Topic icon

भाषण

0
सावित्रीबाई फुले चे वडील कोण होते
उत्तर लिहिले · 8/1/2024
कर्म · 25
3
जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे ,जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे
जीवनात बरेच कही करण्यासारखे आहे , करता करता बरेच काही शिकण्या सारखे आहे

जीवनात बरच काही देण्यासारखे आहे , देता देता बरेच काही घेण्यासारखे आहे
जीवनात बरेच काही फुलवता येते , इथे बरेच काही चांगले पेरन्या सारखे आहे

जीवन मोहक फुलासारखे असते , पवित्र प्रेमाने मन मोहवणारे असते
जरी सुकले तरी ते , आठवनिंच्या पुस्तकात जपण्यासाठी असते

जीवन ही एक शाळा आहे , मन होई फळा इथे
आयुष्यातील क्लिष्ट प्रमेय सोडवता येतात तिथे

आयुष्य हे जिवंत अध्यात्म , याच्या तत्वासमोर वेदही थिटे
मौनात अनुभवता दोन क्षण , इथे ईश्वर ही भेटे

जीवन हे सुंदर आहे , नसतात इथे फक्त दुःखाचे क्षण ,
डोळसपणे पाहता बाजूला , सुखाचे गवसती अनेक क्षण

जीवन खरेच सुंदर आहे , पाहण्या एक नजर हवी
निसटनारे गोड क्षण टिपन्यास, ती तिथे हजर हवी

************************************


"हे जीवन सुंदर आहे." असं एक गीत ऐकायला मिळालं, खरंच जीवनाइतकं तऱ्हेतर्‍हेचं रंगीबेरंगी, मनाला मोहवून टाकणारं आणि सतत हवहवसं वाटणारं दुसरं तिसरं असं काहीच सापडत नाही. उबदार आणि ऐटदार असं फिलींग देणारी केवळ वस्त्रंच असतात असं नाही. तर जीवनात ऐटदार आणि उबदार बोलणारी आणि मनापासून तसं वागणारी माणसं ही असतात. ती आनंद, उत्साह आणि सुरक्षितता देऊन जातात. जणू दैनंदिन वातावरणात अशी माणसं उत्तेजक पेयच देतात. मी बागेत किंवा मैदानात फिरायला जातो, तेंव्हा वय विसरून वयस्कर मंडळी एकमेकांची थट्टा मस्करी करताना, विनोद करतांना, खळाळून हसतांना दिसतात, तेव्हा मला मनस्वी आनंद होतो आणि या वयस्कर मंडळींविषयी अनाहूत अभिमान ही वाटायला लागतो; अशी हसत खेळत, एकमेकांविषयी आदर ठेवून थट्टा मस्करी करणारी वयस्कर मंडळी प्रत्येक गल्ली बोळात दिसायला हवीत, त्यामुळे कीती बहार येईल नै का? जीवन किती बहारदार होईल? वाढत्या वयाबरोबर असणार्‍या आरोग्याच्या समस्या आणि व्याधी कुठल्या कुठे पळून जातील नै का?



तसं पहायला गेलं तर, कुणीतरी आपल्या पाठीवर थाप मारली, किंवा शाबासकी दिली तर आपली अंतर्गत उर्जा दुप्पट होते, आणखी दुप्पट उत्साहाने आपण कामाला लागतो, यश आपल्या नजरेच्या टप्प्यात आले आहे, असं आपल्याला वाटू लागतं, "पाठीवरती हात ठेवूनी फक्त लढ म्हणा" या कुसुमाग्रज यांच्या कवितेनंही हेच सांगितलं आहे. केवळ पाठीवर किंवा अंगावर पडलेल्या हाताचा आणि प्रेमळ स्पर्शाचा तो चमत्कार असतो, एवढं कशाला लहान मुलांच्या पाठीवर थोपटलं की कीतीही खट्याळ मुलं असो ते क्षणार्धात झोपी जातं, ‘दृष्ट काढणे’, ‘मीठ मोहरी उतरवून टाकणे’ या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी अंधश्रध्देला खतपाणी घातल असल्याचे वरकरणी वाटत असले तरी, त्यातील भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा महत्वाचा मानायलाच हवा. कारण अशा घरगुती उपायाने अनेकांना बरे वाटायला लागण्याची किमान सुरूवात तरी होते, अर्थात गेल्या हजारो वर्षापासून घरगूती परंपरा टिकून आहेत, यातच त्या त्या गोष्टींची ताकद आपल्या लक्षात यायला हवी, कारण एखाद्या गोष्टीपासून कुणालाच व कुठलाच फायदा नसेल तर ती गोष्ट कालबाह्य होते व पुढे तीचे अस्तित्वही संपुष्टात येते, पण या गोष्टी आजच्या संगणक युगातही टिकून आहेत. 

माणूस हा भावनाप्रधान प्राणी आहे, तो समाजशील असून समुहाने रहायला त्याला आवडते, आपल्या आवडीची माणसे बरोबर आहेत म्हंटल्यावर त्याच्यात ताकद निर्माण होते, त्याच्या अंगात बळ येते, पाठीवर हात पडला की तो उत्तेजित होतो, त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा आत्मविश्वास व आनंद विलसतो, अवतीभवती असलेल्या माणसांची व संवादांची परस्पर क्रिया घडून, एक वेगळीच अद्भूत क्षमता त्यांच्यात उत्पन्न होते. परस्पर भावनीक निखळ नाते मनातील अनेक निगरगाठी सोडवतात.

दुसऱ्यानं आपल्याला चांगलं म्हणावं, आपल्या कार्याचं कौतुक करावं असं यच्ययावत सर्वच मनुष्य प्राण्याला मनापासून वाटत असतं. अहो, एवढं कशाला ईश्वराला देखील त्याचं कौतुक आवडतं. सर्व धार्मिक साहित्यामधून ईश्वराचं कौतुकच केलेले असते, असे कोडकौतुक जर ईश्वराला आवडत असेल तर जित्याजागत्या माणसाला आपले कौतुक ऐकायला आवडणे हे नैसर्गिकच नाही का? असो.

असं प्रेमळ, उल्हासी आणि आपल्याला कोणीतरी मनापासून जपत आहे,आपली काळजी घेत आहे, ही भावनाच तुमचं वय वाढवायला कारणीभूत होत असते. यापुढे जावून एका प्रार्थनेत असे म्हंटले आहे की, “प्राणशक्ती माझ्या ठिकाणी सदैव जागृत व कायमपणे स्पंदमान असो... मला उल्हासित करणारी तसेच स्फुरणारी असो... अगदी प्राणार्पण करून कार्य करण्याची मला उमेद दे!” अशी प्रखर इच्छाशक्ती लाभल्यावर म्हातारपण आपल्या वाऱ्यालाही थांबणार नाही, कारण प्राणपणाने एवढी गोष्ट करण्याची जिद्द निर्माण झाली की, ती जिद्द आणि तो उत्साह वृध्दत्वाला आसपास फिरकू ही देत नाही.

जरा आजूबाजूला सूक्ष्मपणाने, जागरूकपणाने आणि जिज्ञासू वृत्तीने पाहिले की, अनेक अशी वयस्कर मंडळी आपल्याला दिसून येतात, त्यांनी आपल्या जवळही वृध्दत्व फिरकू दिलेले नाही; हे प्रत्कर्षाने अनुभवास येते, आणि अशी माणसं आपल्या अवतीभवती असली की, “हे जीवन सुंदर आहे!” याचा हरघडी प्रत्यय होतो. आभाळाएवढ्या दु:खाला कवटाळून न बसता, त्याला थोडे बाजूला ठेवून जवाएवढ्या सुखाला डोक्यावर घेणारी अशी माणसं नक्कीच समाजात आनंदाची, सौख्याची, उत्साहाची आणि उल्हासाची कारंजी फुलवत असतात; त्यांच्या संपर्कात राहीलं की, नक्कीच वाटू लागतं, “हे जीवन सुंदर आहे!”

उत्तर लिहिले · 6/1/2024
कर्म · 51830
3
  
हरवत चालली माणुसकी..!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.



सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हा अतिशय वेगळा असा बुद्धिवान प्राणी आहे, असे म्हटले जाते. याच माणसाला निसर्गाने "मन" आणि "बुध्दी" बहाल केलीय... बुद्धीच्या जोरावर त्याने आज दाही दिशा आक्रंदण्यास सुरुवात केलीय. बुद्धी कल्पकतेच्या जोरावर आज मानवाने अंतराळात भरारी घेऊन अवकाशालाही गवसणी घातलीय, इतके त्याचे कर्तृत्व मोठे आहे. त्याच्या या कर्तृत्वापुढे त्याला गगन ही ठेंगणे वाटू लागलेय, इतक्या त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या सीमा अथांग पसरल्या आहेत, पण आधुनिकतेचे वारे लागलेला हाच माणूस मात्र त्याचे, आपल्या माणसांशी असलेलं नातं, आणि मातीशी असलेली नाळ मात्र विसरत चाललाय... आणि माणुसकी काळाच्या ओघात लोप पावत चाललीय...
       
खरंतर, आपले प्रियजन, शेजारी पाजारी, सगेसोयरे, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याशी मिळून मिसळून वागून आनंद लुटावा, सर्वांना आनंदाची खिरापत वाटून त्यांच्या सहवासात राहण्याचे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होण्यात किती मोठे स्वर्गसुख दडले आहे. हेच माणूस विसरलाय... किंबहुना विसरत चाललाय. 


   
पैसा, संपत्ती, गाडी, बंगला, नोकर चाकर यांसारख्या भौतिक सुखांमागे धावताना तो दिसत आहे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेटच्या कृत्रिम जगात जगण्यातच स्वतःला धन्य मानू लागलाय, तिथल्या कोलाहलात, मल्टीप्लेक्स, पार्टीहबमध्ये रमू लागलाय त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्याचे एकरूप होण्याचे प्रमाण संपुष्टात येऊ पाहत आहे. समाजात वावरताना परस्परांशी असलेले संबंध, डावावर लागताना दिसत आहेत, इतकेच काय पण मानवाला खुणावणारे निसर्ग सौंदर्यही या आधुनिक युगातील मानवापुढे आता हार मानू लागले आहे.


    
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात काही कारणांमुळे कित्येकदा मनामध्ये तेढ निर्माण होऊन, एकमेकांविषयी, गैरसमजुती, निर्माण होत जातात आणि परस्पर संबंधांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी, एकाच आईच्या उदरी जन्म घेतलेली लेकरे सुद्धा वैर भावनेने एकमेकांशी वागू लागली आहेत. हे आज समाजाचे वास्तव आहे. एकमेकांप्रति प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, ही सुखी जीवनाची त्रिसूत्री आता तो विसरत चाललाय, एकमेकांप्रति असलेल्या सद्भावनेमुळे सतत प्रकृतीचे, सृष्टीचे, निसर्गाचे, मानवी जीवनाचे सिंचन, पोषण होत असते. पण माणूस शिकून किती मोठा झाला, पण त्याचे आद्यकर्तव्यच तो विसरला याचा स्वाभाविक परिणाम त्याच्या वागण्या बोलण्यातून दिसून येऊ लागलाय, त्यामुळे सुख, शांती, समाधान, समृद्धी, संपन्नता आनंद, दया, प्रेम या सर्व गोष्टी लोप पावत चालल्यात."एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी" अशी गत झालीय माणसाची माणसाशी वागण्याची, यावरून मला सुचलेल्या काही काव्यपंक्ती...

हरवत चालली माणुसकी..!

माणूस पेराल! उगवेल माणुसकी
ही म्हण आता खोटी होत चाललीय
मूल्यहीन समाजात माणुसकी ही
आता औषधाला पण नाही उरलीय...

खून,दरोडे,भांडणे,चोऱ्यामाऱ्या
साऱ्यांचा वाढत चाललाय कहर
बेकारी, महागाई,बेरोजगारीचा
समाजजीवनावर होतोय असर...


अमानुषपणे वागलास निसर्गाशी
प्राणवायू अभावी गुदमरला श्वास
स्वार्थासाठी वृक्षांची केली कत्तल
कोरोनाने आवळला गळ्यास फास...

दुष्काळी,अवकाळी,चक्रीवादळाने       
झालीय पिकांची अतोनात हानी
तरी येत नाही सरकारला जाग
बळीराजाच्या मात्र डोळ्यांत पाणी

भ्रष्टाचाराने पोखरलेय समाजास
आता हरवत चालली माणुसकी
एकमेकांबद्दल,माया,प्रेम,जिव्हाळा
राहिली नाही माणसास आपुलकी...


उत्तर लिहिले · 7/1/2024
कर्म · 51830
0

गोपीनाथ मुंडे यांचे इंग्रजी भाषण उपलब्ध नाही. मला फक्त त्यांचे मराठीतील भाषणे आणि मुलाखती आढळल्या आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
0

आकाशवाणीसाठी मायबोली मराठी वर भाषण

नमस्कार श्रोतेहो!

आज ‘मायबोली मराठी’ या विषयावर मी काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. ‘मायबोली’ म्हणजे आपली मातृभाषा. मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे. मराठी भाषेला एक समृद्ध इतिहास आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, आणि शिवाजी महाराज यांसारख्या थोर व्यक्तींनी या भाषेतून आपले विचार व्यक्त केले.

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे. मराठी साहित्यात अनेक थोर लेखकांनी मोलाची भर घातली आहे. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, इंदिरा संत आणि अनेक लेखकांनी मराठी भाषेला समृद्ध केले आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण आपल्या मायबोलीला विसरता कामा नये. मराठी बोलताना कमीपणा वाटू नये. आपल्या मुलांना मराठीतून शिक्षण द्यावे. मराठी पुस्तके वाचावी, मराठी चित्रपट पाहावे. मराठी नाटकं बघावी.

मराठी भाषेचा योग्य आदर करणे, तिचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. चला तर मग, आजपासूनच मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प करूया.

धन्यवाद!

टीप: आपण ह्या भाषणात आपल्या आवडीनुसार बदल करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220
1
.


सन्माननीय व्यासपीठ आदरणीय वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा दिवस.

आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा आणि मानाचा दिवस आहे.अशा या क्रांतिकारी शुभदिनी प्रथम सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा.

15 ऑगस्ट 1947 ... होय, हाच तो दिवस ज्या दिवशी भारत भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती.

भारतीय जनता, थोरपुरुष, क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता , त्यामुळे समस्त भारतीयांकरिता हा अतिशय आनंददायी व अविस्मरणीय असाच दिवस आहे.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे दीडशे वर्षे होता. इंग्रजांच्या दिलेल्या असमानतेचा वागणुकीचा, भेदभाव आणि सक्तीचे नियम यांच्यामुळे अनेक शूर वीर स्वातंत्र्य दिन भारतीयांच्या मनामध्ये एकतेची भावना निर्माण भावना निर्माण होऊ लागली व देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे वाटू लागले.

याच कारणांमुळे देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक विविध ठिकाणी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढे देऊ लागले. यामध्ये मोलाचे कार्य लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग राजगुरू सुखदेव, चंद्रशेखर आजाद अशा कित्येक स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारकांनी त्यांच्यासोबत देशातील असंख्य अशा नागरिकांनी आपले प्राण पणाला लावले.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजांविरुद्ध कडक भूमिका घेत स्वदेशी बहिष्कार चळवळीचा पुरस्कार केला. आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

टिळक यांच्यां नंतर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी मिळवण्याचा सत्याग्रह करून स्वातंत्र्यलढा च्या नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, याप्रमाणे अनेक लढे व सत्याग्रह केले.

त्याचप्रमाणे भगतसिंग राजगुरू सुखदेव बटुकेश्वर दत्त यासारखे अनेक युवा क्रांतिकारकांनी सशस्त्र हल्ले घडवून आणले.भगतसिंग व राजगुरू लाठी हल्ल्याचा आदेश दिलेल्या जेम्स स्कॉट या पोलिस अधिकाऱ्यास मारण्याचा बेत केला.

परंतु नजरचुकीने दुसऱ्याचा अधिकाऱ्याची हत्या केली, अधिकाऱ्याच्या हत्येचा कट केल्यामुळे भगतसिंग राजगुरू सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना लाहोर येथे फाशी देण्यात आली.

त्यानंतर काकोरी कट, मीरत कट,चितगाव कट असे अनेक क्रांतिकारी लढे हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले. 1942 पासून चले जाव आंदोलन म्हणजे छोडो बांधव आंदोलन सुरू झाले. यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वांनी अधिक प्रखर प्रयत्न केला.

आठ ऑगस्ट रोजी गांधींजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे असे ठणकावून सांगितले . आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतीय ना तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा असे आव्हान केले.यामध्ये स्वातंत्र्य चळवळीमधील प्रमुख नेत्यांना अटक झाली.

