2 उत्तरे
2
answers
मन आणि बुद्धी मध्ये काय फरक आहे?
11
Answer link
मन आणि बुद्धी यातील फरक सांगण्यासाठी एक पुस्तक लिहिले तरी सुद्धा कमी पडेल माझ्या अभ्यासानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
बरेच लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या बुद्धीला पटेल त्यानुसार घेतो आणि काही लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या मनाला पटेल त्यानुसार घेतो पण तू हे मन आणि बुद्धी यामध्ये जास्त अंतर नाही असे माझे मत आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही बुद्धीने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही त्या क्षणाला तुमच्या असलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तो निर्णय घेतात. मात्र जेव्हा तुम्ही मनाने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही आत्तापर्यंतच्या जमा करत आलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे तुमची विवेकबुद्धी आहे त्यानुसार निर्णय घेता आणि अशा वेळेस आपण म्हणतो की मी माझ्या मनाने निर्णय घेतला.
एक उदाहरण द्यायचे झाले तर असे समजा की तुम्ही एक माळकरी माणूस आणि आणि मांसाहार करत नाही आणि एखाद्या अज्ञातस्थळी हरवले आहात आणि तिथे तुम्हाला काही दिवसांपासून खायला मिळाले नाही आणि अशा वेळेस तुमच्यासमोर एखादा प्राणी येतो त्याला तुम्ही खाऊ शकता. अशा वेळेस तुम्हाला तुमची बुद्धी म्हणेल की जर तुला जिवंत राहायचे असेल तर आता या प्राण्याला खायला काही हरकत नाही. मात्र आतापर्यंतची शिकवण आणि तुमच्या गळ्यात माळ असल्याने तुमच्या मनाचे तुम्हाला सांगणे असेल की आजूबाजूला असलेला पालापाचोळा भाज्या खा मात्र या प्राण्याला मारून मांसाहार करू नको.
0
Answer link
मन आणि बुद्धी हे दोन शब्द अनेकदा आपण ऐकतो, पण त्या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मन (Mind):
- व्याख्या: मन म्हणजे आपल्या भावना, इच्छा आणि कल्पनांचा एकत्रित अनुभव. हे विचार आणि भावना निर्माण करते.
- कार्य: मन आपल्याला आनंद, दुःख, राग, प्रेम अशा भावना जाणवून देते. हे तात्कालिक अनुभवांवर आधारित असते.
- उदाहरण: आपल्याला आवडणारी गोष्ट पाहिल्यावर आनंद होणे किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटणे हे मनाचे कार्य आहे.
बुद्धी (Intellect/Wisdom):
- व्याख्या: बुद्धी म्हणजे विचार करण्याची, समजून घेण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता.
- कार्य: बुद्धी आपल्याला तर्कशुद्ध विचार करायला लावते, योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखायला मदत करते. हे दीर्घकाळ चालणाऱ्या विचारांवर आधारित असते.
- उदाहरण: गणितीय समस्या सोडवणे किंवा एखाद्या घटनेचे विश्लेषण करणे हे बुद्धीचे कार्य आहे.
थोडक्यात फरक: मन हे भावना आणि अनुभवांशी संबंधित आहे, तर बुद्धी विचार आणि तर्काशी संबंधित आहे. मन आपल्याला त्वरित प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त करते, तर बुद्धी विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी आपण मानसशास्त्र (Psychology) आणि तत्त्वज्ञान (Philosophy) या विषयांवर आधारित पुस्तके आणि लेख वाचू शकता.