भाषण

15 ऑगस्ट भाषण?

1 उत्तर
1 answers

15 ऑगस्ट भाषण?

1
.


सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.

आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.

15 ऑगस्ट 1947 ... होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.

याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

टिळक यांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.

त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले.भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास मारण्याचा बेत केला.

परंतु नजरचुकीने दुसऱ्याचा अधिकाऱ्याची हत्या केली, अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली.

त्यानंतर काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला.

आठ ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले . आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय ना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले.यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील प्रमुख नेत्यांना अटक झाली.

परंतु प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेने स्वतः चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आले या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला ने मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या जोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947च्या स्वातंत्र्यप्राप्ती ने झाला. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही रम्य पहाट उगवली आणि दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत च्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतातील तिरंगा फडकवण्यात आला.

अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 76 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.

आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.

परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.

आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.

  
उत्तर लिहिले · 8/8/2023
कर्म · 48465

Related Questions

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त भाषण?
जीवन सुंदर आहे मराठी भाषण?
माणुसकी हरवत चाललेला समाज मराठी भाषण?
गावाच्या सर्वांगीण विकास आराखडा या विषयावर ग्रामसभेत भाषण करण्याकरिता शासनाची संहिता लिहा?
तुमच्या गावात झालेल्या अंतर जातीय विवाह हिताच्या मेळाव्या समाज सुधारकांच्या भूमिकेतून खालील मुद्द्यांच्या आधारे भाषणाच्या मसुदा तयार करा एक मेळावा आयोजन करणारी संस्था किंवा आयोग दोन उद्देश तीन सहभागाचे प्रमाण चार वेळा मेळाव्यात चर्चेलेले सर्जरी गेलेले प्रश्न व ठराव लेखन मध्ये आता 25 ते 30 ओळी?
शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहा भाषण दे नारा?
मराठीमध्ये भाषणासाठी छान मुद्दे कोणते?