परंतु प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने जनतेने स्वतः चलेजाव आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व देशभरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी अबाल वृद्ध व स्त्रिया रस्त्यावर आले या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील नेत्यांनी भूमिगत जनतेला ने मार्गदर्शन केले.

अशा प्रकारे 1942 पासून चाललेल्या जोडो भारत चळवळीचा गोड शेवट 1947च्या स्वातंत्र्यप्राप्ती ने झाला. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही रम्य पहाट उगवली आणि दीडशे वर्ष ब्रिटिशांच्या गुलामगिरीत च्या शृंखलेत जखडलेला भारत स्वतंत्र झाला.दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून तेथे भारतातील तिरंगा फडकवण्यात आला.

अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. आणि या वर्षी आज आपण 76 वा गणराज्य दिवस म्हणजे स्वातंत्र दिवस साजरा करीत आहोत.

आज भारत देश जगामध्ये महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत हा आपला देश सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.स्वातंत्र्यानंतर आपल्या आपल्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानात आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे.

परंतु असे असले तरी देशामध्ये अनेक समस्या आज आपल्याला दिसत आहे त्यामध्ये गरीबी, असमानता, भ्रष्टाचार,दंगली, स्रिया वरील होणारे अत्याचर आजही आपल्या देशामध्ये दिसून येत आहे.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशांमधील युवा हा सोशल मीडिया, मोबाइल च्या गुलामगिरीत अडकत चाललेला आहे. यावर उपाय म्हणजे एकच देशातील सर्व नागरिकांनी जागे होऊन, या सर्व समस्यांवर मात केला पाहिजे.

आपण भारत या देशाचे नागरिक या नात्याने आपल्या देशाला पुढे नेण्याचे व आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करून , ते व्यर्थ न जाऊ देता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

देशातील प्रत्येक नागरिक समान आहे असे मानून सर्व, आपापसातील वैर सोडून प्रत्येक भारतीय देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. व जगामध्ये देश महासत्ता म्हणून उदयास येईल.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत.

  
उत्तर लिहिले · 8/8/2023
कर्म · 51830
0

भाषणाचे स्वरूप आणि कार्ये सोदाहरण स्पष्ट करा:

भाषणाचे स्वरूप (Nature of Speech):

  1. संदेश (Message): प्रत्येक भाषणात एक संदेश असतो, जो वक्ता श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो. हा संदेश माहिती, विचार, कल्पना किंवा भावना या स्वरूपात असू शकतो.
  2. वक्ता (Speaker): भाषण देणारी व्यक्ती, जी आपले विचार श्रोत्यांपर्यंत पोहोचवते. वक्त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.
  3. श्रोता (Audience): भाषण ऐकणारे लोक. श्रोत्यांनुसार भाषणाची भाषा आणि शैली बदलते.
  4. माध्यम (Medium): ज्या माध्यमातून भाषण दिले जाते, ते माध्यम. उदा. थेट संवाद, दूरदर्शन, इंटरनेट.
  5. परिणाम (Effect): भाषणाचा श्रोत्यांवर होणारा परिणाम. हे भाषेचे यश दर्शवते.

भाषणाची कार्ये (Functions of Speech):

  1. माहिती देणे (To Inform):

    उदाहरण: "आजच्या हवामानाचा अंदाज असा आहे की, पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे." या वाक्यातून हवामानाची माहिती दिली जात आहे.

  2. प्रोत्साहन देणे (To Persuade):

    उदाहरण: "तुम्ही सर्वांनी मतदान करावे, कारण मतदानामुळे आपण आपल्या देशाचे भविष्य घडवू शकतो." या वाक्यातून लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

  3. शिक्षण देणे (To Educate):

    उदाहरण: "आज आपण इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल शिकणार आहोत - भारताचे स्वातंत्र्य." या वाक्यातून श्रोत्यांना शिक्षण दिले जात आहे.

  4. मनोरंजन करणे (To Entertain):

    उदाहरण: "एक मजेदार गोष्ट सांगतो, एकदा एक माणूस जंगलात हरवला..." या वाक्यातून लोकांचे मनोरंजन केले जाते.

  5. प्रेरणा देणे (To Inspire):

    उदाहरण: "अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते की, गरिबी असूनही आपण मोठे ध्येय ठेवू शकतो." या वाक्यातून लोकांना प्रेरणा दिली जाते.

ॲक्युरसी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 220