराने पोखरलेय समाजास
आता हरवत चालली माणुसकी
एकमेकांबद्दल,माया,प्रेम,जिव्हाळा
राहिली नाही माणसास आपुलकी...