माणुसकी
सुविचार
जीवन
चांगले वाईट विचार हे मनाचे असतात की बुद्धीचे? मन आणि बुद्धी हे वेगळे आहेत की एक? आत्म्याचे विचार म्हणजे काय?
मूळ प्रश्न: मन आणि बुद्धी मध्ये काय फरक आहे?
मन आणि बुद्धी यातील फरक सांगण्यासाठी एक पुस्तक लिहिले तरी सुद्धा कमी पडेल माझ्या अभ्यासानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
बरेच लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या बुद्धीला पटेल त्यानुसार घेतो आणि काही लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या मनाला पटेल त्यानुसार घेतो पण तू हे मन आणि बुद्धी यामध्ये जास्त अंतर नाही असे माझे मत आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही बुद्धीने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही त्या क्षणाला तुमच्या असलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तो निर्णय घेतात. मात्र जेव्हा तुम्ही मनाने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही आत्तापर्यंतच्या जमा करत आलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे तुमची विवेकबुद्धी आहे त्यानुसार निर्णय घेता आणि अशा वेळेस आपण म्हणतो की मी माझ्या मनाने निर्णय घेतला.
एक उदाहरण द्यायचे झाले तर असे समजा की तुम्ही एक माळकरी माणूस आणि आणि मांसाहार करत नाही आणि एखाद्या अज्ञातस्थळी हरवले आहात आणि तिथे तुम्हाला काही दिवसांपासून खायला मिळाले नाही आणि अशा वेळेस तुमच्यासमोर एखादा प्राणी येतो त्याला तुम्ही खाऊ शकता. अशा वेळेस तुम्हाला तुमची बुद्धी म्हणेल की जर तुला जिवंत राहायचे असेल तर आता या प्राण्याला खायला काही हरकत नाही. मात्र आतापर्यंतची शिकवण आणि तुमच्या गळ्यात माळ असल्याने तुमच्या मनाचे तुम्हाला सांगणे असेल की आजूबाजूला असलेला पालापाचोळा भाज्या खा मात्र या प्राण्याला मारून मांसाहार करू नको.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers